जाहिरात-9423439946
निवडणूक

विषय समिती निवडीत सेनेला ठेंगा,मोठी नाराजी !

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

   कोपरगाव नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष निवडणुकीनंतर शहरवासियांचे विषय समित्यांकडे लक्ष लागून राहिले होते त्या आज भाजपकडून जाहीर करण्यात आल्या असून त्यात सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतीपदी निलोफर फिरोज पठाण,पाणीपुरवठा समितीवर वैशाली विजय वाजे,शिक्षण,क्रीडा व संस्कृती समितीवर संजना संजय उदावंत तर महिला व बालकल्याण समितीवर सविता कैलास मंजूळ आदींची वर्णी लागली आहे तर या समितीवर उपसभापतीपदी मनीषा दत्तू पगारे या नवख्या महिलांची निवड झाली आहे.त्यामुळे पहिल्यावर्षी तरी मातब्बर मंडळींना यातून वगळले असून नगराध्यक्षपदाला अधिक वाव देण्याची संधी अधिक सामावली असल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे.मात्र या पहिल्याच टप्प्यात शिवसेना बंडखोर गटाला मात्र ठेंगा दाखवला असल्याचे दिसून आले असून त्यांची  मोठी नाराजी असल्याचे बोलले जात आहे.

विषय समितीच्या सभापतींची निवड प्रक्रिया सुरू असताना निवडणूक निर्णय अधिकारी महेश सावंत,सहाय्यक निवडणूक अधिकारी सुहास जगताप व समोर उपस्थित नगरसेवक दिसत आहे.

दरम्यान या निवडीबद्दल शिवसेना गटात मोठी नाराजी असल्याची माहिती समोर आली असून त्यात माजी लोकप्रतिनिधीने सन-२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाबद्दल विजयी उमेदवारांना जबाबदार धरून त्यांची चांगलीच कानउघडणी केली असल्याचे उघड झाले आहे.यात शिवसेनेची अवस्था गव्हाबरोबर किडे रगडले असल्याची भावना निर्माण झाली असल्याचे उघड झाले आहे.याबाबत सेनेच्या माजी उपनगराध्यक्षाने त्याबाबत उघड नाराजी व्यक्त केली असून विषय समिती सभापती पद सगळ्यांना न दिल्याने चक्क नाकारले आहेे.त्यामुळे या संधीचे आ.काळे गट किती सोने करणार याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे.

   कोपरगाव नगरपरिषद निवडणूक संपली असून २१ डिसेंबर रोजी संपन्न झालेल्या निकालात भाजप कोल्हे गटाला नगराध्यक्षपदी पराग संधान यांची वर्णी लागली होती. त्यांच्या वाट्याला १९ जागा आल्या आहेत.यात शिवसेनेने हाती छत्री घेऊन चार जागा वाट्याला आल्या असून एक अपक्ष उमेदवाराला संधी दिली होती.दरम्यान राष्ट्रवादी आ.आशुतोष काळे गटाला मागील ०७ जागांत भरघोस वाढ होऊन त्या ११ वर पोहचल्या होत्या.सत्ताधारी गटाच्या अपनगराध्यक्षपदी आगामी जिल्हा परिषद निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सर्वसमावेशक दलीत कार्यकर्ता जितेंद्र रणशूर यांची १२ जानेवारी रोजी वर्णी लागली होती.त्यानंतर सर्वच नगरसेवक आणि मतदारांचे विषय समितीच्या निवडीकडे लक्ष लागून राहिले होते.त्यासाठी इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी केली होती.त्यासाठी गेले काही दिवस जोरबैठकांचा सपाटा सुरू होता.त्यावरील पडदा आज हटला असून त्यात शिवसेनेला उघडउघड बगल दिली असल्याचे दिसून आले आहे.शिवाय नगराध्यक्ष पराग संधान यांना काम करण्यास पूर्ण अवकाश मिळण्यासाठी व आपले सिंहासन स्थिर होण्यासाठी सत्ताधारी गटाने बऱ्यापैकी खबरदारी घेतली असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.शिवाय जे काही निवडले आहे.त्यात ठेका,वाळू संबंधित कार्यकर्त्यांना बऱ्यापैकी संधी दिली असल्याने सत्ताधारी गटाची आगामी चाल त्यातून सिद्ध होत असल्याचे बोलले जात आहे.

कोपरगाव नगरपरिषद.

दरम्यान या निवडणुकीचा आ.काळे गटाला मोठा ताप आला असून त्यांनी त्यांना ओमप्रकाश कोयटे या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचा पराभव चांगलाच झोबला असल्याचे दिसून येत आहे.त्यातून त्यांनी आढाव आडनावाचे तीन उमेदवारांना कामावरून थेट घरचा रस्ता दाखवला असल्याचे बोलले जात आहे.तर प्रभाग क्रमांक तीन मधून नगराध्यक्षपदाचे मोठे मताधिक्य घटल्याने त्यांचा हातातोंडाचा घास हिसकावून घेतल्याने त्यास जबाबदार धरून एका स्वीय सहाय्यकास थेट पश्चिमगडावर रवानगी केली असल्याची माहिती हाती आली आहे.

