गुन्हे विषयक
मारहाणीत आई-मुलांसह दोन जखमी,कोपरगावात गुन्हा दाखल

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे शिवारात आनंदवाडी येथे देवी मंडळाच्या समोर फिर्यादी गाणे ऐकत असताना आरोपी अमोल विठ्ठल माळी व अंकुश रामदास माळी यांनी गाणे लावल्याच्या कारणारून फिर्यादिस व त्याची आई रजनीताई कुमावत यांना बांबूच्या मारहाण केली असून यात दोघे जण जखमी झाले असून त्याबाबत फिर्यादी सदानंद कुमावत यांनी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे चांदेकसारे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
देवीचे नऊ दिवस देवी दुर्गा आणि तिच्या नऊ अवतारांना नवदुर्गाला समर्पित आहेत.प्रत्येक दिवस देवीच्या अवताराशी संबंधित आहे.त्या निमित्ताने देवीची स्थापना होऊन नऊ दिवस देवीची विधिवत पूजा केली जाते.व दहाव्या दिवशी विसर्जन केले जाते.नऊ दिवस विविध विविध मंडळामार्फत धार्मिक,सामाजिक कार्यक्रम साजरे केले जातात.त्यात देवीची गाणी म्हटली जातात ऐकवली जातात.त्यातून काही असामाजिक तत्व जाणीवपूर्वक त्यात विघ्न आणून खेळखंडोबा करताना दिसतात अशीच घटना कोपरगाव तालुक्यात चांदेकसारे शिवारात आनंदवाडी येथे घडली आहे.
दुर्गा आणि राक्षस महिषासुर यांच्यात झालेल्या प्रमुख युद्धाशी संबंधित हा सण आहे.यावेळी वाईटावर चांगल्याचा विजय साजरा केला जातो.हे नऊ दिवस देवी दुर्गा आणि तिच्या नऊ अवतारांना नवदुर्गाला समर्पित आहेत.प्रत्येक दिवस देवीच्या अवताराशी संबंधित आहे.त्या निमित्ताने देवीची स्थापना होऊन नऊ दिवस देवीची विधिवत पूजा केली जाते.व दहाव्या दिवशी विसर्जन केले जाते.नऊ दिवस विविध विविध मंडळामार्फत धार्मिक,सामाजिक कार्यक्रम साजरे केले जातात.त्यात देवीची गाणी म्हटली जातात ऐकवली जातात.त्यातून काही असामाजिक तत्व जाणीवपूर्वक त्यात विघ्न आणून खेळखंडोबा करताना दिसतात अशीच घटना कोपरगाव तालुक्यात चांदेकसारे शिवारात आनंदवाडी येथे घडली आहे.
फिर्यादी सदानंद कुमावत हे देवी मंडळाजवळ असताना त्यांनी विविध धार्मिक गाणी वाजवत असताना त्या ठिकाणी आरोपी अमोल विठ्ल माळी हा दि.३ ऑक्टोबर च्या रात्री ८.४५ वाजता घटनास्थळी आला व त्यांनी लावलेले गाण्यास हरकत घेतली व फिर्यादी सदानंद तुळशीदास कुमावत व त्यांची आई रजनीताई तुळशीदास कुमावत यांना जवळ पडलेल्या बांबूच्या सहाय्याने मारहाण केली दुसरा आरोपी अंकुश माळी हा त्या ठिकाणी आला व त्यानेही फिर्यादिचा हाथ पकडून त्यास मारहाण करण्यास मदत केली आहे.असून यात दोघे जण जखमी झाले असून त्याबाबत फिर्यादी सदानंद कुमावत यांनी तालुका पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे चांदेकसारे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.त्यांनी तत्काळ कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान घटनास्थळी तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एम.ए.कुसारे यांनी भेट दिली आहे.
या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रं.३८५/२०२२ भा.द.वि.कलम ३२४,३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे दोन्ही आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्ग दर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कुसारे हे करत आहेत.