आंदोलन

आकारी पडीत गावांचा प्रश्न हिवाळी अधिवेशनात मांडायला भाग पाडू-ॲड.काळे

न्यूजसेवा

राहाता(प्रतिनिधी)

   श्रीरामपूर तालुक्यातील ९ गावातील शेतकन्यांच्या आकारी पडीत जमीन शेतकऱ्यांच्या वारसाला देण्यासाठी आगामी हिवाळी अधिवेशनात श्रीरामपूर तालुक्यातील नऊ गावातील आकारी पडीत गावांचा प्रश्न आपण विधानसभेत मांडायला भाग पाडू व त्यासाठी नागपूर याठिकाणी जाणार असल्याचे सूतोवाच शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड.अजित काळे यांनी राहाता तालुक्यातील वाकडी (खंडोबाची ) या ठिकाणी आज सकाळी एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

राज्य शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड.अजित काळे हे मार्गदर्शन करताना दिसत आहेत.

“निळवंडे कालव्यासाठी कालवा कृती समीतीने मोठा लढा दिला असून त्यासाठी ॲड.अजित काळे यांनी उच्च न्यायालयात मोठी लढाई केली आहे.आज श्रेय घेणाऱ्या नेत्यांनी त्या विरुद्ध उत्तर नगर जिल्ह्यातील सहकारी साखर कारखानदारांनी,स्थानिक स्वराज्य संस्थानी पाणी पळविण्यासाठी दोन डझनाहून अधिक वकिलांची मोठी फौज उभी केली असल्याची आठवण करून दिली आहे.मात्र या सर्वांना कालवा कृती समितीचे मार्गदर्शक नानासाहेब जवरे व अन्य पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मोठा संघर्ष केला आहे”-रूपेंद्र काले,अध्यक्ष,निळवंडे कालवा कृती समिती,नगर- नाशिक.

   राहाता तालुक्यातील खंडोबाची वाकडी या ठिकाणी हनुमान मंदिराजवळ राज्य शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड.अजित काळे यांचे प्रमुख उपस्थितीत शेतकरी मेळावा व शेतकरी संघटनेचा नामफलक अनावरण सोहळा येत्या रविवार दिनांक ३० नोव्हेंबर रोजी सकाळी 9:30 वा.संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.

राज्य शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड.अजित काळे हे वाकडी येथील शेतकरी संघटनेचा नामफलक अनावरण सोहळा करताना दिसत आहे.

   सदर प्रसंगी शेतकरी संघटनेचे राज्य प्रसिद्धी प्रमुख नानासाहेब जवरे,जिल्हा अध्यक्ष विठ्ठलराव शेळके,कालवा कृती समितीचे अध्यक्ष रुपेंद्र काले,गणेश सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष शिवाजीराव लहारे,संचालक आलेशराव कापसे,साहेबराव चोरमल,ॲड.सर्जेराव घोडे,प्रशांत कापसे,सचीन वेताळ,सुनिल आसने,बाबासाहेब वेताळ,अशोक गुळवे,शेतकरी संघटनेचे युवा आघाडी अध्यक्ष शरद आसने,अभिषेक वेताळ,रविंद्र पवार,बाबासाहेब आसने,सुनिल आसने,सुजीत बोडके,सावळेराम आहेर, संजय ओमणे,शिवाजी पटारे,ज्ञानदेव चक्रनारायण,सागर गिऱ्हे,बबनराव नाईक,शिवाजी आढाव,भाऊसाहेब गव्हाणे,अशोक गुळवे,साहेबराव शेळके,दत्तात्रय कोते,ज्ञानेश्वर सोडणार,रामदास तरकसे,शंकरराव लहारे,पुंजाराम आहेर,सचीन मोमले,नितीन साबदे,वंसत डोखे,अशोक लबडे,विष्णूपंत लहारे,दिनकर भवर,ज्ञानदेव शेळके,रेवणनाथ डोखे,शशीकांत साबदे,महेश लहारे,गणेश घोरपडे,दत्तात्रय एलम,सुरेश लहारे,आण्णासाहेब कोते,वेणुनाथ शेळके,साहेबराव शेळके,विश्वनाथ काळे,संजय एलम आदीसह मोठ्या संख्येने शेतकरी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

