आंदोलन
नांदूर मधमेश्वरवर वक्राकार दरवाजे,गोदावरी लाभक्षेत्र होणार उध्वस्त-‘सावध व्हा…’च्या हाका

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
जलसंपदा विभागाने नांदूर मधमेश्वर धरणावर नदीच्या तळालगत नव्याने वाढीव १२ मीटर बाय ८ मीटर आकाराचे १० वक्राकार दरवाजे बांधण्यास मान्यता दिली आहे.त्याचे दूरगामी परिणाम गोदावरी कालव्याच्या विपरीत परिणाम लाभ क्षेत्रावर होणार आहे याची जाणीव झाल्यामुळे या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्याची आ.आशुतोष काळे यांची भूमिका योग्यच असल्याचे प्रतिपादन कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे यांनी एका प्रसिद्धी पत्रकांव्ये केले आहे.

“नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यात साचलेला गाळ वाहून जाण्यासाठी वक्राकार दरवाजे बांधण्याचा उद्देश असला तरी हा उद्देश सफल होणार नाही मात्र गोदावरी कालवे कोरडेठाक राहून लाभक्षेत्र उजाड झाल्याशिवाय राहणार नाही.याची पूर्वकल्पना आल्यामुळे आ.काळेंनी दरवाजा बसविण्यास केलेला विरोध अगदी योग्य आहे”-अशोक रोहमारे,पोहेगाव.
पावसाळ्यात अतिवृष्टी होवून निर्माण होणाऱ्या महापुरामुळे सायखेडा ते नांदूर मधमेश्वर बंधारा दरम्यान नदी सभोवतालचा परिसर व सभोवतालच्या गावातील पुराच्या पाण्याने होणारी हानी टाळण्यासाठी राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने नांदूर मधमेश्वर धरणावर नदीच्या तळालगत नव्याने वाढीव १२ मीटर बाय ८ मीटर आकाराचे १० वक्राकार दरवाजे बांधण्यास मंजूरी दिली आहे. हा निर्णय अत्यंत चुकीचा असून त्यामुळे गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रावर पुन्हा एकदा अन्याय होणार आहे.त्या निर्णया विरोधात न्यायालयीन व राजकीय लढाई बरोबरच रस्त्यावरच्या लढाईचा ईशारा आ.काळे यांनी दिला आहे.

पुढे बोलताना त्यांनी म्हटले आहे की,”बारमाही ब्लॉकच्या नावाखाली लँड सिलींग कायद्यान्वये जास्तीच्या जमिनी गेल्या व ५० टक्के ब्लॉक्स देखील रद्द करून गोदावरी कालव्यांच्या लाभधारक शेतकऱ्यांवर दुहेरी अन्याय झाला आहे. १० वक्राकार दरवाजे बांधण्यास मंजूरी दिल्यामुळे गोदावरी कालव्यांना ओव्हरफ्लोचे पाणी मिळणे दुरापास्त होणार आहे. बंधाऱ्यात साचलेला गाळ वाहून जाण्यासाठी वक्राकार दरवाजे बांधण्याचा उद्देश असला तरी हा उद्देश सफल होणार नाही मात्र गोदावरी कालवे कोरडेठाक राहून लाभक्षेत्र उजाड झाल्याशिवाय राहणार नाही.याची पूर्वकल्पना आल्यामुळे आ.काळेंनी दरवाजा बसविण्यास केलेला विरोध अगदी योग्य आहे.त्यांचे शासन दरबारी असलेले राजकीय वजन पाहता यामधून योग्य मार्ग निश्चितपणे ते काढू शकतात याचा मला विश्वास आहे. त्यामुळे सर्व लाभधारक शेतकऱ्यांनी पुन्हा आपल्यावर अन्याय होवू नये यासाठी आ.काळे यांच्यामागे खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन अशोक रोहमारे यांनी शेवटी केले आहे.
“जर मराठवाडा व नाशिक जिल्ह्यातील पुढारी एकत्र येवून आपल्या हक्काच्या पाण्यासाठी लढणाऱ्या आ.आशुतोष काळे यांना लक्ष करणार असतील तर आपण देखील आपल्या जीवन मरणाचा प्रश्न असल्यामुळे गोदावरी कालव्याचा लाभधारक शेतकरी व कोपरगाव तालुक्याचा नागरिक या नात्याने राजकीय जोडे बाजूला ठेवून आ. आशुतोष काळेंच्या पाठीशी उभे रहाणे हे आपले कर्तव्य आहे”-अशोक रोहमारे,पोहेगाव.