जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

दुचाकीस्वारास उडवले,कोपरगावात गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरानजीक असलेल्या कोपरगाव जवळ असलेल्या झगडे फाटा ते पुणतांबा फाटा रस्त्यावर पवार वस्ती जवळ अशोक लेलंड व होंडा सी.डी.दुचाकी यांच्यात आज दुपारी १ वाजेच्या सुमारास झालेल्या धडकेत सावळगाव येथील सुनील बाबुराव साळवे (वय-४८) या इसमाचे निधन झाले आहे.त्यांच्या निधनाबाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

संकल्पित छायाचित्र.

वर्तमानात कोपरगाव तालुक्यातील रस्त्यांची वाट लागली आहे.त्यात नगर-मनमाड,तळेगाव मार्गे संगेमनेर,कोपरगाव-पुणतांबा आदी रस्त्यांचा आदींचा समावेश आहे.त्यामुळे अपघातात लक्षणीयरीत्या वाढ झाली आहे.त्यामुळे मृत्यूदर वाढला आहे.नागरिक ओरड करूनही बांधकाम खाते आणि राजकीय पुढारी यांच्या कानावरही हि साधी बाब जाताना दिसत नाही.त्यामुळे सामान्य नागरिक आणि त्यांचे कुटुंबे उध्वस्त होताना पाहावे लागत आहेत.अशीच घटना नुकतीच संगमनेर-कोपरगाव रस्त्यावर पवार वस्तीजवळ घडली आहे.त्यात एकास जीव गमवावा लागला आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,वर्तमानात कोपरगाव तालुक्यातील रस्त्यांची वाट लागली आहे.त्यात नगर-मनमाड,तळेगाव मार्गे संगेमनेर,कोपरगाव-पुणतांबा आदी रस्त्यांचा आदींचा समावेश आहे.त्यामुळे अपघातात लक्षणीयरीत्या वाढ झाली आहे.त्यामुळे मृत्यूदर वाढला आहे.नागरिक ओरड करूनही बांधकाम खाते आणि राजकीय पुढारी यांच्या कानावरही हि साधी बाब जाताना दिसत नाही.त्यामुळे सामान्य नागरिक आणि त्यांचे कुटुंबे उध्वस्त होताना पाहावे लागत आहेत.अशीच घटना नुकतीच संगमनेर-कोपरगाव रस्त्यावर पवार वस्तीजवळ घडली आहे.सदर दुचाकी स्वार हा आपली विना क्रमांकाची होंडा सी.डी.हि दुचाकी घेऊन रस्त्यावर आला असता त्याच रस्त्यावरून झगडे फाट्याकडून पुणतांबा फाट्याकडे एक अशोक लेलंड कंपनीचा कन्टेंनर (क्रं.एच.आर.३८ ए.ए.७७९७) हा भरधाव वेगाने जात असताना त्याने दुचाकी स्वारास जोराची धडक दिली असता तो जागेवर गतप्राण झाला आहे.नजीकच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली असता त्यास तातडीने रुग्णवाहिनींद्वारे कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात भरती केले असता तेथे उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले आहे.सदर मयतास भाऊ,पत्नी,मुलगा,दोन विवाहित मुली असा परिवार आहे.त्याच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान या घटने बाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात मयताचा मुलगा फिर्यादी आकाश सुनील साळवे (वय- २३) यांनी गुन्हा सदर अज्ञात कन्टेंनर चालकाविरुद्ध दाखल केला आहे.वाहन चालक घटना स्थळावरून फरार झाला आहे.दरम्यान घटनास्थळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले,पोलीस उपनिरीक्षक एस.सी.पवार यांनी भेट दिली आहे.

या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रं.३०३/२०२२ भा.द.वि.कलम ३०४(अ),२७९,३३७,३३८,४२७,मोटार वाहन कायदा कलम १८४,१७७,१३४,(अ) (ब) प्रमाणे दोन्ही आरोपी चालका विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्ग दर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पवार हे करत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close