जाहिरात-9423439946
सहकार

…या पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांना बोनस व सानुग्रह अनुदान !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील समता नागरी सहकारी पतसंसंस्थेने आपल्या कर्मचाऱ्यांना तीस टक्के बोनस व सानुग्रह अनुदान म्हणून दीड कोटींची रक्कम संस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांनी जाहीर केली आहे.त्या बाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

“समता पतसंस्थेचे अध्यक्ष कोयटे आणि संचालक मंडळ यांनी आम्हा कर्मचाऱ्यांना बोनस आणि सानुग्रह अनुदान देऊन दसऱ्याच्या आदल्या दिवशीच दिवाळी साजरी करण्याची संधी दिली. त्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष आणि संचालक मंडळाचे आम्ही सर्व कर्मचारी आभारी आहोत”-संजय पारखे,ठेवप्रमुख,मुख्य कार्यालय कोपरगाव.

राज्यात सहकारी पतसंस्था चळवळीत समता नागरी सहकारी पतसंस्था अग्रणी म्हणून ओळखली जाते.त्यांनी ठेवीदार आणि सभासदाना विविध योजना जाहीर केल्या आहेत.आगामी दिवाळी सण हा मोठा मानला जातो त्यासाठी सहकारातील संस्था बोनस आणि लाभांश जाहीर करतात.कोपरगाव शहरातील समता संस्थेने आपल्या कर्मचाऱ्यांना या दिवाळी निमित्त तीस टक्के बोनस जाहीर केला असून तो दसऱ्याच्या आदल्या दिवशीच प्रदान करण्यात आला आहे.

सदर प्रसंगी समता पतसंस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे,ज्येष्ठ संचालक जितूभाई शहा,जनरल मॅनेजर सचिन भट्टड,मुख्य कार्यालयातील विविध विभागाचे अधिकारी,आदी मान्यवरांसह कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close