जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवडणूक

मराठा क्रांती स्वराज्य संघटनेचा…या उमेदवारास पाठिंबा !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)


मराठा क्रांती स्वराज्य संघटनेचे अ.नगर जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष दिपक धट यांनी नुकतीच आपल्या प्रमुख पदाधिकारी यांच्यासह शिर्डी लोकसभा महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माजी खा.भाऊसाहेब वाकचौरे यांची भेट घेत आपल्या संघटनेचा जाहीर पाठिंबा दिला आहे.

  

  यावेळी उत्तर नगर जिल्ह्यातील एकूण १२० पदाधिकारी यांच्या पाठिंब्याचे सह्यांचे पत्र देत आपण स्वतः संपूर्ण मतदार संघात स्वयंस्फूर्तीने फिरणार असून वाकचौरे यांना सर्वाधिक मताधिक्याने निवडून आणण्यात मदत करणार असल्याचे जाहीर केले आहे.


   मराठा क्रांती स्वराज्य संघटना ही राष्ट्रीय पातळीवर काम करणारी नोंदणीकृत संघटना असून मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी अविरत लढा सुरु असल्याने समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी शिर्डी लोकसभेचे सुशिक्षित उमेदवार आणि सर्वांना सोबत घेऊन चालणारे विकासाभिमुख नेतृत्व भाऊसाहेब वाकचौरे यांना साथ देण्याचा निर्धार करत मशाल घराघरात पोहचविणार असल्याचे नमूद केले आहे.
या
     वेळी शिवसेना उबाठा’चे मुकुंदराव सिनगर समवेत नगर जिल्हा उपाध्यक्ष बापूसाहेब सुराळकर,कोपरगाव तालुका सचिव सोमनाथ राशिनकर,कोल्हार शहराध्यक्ष उत्तमराव धट,राहाता तालुका संघटक राजेंद्र लोहाटे,भोजडे संघटक अमोल नाईकवाडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close