   त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”भारत हा कृषिप्रधान देश आहे.भारतीय अर्थव्यवस्थेत शेतीचे स्थान अनन्यसाधारण आहे.त्यामुळे शेती हा आजही एक प्रमुख व्यवसाय आहे.भारतीय लोकसंख्येतील ६४ टक्के जनता कृषिक्षेत्रावर अवलंबून आहे आणि त्यांतील ७० टक्के शेतकरी अल्पभूधारक आहेत.त्यामुळे शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्था व समाजव्यवस्थेतील एक मूलभूत घटक आहे;म्हणून त्यांचे स्वास्थ्य व हित जपणारी शरद जोशी यांनी स्थापन केलेली संघटना ही काळाची गरज ठरली आहे.भारतातील शेतकरी चळवळ व आंदोलनांना स्वातंत्र्यपूर्व काळात जहागीरदार व जमीनदार यांच्या विरोधाची तर स्वातंत्र्योत्तर कालखंडात दूध व शेतमालाला योग्य भाव आणि कर्जासारख्या सरकारसंचालित विषयांची पार्श्वभूमी आहे.ब्रिटिश राजवटीत देशावर प्रथमच एकछत्री अंमल निर्माण झाला.त्यापूर्वी देशात सरंजामशाही व राजे-रजवाडे आणि संस्थानिकांची सत्ता होती.आता लोकशाहीतील कायदेशीर चाकोरीत निर्माण झालेले जहागिरदार आणि साखर कारखानदार यांच्या कचाट्यात शेतकरी सापडले आहे.शेतकऱ्यांनी निवडून दिलेले साखर कारखानदार आज शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहेत.ऊस,आणि खरीप रब्बी पिकांना उत्पादन आधारित किंमत मिळतं नाही.त्यामुळे शेतकरी नागवला गेला आहे.मात्र निवडणुका आल्या की साखर सम्राटांना आणि आधुनिक जहागिरदारांना शेतकऱ्यांची आठवण होत आहे.त्यांना वेळीच ठेचले तर शेतकऱ्यांना न्याय मिळणार आहे.

