जाहिरात-9423439946
व्यक्ती विशेष

सरळ साध्या मनाचा माणूस-अशोक रोहमारे (अण्णा)

न्यूजसेवा

कोपरगाव -(नानासाहेब जवरे)

   कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व माजी आ.स्व.के.बी.रोहमारे यांचे ज्येष्ठ सुपुत्र अशोक रोहमारे यांच्या ८१ व्या अभिष्टचिंतन सोहळ्या निमित उद्या दिनाक १४ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजता त्यांचा जाहीर सत्कार समारंभ आणि ग्रंथतुला आयोजित केली असून हा समारंभ जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या अध्यक्षतेखाली व आ.आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.तरी या सोहळ्यास आपली शिक्षण प्रेमी नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन के.जे.सोमैया महावदियालयाचे प्राचार्य डॉ.विजय ठाणगे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.त्या निमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला वेध.

केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याकडून पुरस्कार स्वीकारताना अशोक रोहमारे दिसत आहेत.

कोपरगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे म्हणजे अण्णा एक साधा आणि सरळ माणूस गणले जातात.त्यांना कुटिल डाव आणि वाकडेतिकडे राजकारण यात मुळीच रस नाही.त्यांना सरळ धोपट मार्ग सोडून वाकड्यातिकड्या मार्गाने धावणे आवडत नाही.समोरच्याला न जोखता पटकन विश्वास ठेवण्याच्या त्यांच्या सवयीमुळे बऱ्याच वेळा त्यांनी अनेक संकटे स्वतः ओढवून घेतल्याची अनेक उदाहरणे आहेत,मात्र त्यांच्या या साध्या सरळ स्वभावाने कोणी दुखावले तरी अण्णाचे कोणी मनावर घेत नाही.

   कोपरगावचे माजी आ.के.बी.रोहमारे हे जिल्ह्याचे तत्कालीन सत्तरच्या दशकातील उतुंग व्यक्तिमत्व होते.यांनी कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण भागात सर्व प्रथम वीज आणली होती.अनेक रस्ते व आणि विविध समस्या मार्गी लावल्या होत्या.त्यांचा दरारा इतका होता की,माजी मंत्री कोल्हे आणि माजी खा.शंकरराव काळे ही त्यांना वचकून असत.त्यांनीच संजीवनी सहकारी साखर कारखान्याची मुहूर्तमेढ रोवली होती.त्या आधी कोपरगाव सहकारी साखर कारखाण्याच्या उभारणीत त्यांनी संस्थापक ग.र.औताडे यांना मोठी साथ दिली होती.त्यांनीच कोपरगाव येथील के.जे.सोमय्या महाविद्यालयाची उभारणी केली होती.त्यावेळी शेतकऱ्यांना खाजगी सावकारीतून मुक्त करण्यासाठी ग्रामीण भागात सेवा सहकारी संस्था स्थापन केल्या होत्या.आजही त्यांच्या या संस्था त्यांच्या या कार्याची साक्ष देताना दिसत आहेत.शिवाय त्यांचा राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण त्यानंतर वसंत दादा पाटील यांच्याशी मोठा स्नेह होता.त्यानंतर त्यांचे ऋणानुबंध जुळले तर मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचेशी.त्यांच्या सहाय्याने त्यांनी कोपरगाव सह जिल्ह्याचे अनेक प्रश्न मार्गी लावले होते.अहिल्यानगरची जिल्हा सहकारी बँकेचे ते संस्थापक होते.

मुंबई वि‌द्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.भालचंद्र मुणगेकर यांच्या शुभहस्ते देऊन गौरव करण्यात आला मी क्षण.

अशोक रोहमारे यांनी कोपरगाव एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदाची धुरा खांद्यावर घेतली तेव्हा केवळ १२०० वि‌द्यार्थी संख्या असलेल्या सोमैया महावि‌द्यालयात आज ६५०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.यातच त्यांचे कार्य सामावले आहे.एवढेच नाही तर त्यांनी चासनळी,जवळके आदी ठिकाणी आपल्या संस्थेचे जाळे विणून ग्रामीण विद्यार्थी आणि विद्यार्थिनीसाठी शिक्षणाची गंगा ग्रामीण भागात निर्माण करून दिली आहे.त्यामुळे मुलींचे शिक्षणाचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे.

