जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
वन्य जीव

…या तालुक्यात पुन्हा बिबट्याच्या धुमाकूळ !

न्यूजसेवा

कोपरगांव -(प्रतिनिधी)

  कोपरगाव तालुक्यात गत वर्षी बिबट्याने एक महिला आणि एक लहान मुलीचा फडशा पडल्यावर त्याचे पडसाद देशभर उमटले होते.त्यानंतर वन विभागाने जागृत होतं सर्व बिबटे पिंजऱ्यात घालून अन्यत्र सोडले असताना काल रात्री पुन्हा एकदा संवत्सर शिवारात गायकवाड वस्तीवर बिबट्याने कुक्कुट पालन शेडमध्ये प्रवेश करून तेथील वीसहून अधिक कोंबड्यांचा फडशा पाडून सुमारे तीस हजाराहून अधिक नुकसान केले आहे.त्यामुळे हे ओंकार रमेश गायकवाड कुटुंब सैरभैर झाले असून त्यांना वन विभागाने हातभार लावण्याची गरज निर्माण झाली असल्याचे बोलले जात आहे.

  

संवत्सर येथे पुन्हा एकदा बिबट्याने आपले दर्शन गायकवाड वस्तीवर देऊन शेतकऱ्यांमध्ये दहशत पसरवली आहे.दि.27 जुलैच्या रात्री गायकवाड वस्तीवर सामसुम झाली असल्याचे पाहून त्याने आपला मोर्चा या वस्तीवर वळवला असल्याचे दिसून आले आहे.त्याने कुक्कुट पालन असलेल्या शेडची जाळी तोडून आत प्रवेश केला असल्याचे निदर्शनास आले आहे.व आतील 30 हजारहून अधिक रुपयांच्या जवळपास वीसहून अधिक कोंबड्या गारद केल्या असून अजूनही तो या परिसरात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

    संवत्सर गांवचा परीसर आठ ते नऊ वाड्या वस्त्यांनी विस्तारलेला आहे.परिसरात ऊस व मका पिकांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे.याचाच फायदा घेऊन गत वर्षी 01 एप्रिल 2025 रोजी बिबटे रात्रंदिवस आता मानवी वाड्या वस्त्यांमध्ये संचार करु लागले होते.उन्हाळ्याचे दिवस असल्याने जंगल भागात खाण्याबरोबरच पिण्याच्या पाण्याची सोय राहिली नसल्याने जंगली प्राण्यांचा आता पाण्याच्या शोधात मानवी वस्त्यांमधून वावर सुरु झालेला होता.दि.३० व दि.३१ एप्रिल रोजी असे सलग दोन दिवस लक्ष्मणवाडी (पढेगांव चौकी) भागात प्रतशील शेतकरी बापुसाहेब लक्ष्मणराव परजणे व सूर्यभान लक्ष्मणराव परजणे यांच्या वस्तीजवळ रात्रीच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाले होते.त्याने कुत्र्याला ठार करुन त्याला फस्त केले होते.त्याभागातील  कुत्र्यांची आणि मोरांची संख्याही लक्षणीयरीत्या कमी झाली असल्याचे आढळून आले होते.त्यानंतर पुन्हा बिबट्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत.

   संवत्सर येथे पुन्हा एकदा बिबट्याने आपले दर्शन गायकवाड वस्तीवर देऊन शेतकऱ्यांमध्ये दहशत पसरवली आहे.त्यामुळे शेळी आणि पोल्ट्रीधारक मोठ्या प्रमाणावर धास्तावले आहेत.दिनांक 27 जुलैच्या रात्री गायकवाड वस्तीवर सामसुम झाली असल्याचे पाहून त्याने आपला मोर्चा या वस्तीवर वळवला असल्याचे दिसून आले आहे.त्याने कुक्कुट पालन असलेल्या शेडची जाळी तोडून आत प्रवेश केला असल्याचे निदर्शनास आले आहे.व आतील जवळपास वीसहून अधिक कोंबड्या गारद केल्या असून अजूनही तो या परिसरात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.त्यामुळे गायकवाड वस्ती आणि परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांत भिंतीचे वातावरण पसरले आहे.

   दरम्यान याबाबत कोपरगाव येथील वन विभागाचे अधिकारी मेहबूब शेख यांनी घटनास्थळी भेट दिली असून गायकवाड कुटुंबियांना दिलासा दिला असून त्या ठिकाणी बिबट्याला अडकविण्यासाठी पिंजरा लावण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती शिवाजी गायकवाड यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close