   दरम्यान आज संपन्न झालेल्या बैठकीत नियोजन व विकास समितीच्या सभापतीपद हे उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर यांना सुपूर्त केले आहे तर स्वच्छता व आरोग्य समितीवर वैभव सुधाकर आढाव या नवख्या उमेदवाराची निवड ही त्यांची नगराध्यक्षपदासाठी झालेली (खास!) मदत अधोरेखित केली असल्याचे मानले जात आहे.तर निर्णय प्रक्रियेत महत्व असणाऱ्या स्थायी समितीवर विद्या राजेंद्र सोनवणे यांच्या अनुभवाचा फायदा घेण्याचा निर्णय अधोरेखित होताना दिसत आहे.तर प्रसाद बाळासाहेब आढाव यांची निवड ही नगराध्यक्षपदी आढाव कंपनीने घेतलेली निर्णायक आघाडी आणि मदत उघड करत असल्याचे मानले जात आहे.तर आ.काळे गटाकडून स्थायी समितीत कोयटे गटाच्या पराभवाची उणीव भरून काढण्यासाठी त्यांचे कट्टर समर्थक जनार्दन कदम यांना स्थान देण्यात आले आहे.

   दरम्यान या पदाधिकाऱ्यांचा संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे,माजी.आ.स्नेहलता कोल्हे,सहकार महर्षी कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे,नगराध्यक्ष पराग संधान आदींनी अभिनंदन केले आहे.आगामी शंभर दिवसात कोल्हे गटाची दिशा स्पष्ट होणार आहे.त्यातून त्यांची पारदर्शकता समोर येणार की स्वाहाकार समोर येणार हे लवकरच उघड होणार आहे.जाहीरनामा हे मोठे आव्हान आहे.त्याकडे त्यांची दृष्टी कशी राहणार हे लवकरच उघड होणार असल्याने त्याकडे मतदारांचे लक्ष लागून राहिले आहे.

   दरम्यान या निवडीबद्दल शिवसेना गटात मोठी नाराजी असल्याची माहिती समोर आली असून त्यात माजी लोकप्रतिनिधीने सन-२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाबद्दल विजयी उमेदवारांना जबाबदार धरून त्यांची चांगलीच कानउघडणी केली असल्याचे उघड झाले आहे.यात शिवसेनेची अवस्था गव्हाबरोबर किडे रगडले असल्याची भावना निर्माण झाली असल्याचे उघड झाले आहे.याबाबत सेनेच्या माजी उपनगराध्यक्षाने त्याबाबत उघड नाराजी व्यक्त केली असून विषय समिती सभापती पद सर्व उमेदवारांना मागितले होते मात्र नेत्यांकडून नकारघंटा मिळाल्याने एकास मिळत असलेले सभापतीपद चक्क नाकारले असल्याचे उघड झाले आहे.दरम्यान भाजप कोल्हे गटाचे काही नगरसेवकांनी गटनेत्याच्या निवडीबद्दल आधीच आदळआपट केली असल्याची विश्वसनीय माहिती आहे.त्यातून आज विषय समितीत स्थान न मिळाल्याने त्यांनी सभापती पदाचे नावे कळल्या-कळल्या बाहेर जाणे पसंत केले आहे.त्यातून पक्षांतर्गत खदखद बाहेर पडली असल्याचे बोलले जात आहे.

*पत्रकार नानासाहेब जवरे* यांच्या विश्वसनीय बातम्यासाठी *’न्यूजसेवा‘* वाचा आणि खालील लिंकवर क्लिक करून ग्रुप’मध्ये सामील व्हा.
https://bit.ly/newsseva2025
*न्यूजसेवा* डिजिटल युग डिजिटल बातमी.

  तर दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आ.आशुतोष काळे गटाला त्यांच्या ओमप्रकाश कोयटे या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचा पराभव चांगलाच झोबला असल्याचे दिसून येत आहे.त्यातून त्यांनी आढाव आडनावाचे तीन उमेदवारांना कामावरून थेट घरचा रस्ता दाखवला असल्याचे बोलले जात आहे.तर प्रभाग क्रमांक तीन मधून नगराध्यक्ष पदाचे मोठे मताधिक्य घटल्याने त्यांचा हातातोंडाचा घास हिसकावून घेतल्याने त्यास जबाबदार धरून एका स्वीय सहाय्यकास थेट पश्चिमगडावर रवानगी केली असल्याची माहिती हाती आली आहे.त्यामुळे शहरात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close