   माजी आ.के.बी.रोहमारे यांचे निधनानंतर त्यांचे कार्याची जबाबदारी त्यांचे जेष्ठ सुपुत्र अशोक रोहमारे यांचे शिरावर आली होती.ती त्यांनी आजतागायत यशस्वीपणे पार पाडली आहे.त्यांचा मितभाषी स्वभाव असल्याने त्यांनी राज्यात आणि देशात अनेक मित्र जोडले आहेत.आपल्या स्वभावाने राज्याचे हेडमास्तर म्हणून ज्यांची ओळख होती ते माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण त्यानंतर त्यांचे सुपुत्र मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण,माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे यांचेशी चांगले संबंध ठेवून आपल्या शिक्षण संस्थेचे मोठे जाळे विणले आहे.आज कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचा मोठा वटवृक्ष झाला आहे.त्यात त्यांचे मोठे योगदान आहे.हे वेगळे सांगण्याची गरज नाही.कोपरगाव एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदाची धुरा खांद्यावर घेतली तेव्हा केवळ १२०० वि‌द्यार्थी संख्या असलेल्या सोमैया महावि‌द्यालयात आज ६५०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.यातच त्यांचे कार्य सामावले आहे.एवढेच नाही तर त्यांनी चासनळी,जवळके आदी ठिकाणी आपल्या संस्थेचे जाळे विणून ग्रामीण विद्यार्थी आणि विद्यार्थिनीसाठी शिक्षणाची गंगा ग्रामीण भागात निर्माण करून दिली आहे.त्यामुळे मुलींचे शिक्षणाचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे.कोपरगाव येथील आपल्या महाविद्यालयात त्यांनी मागील वर्षी पासून डाटा सायन्स व जगात बहुचर्चित ए.आय.पदवीचे शिक्षण उपलब्ध करून देऊन क्रांती घडवली आहे.विशेष म्हणजे त्यांचे शिक्षण सर्व शिष्यवृत्तीतून होत आहे हे विशेष ! यातून त्यांची दूरदृष्टी दिसून येत आहे.त्यांच्या या शैक्षणिक,सामाजिक योगदानाची दखल घेऊनच माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या शुभहस्ते ‘इंदिरा गांधी सद्भावना पुरस्कार’ तसेच प्रवरानगरचा शैक्षणिक-सामाजिक कार्यासाठी असलेला,’जीवनगौरव पुरस्कार’ माजी खासदार व मुंबई वि‌द्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.भालचंद्र मुणगेकर यांच्या शुभहस्ते देऊन गौरव करण्यात आला आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही.समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहिलेल्या मूकबधिर विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ‘ज्ञान’ व ‘आत्मविश्वास’ यांचा प्रकाश पेरणारे एक निःस्वार्थी व्यक्तिमत्व म्हणून त्यांची गणना होत आहे.त्यांना केवळ शिक्षणच दिले नाही,तर सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात सन्मानाने जगण्याची उमेद दिली आहे.त्यांच्या या कार्यामुळे मूकबधिर विद्यार्थी आज सक्षम,आत्मनिर्भर आणि स्वाभिमानी जीवन जगत आहेत.

एका कार्यक्रमस्थळी बोलताना अशोक रोहमारे दिसत आहेत.

   आमदार पुत्र असूनही समाजसेवेचा मार्ग स्विकारून ग्रामीण विद्यार्थ्यांसह दिव्यांगांच्या जीवनात स्थैर्य निर्माण करणारे निस्पृह व्यक्तिमत्त्व अशोकराव रोहमारे यांचे ८० व्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन आणि ग्रंथतुला आयोजित केली असून हा समारंभ जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या अध्यक्षतेखाली व आ.आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवार,दि.१४ मार्च सायंकाळी ५.३० वा.संपन्न होणार आहे.तरी या सोहळ्यास नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजक व अशोक रोहमारे अभिष्टचिंतन सोहळा समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे,समितीचे आदींच्या वतीने निमंत्रक प्राचार्य डॉ.विजय ठाणगे आदींनी केले आहे.

  कोपरगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे म्हणजे अण्णा एक साधा आणि सरळ माणूस गणले जातात.त्यांना कुटिल डाव आणि वाकडेतिकडे राजकारण यात मुळीच रस नाही.त्यांना सरळ धोपट मार्ग सोडून वाकड्यातिकड्या मार्गाने धावणे आवडत नाही.समोरच्याला न जोखता पटकन विश्वास ठेवण्याच्या त्यांच्या सवयीमुळे बऱ्याच वेळा त्यांनी अनेक संकटे स्वतः ओढवून घेतल्याची अनेक उदाहरणे आहेत.त्यात अनेक मित्र असतील अनेक अधिकारी आणि त्यांचे कर्मचारी असतील.मात्र त्यांच्या या साध्या सरळ स्वभावाने कोणी दुखावले तरी अण्णाचे कोणी मनावर घेत नाही.त्यामुळे अनेक जण यांच्या प्रेमात पडताना दिसून येत असतात.अनेक वेळा राजकारण त्यांचा प्रांत नसताना त्यांनी त्या प्रांतात प्रवेश करून पहिला आहे.मात्र त्यात काही वंगाळ आढळले तर त्यांनी त्या क्षणी तो पक्ष किंवा आघाडी सोडायला मागेपुढे पाहिले नाही.शब्दाचा हा पक्का माणूस.चुका स्वीकारल्या की त्या कमी होतात आणि लपवल्या की वाढतात,रस्ता चुकणे हे चुकीचे नसते मात्र रस्ता चुकत आहे हे समजून पण काही जण त्याच रस्त्याने जात राहतात ते मात्र चुकीचे आहे.त्याचा त्यांना भलताच राग येताना देऊन येतो आणि तो वाजवी समजला पाहिजे.अनैसर्गिक कर्मामुळे मनावर मोठ्या प्रमाणावर ताण निर्माण होतो यावर त्यांचा मोठा भर.त्यांच्या या सामाजिक आणि शैक्षणिक कामाला बंधू रावसाहेब रोहमारे,धर्मपत्नी शोभाताई रोहमारे,मुलगा संदीप रोहमारे,सुजित रोहमारे,त्यांचे विश्वस्त,प्राचार्य,महाविद्यालयीन कर्मचारी वृंद आदींचे सहकार्य लाभत असल्याचे आवर्जून नमूद करतात.अशा सरळ आणि प्रेमळ माणसाला खूप खूप शुभेच्छा !

प्रतिक्रिया मो.-९४२३ ४३ ९९४६.

*पत्रकार नानासाहेब जवरे* यांच्या विश्वसनीय बातम्यासाठी *’न्यूजसेवा‘* वाचा आणि खालील लिंकवर क्लिक करून ग्रुप’मध्ये सामील व्हा. https://bit.ly/newsseva2025
*न्यूजसेवा* डिजिटल युग डिजिटल बातमी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close