भूजल प्रदूषण
प्रदूषण महामंडळाचा अहवाल प्राप्त,शेतकऱ्यांचा आरोपाला पुष्टी,कंपनीला लागणार कुलूप ?

न्यूजसेवा
रविवार विशेष
कोपरगाव (नानासाहेब जवरे)
कोपरगाव आणि येवला तालुक्यातील सीमारेषेवर असलेल्या नाटेगाव,बदापूर,नांदेसर,पिंपळगाव जलाल,येसगाव,खिर्डी गणेश आदी सहा गावातील भूजल प्रदूषित करून कृषीक्षेत्र उध्वस्त करणाऱ्या मे.कृष्णा एन्झायटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या शेती क्षेत्रात सोडण्यात येणाऱ्या सांड पाण्याचे अहवाल नुकतेच प्राप्त झाले असून सदरचे पाणी मोठ्या प्रमाणावर दूषित असल्याचे उघड झाल्याने या गावातील शेतकऱ्यांनी सदर कंपनी बंद करावी अशी महत्वाची मागणी नाशिक जिल्हाधिकारी यांचेकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी केलेल्या आरोपाला पुष्टी मिळाली असून शेतकऱ्यांनी निम्मी लढाई जिंकली असल्याचे मानले जात असून आगामी काळात या कंपनीला कुलूप लागणार असल्याचे बोलले जात आहे.

