जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

नायलॉन दोरीने घेतला गळफास,कोपरगावात गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेला इसम सुधाकर रामजी खंडीझोड (वय-६२) यांनी आज सकाळी ०९ वाजे पूर्वी अज्ञात कारणाने आपल्या राहत्या घराच्या छताच्या अँगलला नायलॉन दोरी बांधून तिच्या सहाय्याने गळफास घेतला असल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे.त्यामुळे चांदेकसारे व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार सदर ईसम सेंन्ट्रीग काम करत होते.त्या इसमांची पत्नी एक महिन्यापासून घरी नव्हती.त्यास मुलगा नव्हता मात्र एक विवाहित मुलगी होती.मात्र त्याने का आत्महत्या केली हे समजू शकले नाही.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,चांदेकसारे येथील खबर देणार इसम प्रभाकर रामजी खंडीझोड (वय-६४) यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात खबर दिली की,त्यांचे कनिष्ठ भाऊ सुधाकर रामजी खंडीझोड यांनी आज सकाळी नऊ वाजे पूर्वी आपल्या घराच्या छताला असलेल्या अँगलला दोरी बांधून तिच्या सहाय्याने गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली आहे.

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार सदर ईसम सेंन्ट्रीग काम करत होते.त्या इसमांची पत्नी एक महिन्यापासून घरी नव्हती.त्यास मुलगा नव्हता मात्र एक विवाहित मुलगी होती.मात्र त्याने का आत्महत्या केली हे समजू शकले नाही.

कोपरगाव तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या प्रकरणी सदर इसमास कोपरगाव ग्रामीण रुग्णालायत उपचारार्थ दाखल केले असता तेथील उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले आहे.

या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी अकस्मात मृत्यू नोंद क्रं.४८/२०२२ सी.आर.पी.सी.१७४ प्रमाणे नोंद केली आहे.

दरम्यान घटनास्थळी पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव व सहाय्यक फौजदार एम.ए.कुसारे यांनी भेट दिली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार कुसारे हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close