   सदर मेळाव्यात शेतकऱ्यानां सपुर्ण कर्ज माफी करून सातबारा कोरा करावा,ऊसाला प्रतिटन ३ हजार ५५० रुपये पहिली उचल मिळावी,खरीप हंगामातील सोयाबीन,कापुस,मका,फळबागा,ऊस व इतर पिक विमा तातडीने शेतकऱ्याच्या बैंक खात्यात जमा करावा,अवकाळी पावसाची नुकसान भरपाई तातडीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावी अशा प्रमुख मागण्यासह दुधाला प्रती लिटर ५० रूपये दर मिळावा,शेती औजारे ठिबक सिंचन,स्प्रिंकलर यांचे अनुदान तातडीने बँक खात्यात जमा करावे,जलसंपदा विभाग व पाटबंधारे विभागाने शेती सिंचनासाठी वाढीव पाणीपट्टी कमी करावी,निळवंडे कालव्यांचे कामे केवळ एकाच तालुक्यात सुरू असून बाकी तालुक्यातील दुष्काळी शेतकऱ्यांना वंचित ठेवले जात आहे.हा अन्याय तातडीने दूर करावा व लाभक्षेत्रातील प्रलंबित चाऱ्याची कामे तातडीने सुरू करावी,शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव द्यावा,शेतमालाची निर्यात बंदी कायमस्वरूपी उठवावी,शेती पंपासाठी दिवसा वीजपुरवठा करावा,साखर कारखान्याने ऊस बिलातून कुठल्याही बँकेचे कर्ज वसूली करु नये.शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करून दिल्याशिवाय शेतकरी संघटना गप्प बसणार नाही.निळवंडे कालवा कृती समितीने आंदोलने करून प्रसंगी जेल मध्ये जाऊन लढा दिला,उच्च व सर्वोच्च न्यायालयात आपण निळवंडे कालवा कृती समितीला पाच ते सहा वर्षे मोफत विधी सहाय्य करून लढा दिला असल्याची आठवण त्यांनी उपस्थितांना करून दिली आहे.पण आज पाणी चोर नेते आपण निळवंडे धरणाचे पाणी आणल्याचा हास्यास्पद दावा करत आहे.जो पर्यंत आपण जागे होणार नाही तो पर्यंत हा अन्याय होत राहणार आहे.तुम्ही कष्ट करायला आणि पीठ भरायला भ्रष्ट नेते राहणार असल्याचे सांगून शेतकऱ्यांच्या मुलानी आता पुढाऱ्यावर विश्वास ठेवण्याची वेळ संपली आहे.ते केवळ निवडणूक आल्यावरच शेतकऱ्यांचा कळवळा दाखवत असल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे.त्याचा जोरदार प्रतिकार करण्याची वेळ आली आहे.वाकडीत शेतकरी एकत्र आले ही मोठी समाधानाची बाब आहे.आता अन्य गावात शेतकरी संघटनेच्या शाखा उघडण्याची गरज आहे.त्यातून राजकारणी आणि सरकारवर मोठा दबाव निर्माण होईल आणि शेतकऱ्यांना न्याय मिळेल असा दावा त्यांनी शेवटी केला आहे.

   यावेळी प्रास्तविक शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल शेळके यांनी केले त्यांनी ॲड.अजित काळे यांनी निळवंडे कालव्यांचे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचा उच्च न्यायालयात लढा जिंकला असून श्रीरामपूर तालुक्यातील आजारी पडीत शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला,सन-2017 सालची पावणे सहा हजार कोटी रुपयांची छत्रपती शिवाजी महाराज स्वाभिमानी कर्जमाफी योजना न्यायालयात भांडून राज्यातील शेतकऱ्यांना मिळून दिली आहे.असल्याचे सांगून आगामी काळात कर्जमाफी करण्यासाठी तेच सक्षम नेते असल्याचा दावा केला असून शेतकऱ्यांच्या मुलानी संघटीत होण्याची गरज असल्याचे शेवटी सांगितले आहे.

   सदर प्रसंगी उपस्थिताना निळवंडे कालवा कृती समितीचे अध्यक्ष रूपेंद्र काले यांनी,”निळवंडे कालव्यासाठी कालवा कृती समीतीने मोठा लढा दिला असून त्यासाठी ॲड.अजित काळे यांनी उच्च न्यायालयात मोठी लढाई केली आहे.आज श्रेय घेणाऱ्या नेत्यांनी त्या विरुद्ध उत्तर नगर जिल्ह्यातील सहकारी साखर कारखानदारांनी,स्थानिक स्वराज्य संस्थानी पाणी पळविण्यासाठी दोन डझनाहून अधिक वकिलांची मोठी फौज उभी केली असल्याची आठवण करून दिली आहे.मात्र या सर्वांना कालवा कृती समितीचे मार्गदर्शक नानासाहेब जवरे व अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठा संघर्ष केल्याची आठवण करून दिली असून त्या सर्वांच्या परिश्रमातून आज दुष्काळी गावांना पाणी मिळत आहे हे विसरता येणार नाही.अकोले तालुक्यात आज श्रेय घेणाऱ्या नेत्यांचे सहकारीच आडवे येऊन कालव्यांचे काम बंद पाडले होते यांची आठवण करून दिली आहे.

  त्यावेळी आधी शेतकरी संघटनेच्या नाम फलकाचे उद्घाटन ॲड.अजित काळे यांच्या हस्ते करण्यात आले आहे.त्यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.उपस्थितांचे आभार महेश लहारे यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close