न्यायिक वृत्त
…’त्या’ प्रकरणातील आरोपीना सहा दिवसांची पोलीस कोठडी
न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
देशभरात लवजिहाद प्रकरणी धुराळा उडालेला असताना कोपरगाव शहरात असाच प्रकार आढळून आला असून यातील तीन आरोपी कोपरगाव शहर पोलिसांनी अटक केले असून त्यांना कोपरगाव येथील अरीरिक्त वरिष्ठ न्यायदंडाधिकारी भगवान पंडित यांचे समोर हजर केले असता त्यांना दि.१८ जुलै पर्यंत सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती कोपरगाव शहर पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान यातील अटक आरोपींना कोपरगाव येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांचे समोर हजर केले असता त्यांना न्यायालयाने दि.१८ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून उर्वरित आरोपीच्या शोधात दोन पोलीस पथके रवाना केले आहे.त्यांना लवकरच शोधले जाईल असा विश्वास कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक रामराव ढिकले यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली आहे.
लव्ह जिहादचा कायदा मागील काही दिवसांपासून खुपच चर्चेला आला आहे.महाराष्ट्रात सुध्दा हा कायदा करण्यात येणार अशा चर्चा महाराष्ट्रात चालू झाल्या आहेत.मात्र या आगोदर हा कायदा उत्तर प्रदेश,हरियाणा,कर्नाटक,मध्य प्रदेश या राज्यांमध्ये लागू आहे.मात्र महाराष्ट्रात मात्र,’बोलाची भात आणि बोलाची कढी’ असा काहीसा प्रकार सुरु असताना दिसत आहे.त्यातच अशीच घटना नुकतीच कोपरगाव शहरात नुकतीच घडली आहे.यातील मुलगी (वय-२०) हि कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असून आरोपी हा सायम कुरैशी मध्य प्रदेशातील इंदोर येथील जुना पिठा येथील रहिवासी आहे.
या घटनेतील आरोपी याने तीन वर्षांपूर्वी संबंधित फिर्यादी मुलीशी तिच्या भ्रमणध्वनी वरून संपर्क करून व मैत्रीचे नाटक केले व तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून दि.२१ मे रोजी सकाळी ०६ ते दुपारी १२ वाजेच्या दरम्यान आरोपी सायम कुरेशी याने तिच्या घरच्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती.व त्यानंतर तिला कोपरगाव येथील राज्य परिवहन मंडळाच्या बस स्थानकाच्या बाहेर बोलावून तिला खडकी येथील मदरसा येथे येण्यास सांगितले असता तिने त्यांना त्याबाबत विरोध केला असता
आरोपी सायम कुरेशी,ईमरान आयुब शेख,छोटू उर्फ कलीम (पूर्ण नावं माहिती नाही) फय्याज कुरेशी (की अय्याज ?)(पूर्ण नाव माहिती नाही) सर्व रा.कोपरगाव.इंदोर येथील मौलवी (याचे पूर्ण नाव माहिती नाही) व इतरांनी फिर्यादीचे हात पाय बांधून फिर्यादीचे अंगाला स्पर्श करून तिचे मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून तिला तिच्याच दुचाकीवर ट्रिपल सीट बसवून खडकी कोपरगाव येथील मदरसा येथे नेऊन आरोपी सायम कुरेशी याने तिच्या मर्जीच्या विरुद्ध शरीर संबंध स्थापित करून त्याचे फिटो व चलचित्रण केले होते.त्यांनतर ते फोटो व चलचित्रण प्रसारित करण्याची धमकी देऊन फिर्यादिस इंदोर येथे बोलावुन घेतले होते.तेथे देखील आरोपीने तिच्या बळजबरीने शारीरिक अत्याचार करून इंदोर येथील मौलवीकडून धर्मांतरण करण्यासाठी दबाव आणुन बळजबरीने नमाज पठण करण्यास लावले होते.तसेच धर्मांतरण करण्यासाठी फिर्यादी मुलीवर आरोपी सायम कुरेशी यांचे सोबत लग्न करण्यासाठी दबाव आणून वेळोवेळी फिर्यादीचे आई-वडिलांना मारण्याची धमकी दिली होती.यातील सायम कुरेशी,इमरान कुरेशी,फय्याज कुरेशी या तीन आरोपींना कोपरगाव पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती पोलिसानी दिली आहे.यातील अजून छोटू उर्फ कलीम हा मात्र फरार आहे.
दरम्यान यातील तीन आरोपी इमरान आयुब शेख (वय-३१) मोबाईल शॉपी,रा.आयेशा कॉलनी,फय्याज वहाब कुरेशी (वय-४५)रा.कोपरगाव,सायन शहाबुद्दीन कुरेशी (वय-१९),रा.साठ,जुना पिठा इंदोर मध्यप्रदेश आदींना कोपरगाव येथील अतिरिक्त वरिष्ठ न्यायदंडाधिकारी यांचे समोर हजर केले असता त्यांना न्यायालयाने दि.१८ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून उर्वरित आरोपीच्या शोधात दोन पोलीस पथके रवाना केले आहे.त्यांना लवकरच शोधले जाईल असा विश्वास कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक रामराव ढिकले यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली आहे.