सहकार
…या पतसंस्थेचा नफा जाहीर
न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील डॉ.शरदचंद्र पवार नागरी सहकारी पतसंस्थेने ३१ मार्च रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात आर्थिक वर्षात पतसंस्थेला २ कोटी १७ लाख रुपयांचा ढोबळ नफा झाला असून सर्व तरतुदी करून निव्वळ नफा १ कोटी १४ लाख रुपये इतका झाला असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र रोहमारे यांनी दिली आहे.
“सहकारी पतसंस्था चळवळीत सर्वसामान्य ग्राहक,कर्जदार,ठेवीदार आणि सभासद यांच्या विश्वासास पात्र ठरत संस्था सातत्याने पुढे जात आहे.माजी आ.अशोक काळे व आ. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनामुळे संस्थेला भक्कम दिशा मिळाली असून संस्था प्रगतीच्या मार्गावर मार्गक्रमण करीत आहे.संस्थेने डिजिटल प्रणालीचा अवलंब करून ग्राहकांना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत” -मंगेश देशमुख,मुख्य व्यवस्थापक,डॉ.पवार पतसंस्था.
नुकतेच वित्तीय वर्षे संपले असून विविध सहकारी बँका आणि पतसंस्थांचा लेखा जोखा जाहीर होत आहे.त्यात आज कोपरगाव तालुक्यातील डॉ.शरदचंद्र पवार नागरी सहकारी बँकेने आपला ताळेबंद जाहीर केला आहे.त्यात संस्थेच्या आर्थिक प्रगतीचा आलेख मांडताना अध्यक्ष देवेंद्र रोहमारे यांनी सांगितले की,”सरत्या आर्थिक वर्षात संस्थेच्या ठेवींमध्ये तब्बल २१.६० टक्क्यांची मोठी वाढ झाली आहे तर एकूण ठेवींचा आकडा ५३ कोटी २४ लाखांवर पोहोचला आहे.संस्थेने कर्ज वाटपाचे धोरणही संतुलित ठेवले असून आजमितीस ४० कोटी ६८ लाख रुपयांचे कर्ज गरजवंतांना वितरण करण्यात आले आहे.संस्थेचे आर्थिक पाया मजबूत असल्याचे सिद्ध करणारे महत्त्वाचे गमक म्हणजे संस्थेकडे राखीव निधी व इतर फंड एकूण १३ कोटी ७२ लाख रुपयांचे आहे.तसेच संस्थेचे वसूल भागभांडवल १ कोटी ३३ लाख रुपये असून संस्थेची ३० कोटी ३३ लाख रुपयांची गुंतवणूक आहे.
बँकिंग क्षेत्रात एन.पी.ए.कर्जाचे प्रमाण हा चिंतेचा विषय असताना देखील पतसंस्थेने मात्र यावर प्रभावी नियंत्रण मिळवले आहे.संस्थेचे थकबाकीचे प्रमाण केवळ १.३४ टक्के असून ढोबळ एन.पी.ए.३.५२ टक्के आहे.संस्थेने आपला निव्वळ एन.पी.ए.सातत्याने ०% राखण्याची परंपरा याही वर्षी कायम ठेवली आहे.संस्थेच्या या कारभाराची दखल घेत आजवर संस्थेला ‘ब्ल्यु रिबीन’ आणि ‘दीपस्तंभ ‘ यांसारख्या प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
दरम्यान पतसंस्थेच्या यशाबद्दल माजी आ.अशोक काळे व आ.आशुतोष काळे यांनी संस्थेचे अध्यक्ष,उपाध्यक्ष,संचालक मंडळ,मुख्य व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
दरम्यान सहकारी पतसंस्था चळवळीत सर्वसामान्य ग्राहक,कर्जदार,ठेवीदार आणि सभासद यांच्या विश्वासास पात्र ठरत संस्था सातत्याने पुढे जात आहे.माजी आ.अशोक काळे व आ. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनामुळे संस्थेला भक्कम दिशा मिळाली असून संस्था प्रगतीच्या मार्गावर मार्गक्रमण करीत आहे.संस्थेने डिजिटल प्रणालीचा अवलंब करून ग्राहकांना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि पारदर्शक व्यवहारातून संस्थेचा स्वतःचा एक विश्वासू ग्राहकवर्ग तयार झाला आहे.या ग्राहकांचा विश्वास जपत यापुढील काळातही संस्था कायम प्रगती साधत राहील” असा विश्वास व्यवस्थापक मंगेश देशमुख यांनी व्यक्त केला आहे.



