सण-उत्सव
…या शहरात शारदीय नवरात्र उत्सवास प्रारंभ !

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
नवरात्रोत्सव संपूर्ण महाराष्ट्रात अतिशय उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरा केला जात आहे.आज कोपरगाव शहरातील उपनगर असलेल्या निवारा येथे साई निवारा मित्र मंडळाच्या वतीने त्यास प्रारंभ करण्यात आला असल्याची माहिती नगरसेवक जनार्दन कदम यांनी दिली आहे.त्याचे भाविक भक्तांनी स्वागत केले आहे.

“कोजागिरी पौर्णिमा उत्सव विविध स्पर्धा व बक्षिस वितरण समारंभ श्रीकांत दवंगे यांचे हस्ते,जितुभाई शहा,योगेश आसणे,गिरीश सोनेकर,सतिष गर्जे यांचे हस्ते संपन्न होणार असून रात्री ८:३० वाजता उपस्थित भाविकांना महाप्रसाद वितरीत करण्यात येणार आहे”- जनार्दन कदम,नगरसेवक,कोपरगाव नगरपरिषद.
नवरात्रोत्सव संपूर्ण महाराष्ट्रात अतिशय उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरा केला जात आहे.या नऊ दिवसांच्या उत्सवात ठिकठिकाणी आदिशक्तीची मनोभावे पूजा-अर्चा,घटस्थापना आणि दांडिया-गरब्याचे भव्य आयोजन केले जाते.पहिल्या दिवशी घराघरांमध्ये आणि सार्वजनिक मंडळांमध्ये देवीच्या मूर्तीची तसेच घटाची स्थापना करून नऊ दिवसांच्या उपवासाला सुरुवात होते.तरुण-तरुणी पारंपरिक पोशाख परिधान करून रात्री उशिरापर्यंत गरब्याच्या तालावर थिरकताना दिसणार आहे.नऊ दिवसांत दुर्गा देवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाणार आहे.

कोपरगाव शहरातील साई निवारा मित्र मंडळाच्या वतीने आज रात्री ८.३० वाजता समता पतसंस्थेचे संचालक संदीप कोयटे व स्वाती कोयटे,आदीश ठोळे व श्री साई संस्थानचे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रीतम वडगावे यांच्या हस्ते आरतीने प्रारंभ करण्यात आला आहे.

या उत्सवाचे निमित्ताने दि.१२ ऑक्टोबर रोजी दुपारी ०३ ते ०६ या वेळेत रांगोळी स्पर्धा,
रात्री ०८ वाजता महिलांसाठी विविध गुणदर्शन स्पर्धा आयोजित केल्या आहेत.तर मंगळवार दिनाक १३ ऑक्टोबर रोजी रात्री ०८ वाजता विविध नृत्य स्पर्धा,बुधवार दिनाक १४ ऑक्टोबर निवारा मित्र मंडळाच्या ११ व्या वर्धापन दिनी रात्री ०९ वाजता विनोदी कलाकार संदीप जाधव यांचा होम मिनिस्टर कार्यक्रम आदी महत्वाचे कार्यक्रम संपन्न होणार आहे.
दरम्यान या नऊ दिवसाच्या कालखंडात आ.आशुतोष काळे,कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप डमाळे,सम्राट वर्मा,हिरेन पापडेजा,नगरसेविका निर्मला सोमनाथ आढाव,राज्य फेडरेशनचे कार्याध्यक्ष ओमप्रकाश कोयटे,माजी नगराध्यक्षा सुहासिनी कोयटे,सुधीर डागा,वल्लभ पटेल,जयंती पटेल,बाबासाहेब कापे,सतिश गुजराथी, मधुकर साखरे,प्रतिक बोरावके,ऋषिकेश भंडारे,प्रशांत शिंदे,सुहास लाटे,संजय निसाळ,सुनिल निसाळ,भालचंद्र विभुते,सुनिल पटेल,संदीप चौधरी,अनिल कादबने,किरण झावरे,संतोष सोळंके,संजय शेटे,जालिंदर येवले,सचिन भडकवाडे (अध्यक्ष-लायन्स क्लब,कोपरगाव),मिलींद कपोते,संतोष भुसारे,महेश राऊत,संतोष भट्टड,अरविंद पटेल उपाध्यक्ष,समता पंतसंस्था,सचिन भट्टड (महाव्यवस्थापक समता पंतसंस्था)सुरेंद्र व्यास,बापुसाहेब इनामके,रमेश सानप,डॉ. मोहन सांगळे,सुनिल देवकर,सुशील कोळपे,राजेंद्र सांगळे,चेतन कहांडळ, गायकवाड,योगेश जोशी,विजय हाडके, अभिषेक नरोडे,राजेंद्र सालकर,सतिष जाधव, रूपेश शिरोडे,विष्णु हाडके,सचिन वैष्णव तुषार,भावसार,अमोल राजुरकर,कृष्णा दुसाने, पवन चिखले,तुषार घोडके,शुभम सोनेकर,किरण भारसकर,संदिप ठोके,दिपक रजपूत,राजेंद्र लवांडे,सुनील क्षीरसागर,संजय पोटे,संजय अधिकार,प्रमोद कवाडे,सचिन कदम,राजेंद्र गोरे आदी उपस्थित राहणार आहे.
दरम्यान कोजागिरी पौर्णिमा उत्सव विविध स्पर्धा व बक्षिस वितरण समारंभ श्रीकांत दवंगे यांचे हस्ते,जितुभाई शहा,योगेश आसणे,गिरीश सोनेकर,सतिष गर्जे यांचे हस्ते संपन्न होणार असून रात्री ८:३० वाजता उपस्थित भाविकांना महाप्रसाद वितरीत करण्यात येणार असल्याची माहिती नगरसेवक जनार्दन कदम यांनी शेवटी दिली आहे.


