सण-उत्सव
ध्वनिक्षेपक नियमांचे उल्लंघन करू नका-…पोलिस निरीक्षक

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
शारदीय नवरात्र हा हिंदू धर्मातील एक उत्सव हा वर्षातील एक महत्वाचा सण मानला जात असून तो जवळ आल्याने विविध नवरात्र उत्सव मंडळानी आपली तयारी जोरात सुरू केली असताना कोपरगाव तालुका पोलिस अधिकारी संभाजी गायकवाड यांनी हा उत्सव आपल्या कार्यक्षेत्रात उत्साहात आणि कायद्याचे पालन करत शांततेत पार पाडावा या साठी नुकतीच विविध मंडळांची एक बैठक घेतली असून त्यांना कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याच्या सूचना दिल्या आहेत.

“कोपरगाव तालुका हद्दीतील मंडळानी हा नवरात्र उत्सव शांततेत पार पडण्याचे आवाहन केले आहे.कोणीही वीणा परवाना देवी मंडळ स्थापन करू नये.त्यासाठी ऑनलाईन परवानगी देण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.या शिवाय कोणीही आक्षेपार्ह देखावे प्रदर्शित करू नये.सर्वोच्च न्यायालयाच्या ध्वनी क्षेपकाबाबत आदेशाचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी”-संभाजी गायकवाड,पोलिस निरीक्षक,कोपरगाव शहर पोलिस ठाणे.
शारदीय नवरात्र हा हिंदू धर्मातील एक उत्सव तसेच देवीशी संबंधित व्रत आहे.वासंतिक नवरात्रात चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमीपर्यंत व शारदीय नवरात्रात आश्विन शुद्ध प्रतिपदा ते आश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते.शारदीय नवरात्र हे शाक्तपंथीय मानले जाते.शारदीय म्हणण्याचे कारण इतकेच की हे शरद ऋतूच्या प्रारंभी येते.भारतामध्ये सर्वत्र ह्या नवरात्रामध्ये प्रत्येकाच्या कुलाचाराप्रमाणे कमी-अधिक स्वरूपात पूजा-कृत्य घडते.दुर्गोत्सव हा वर्षातून शरद ऋतू व वसंत ऋतूतही साजरा करण्याची प्रथा असल्याचे काही ग्रंथांतून दिसून येते.दुर्गा देवतेचे माहात्म्य भविष्य पुराणात कथन केलेले आढळते.महिन्यात घटामध्ये देवीची स्थापना करून,नंदादीप प्रज्वलित करून आदिमायेची नऊ दिवस मनोभावे पूजा करणे,म्हणजेच घटस्थापना किंवा नवरात्रोत्सव मानला जातो.देशभरात हा उत्सव आगामी काळात रविवार दि.11 ऑक्टोबर 2026 पासून उत्साहात संपन्न होत असून त्याची जोरदार तयारी सुरू आहे.कोपरगाव तालुका त्याला अपवाद नाही.कोपरगाव तालुक्यात या उत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे.मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने हा उत्सव शांततेत आणि वीणा डी.जे.पार पडावा यासाठी तालुका पोलिस प्रशासन तयारीला लागले असल्याचे दिसून येत आहे.कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी आज दुपारी 02 वाजता विविध देवी मंदिरांचे विश्वस्त मंडळ,देवी मंडळांचे अध्यक्ष,पदाधिकारी,पोलिस पाटील यांना यासाठी निमंत्रित केले होते.

दरम्यान त्यावेळी बोलताना पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी संबंधितांना मार्गदर्शन करताना कोपरगाव तालुका हद्दीतील मंडळानी हा नवरात्र उत्सव शांततेत पार पडण्याचे आवाहन केले शिवाय कोणीही वीणा परवाना देवी मंडळ स्थापन करू नये.त्यासाठी ऑनलाईन परवानगी देण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.या शिवाय कोणीही आक्षेपार्ह देखावे प्रदर्शित करू नये.सर्वोच्च न्यायालयाच्या ध्वनी क्षेपकाबाबत आदेशाचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे.या शिवाय सायबर गुन्ह्याबाबत जनजागृती करून नागरिकांना सावध राहण्याच्या सूचना केल्या आहेत.यावेळी बहुसंख्येने मंडळांचे प्रतिनिधी,विविध न्यासाचे,मंडळांचे अध्यक्ष उपस्थित होते.