“सदर कंपनी प्रतिदिन दोन लाख लिटरचा पाणी वापर करत असून त्यांचे प्रशासन ग्रामपंचायत आणि सरकार यांचा अनेकवर्षापासून लाखो रुपयांचा महसूल बुडवत आहे.हि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प खर्चिक असल्याने संबंधित कंपनी त्याला फारकत देत आहे.शिवाय कंपनीचा परवाना मुदत मार्च महिन्यात संपलेली असताना सदर कंपनी बेकायदा सुरू असून सरकारच्या डोक्यावर मिरे वाटत आहे.परिणामी आपण शेतकरी संघटनेच्या वतीने आगामी काळात सरकारच्या हरित लवादाकडे या प्रश्नी दाद मागणार आहे”-नानासाहेब महिपती मोरे,कार्यकर्ते शेतकरी संघटना.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की,”येवला तालुक्यातील नांदेसर शिवारात मेसर्स कृष्णा एन्झायटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची सन-२०१२ साली स्थापना करण्यात आली असून या ठिकाणी कंपनी प्रोटीन पावडर आणि प्रॉपिंग या विषारी रासायनिक पदार्थांचे उत्पादन करत आहे.आणि त्याचे सांडपाणी कोपरगाव आणि येवला तालुक्याच्या सीमेवर असलेल्या नांदेसर,नाटेगाव,बदापूर,पिंपळगाव जलाल,येसगाव,खिर्डी गणेश आदी सहा गावातील नैसर्गिक ओढ्यात सोडून देण्यात येत आहे.परिणामी या ओढ्यातील कंपनीने सोडून दिलेले पाणी नजीकच्या विहिरीत उतरत असून येथील कृषी क्षेत्र धोक्यात आले आहे.शिवाय भूजल दूषित झाले आहे.परिणामी या दूषित पाण्यामुळे नजीकच्या शेत तलावातील मासे मृत झाले असल्याच्या बातम्या या पूर्वीच ‘ न्युजसेवा ‘ या वेब पोर्टलवर मे महिन्यात प्रसिद्ध झाल्या आहेत.हेच पाणी पुढे गोदावरी नदीत प्रवाहित होत असून हेच पाणी जायकवाडी धरणात जात असून पुढील लाखो शेतकऱ्यांना ते कृषी आणि पिण्याचे पाण्यासाठी वापरले जात आहे.शिवाय आगामी काळात सिंहस्थ पर्वणी आली असताना याच पाण्यात भाविक भक्त पवित्र स्नान करणार आहे.त्यात श्री क्षेत्र सरला बेट आणि पुढे नेवासा येथील किसनगिरी महाराज यांचे संस्थान आणि पुढे जायकवाडीचा १०२ टी.एम.सी.चा जायकवाडीचा मोठा जलाशय आहे हे विशेष ! भविष्यात काही अनर्थ झाला तर काय होईल याची कल्पना न केलेली बरी.म्हणूनच याची गंभीर दखल घेत शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सदर घटनास्थळी भेट देऊन या शेतकऱ्यांना आपला पाठिंबा दर्शवला होता.त्यावेळी त्यांना दिशा दिली होती.त्यानंतर संबंधितांनी जिल्हाधिकारी,येवला तहसीलदार आदींना निवेदने देऊन सदरचे पाणी बंद करण्याची मागणी केली होती.याशिवाय त्याबाबत नाशिक प्रदूषण महामंडळाकडे रीतसर लेखी तक्रारी करण्यात आल्या होत्या.त्याचे अहवाल नुकतेच प्राप्त झाले असून त्यात प्रदूषण महामंडळाने शेतकऱ्यांच्या आरोपाला दुजोरा देऊन शिक्कामोर्तब केले आहे.त्यात त्यांनी जल (प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण) कायदा,१९७४ च्या कलम ३३ ‘अ’ आणि हवा (प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण) कायदा,१९८१ च्या कलम ३१ ‘अ’ याचे या मे.कृष्णा एन्झायटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने उल्लंघन केले असल्याचे उघड-उघड म्हटले आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रादेशिक कार्यालय,नाशिक यांनी मे.कृष्णा एन्झायटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीस यापूर्वीच दि.०६.मे २०२० रोजी कारणे दाखवा नोटीस’ बजावली असल्याचे यात उघड झाले आहे.दिलेल्या अहवालात महामंडळाने जुने ‘सहमती पत्र’ दि.३१ मार्च २०२६ पर्यंतच वैध असल्याचे उघड झाले आहे.याशिवाय नूतनीकरणाचा कंपनीचा अर्ज दि.०४ मार्च २०२६ रोजी फेटाळण्यात आला आहे.शिवाय सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (ई.टी.पी.) दीर्घकाळापासून बंद अवस्थेत आढळला असल्याची कबुली दिली आहे.वीज पुरवठा खंडित झाल्यास इ.टी.पी.चालवण्यासाठी पर्यायी वीज पुरवठ्याची व्यवस्था केलेली नसल्याचे व अशुद्ध सांडपाणी आवाराबाहेर सोडल्याचे आढळून आले असल्याचे म्हटले आहे.संमती पत्रानुसार फक्त एकाच बॉयलरची स्थापना आणि वापर करण्यास परवानगी असताना,प्रत्यक्षात ४ बॉयलर स्थापित करून चालवले जात असल्याचे उघड झाले आहे.उद्योगाच्या आवाराबाहेर सांडपाणी सोडल्याचे (साचल्याचे) अंश आढळून आले असल्याचे स्पष्ट म्हटले आहे.
दरम्यान महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रादेशिक कार्यालय,नाशिक यांनी सदर कंपनीस यापूर्वीच दि.०६.मे २०२० रोजी कारणे दाखवा नोटीस’ बजावली असल्याचे यात उघड झाले आहे.दिलेल्या अहवालात महामंडळाने जुने ‘सहमती पत्र’ दि.३१ मार्च २०२६ पर्यंतच वैध असल्याचे उघड झाले आहे.याशिवाय नूतनीकरणाचा कंपनीचा अर्ज दि.०४ मार्च २०२६ रोजी फेटाळण्यात आला आहे.शिवाय सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (ई.टी.पी.) दीर्घकाळापासून बंद अवस्थेत आढळला असल्याची कबुली दिली आहे.वीज पुरवठा खंडित झाल्यास इ.टी.पी.चालवण्यासाठी पर्यायी वीज पुरवठ्याची व्यवस्था केलेली नसल्याचे व अशुद्ध सांडपाणी आवाराबाहेर सोडल्याचे आढळून आले असल्याचे म्हटले आहे.संमती पत्रानुसार फक्त एकाच बॉयलरची स्थापना आणि वापर करण्यास परवानगी असताना,प्रत्यक्षात ४ बॉयलर स्थापित करून चालवले जात असल्याचे उघड झाले आहे.उद्योगाच्या आवाराबाहेर सांडपाणी सोडल्याचे (साचल्याचे) अंश आढळून आले असल्याची कबुली दिली परिणामी जवळील तलावाकाठी मृत मासे आढळून आले,जे जलचर पर्यावरणावर प्रतिकूल परिणाम झाल्याचे दर्शवतात.उद्योगातून सोडलेल्या अशुद्ध सांडपाण्यामुळे जवळील तलाव आणि गट क्र.९५,नंदेसर शिवारातील विहीर दूषित झाल्याचे आढळून आले असून शेतकऱ्यांनी केलेल्या आरोपाला दुजोरा दिला आहे.शिवाय सदर कृष्णा इन्फोटेक कंपनीने ०६ मे २०२६ रोजी बजावलेल्या ‘कारण दाखवा’ नोटीसचे पालन केलेले नाही असे स्पष्ट म्हटले आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी केलेल्या आरोपाला नाशिक येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रादेशिक कार्यालयाने दुजोरा दिला आहे.

नाशिक येथील प्रदूषण महामंडळाने प्रदूषण महामंडळाने या परिसरातील पाण्याचे नमुने तपासले असता त्यात पी.एच.९.७ पर्यंत असून टी.डी.एस.चे प्रमाण साधारण पाण्याचा टी.डी.एस.१५०-२५० असताना तो कंपनीकडून तब्बल ४२६९ एम.जी.एल.या भीषण पातळीवर पोहोचला असल्याचे उघड झाले आहे.परिणामी या परीसरातील ३८ गावे पाणी योजनेपासून वंचित राहण्याचा धोका निर्माण झाली आहे.भूगर्भातील विहिरी व बोरवेलचे पाणी रासायनिक कचऱ्यामुळे पूर्णपणे दूषित झाल्यामुळे या परीसरातील रहिवाशांना पिण्यासाठी व वापरासाठी शुद्ध पाणी उपलब्ध होणे कठीण बनले आहे.मात्र यात सत्ताधारी भाजपचे विद्यमान लोकप्रतिनिधी यांचे गाव असताना त्यांचे मौन धोकादायक मानले जात असल्याची चर्चा शेतकऱ्यांत सुरू आहे.
दरम्यान याबाबत प्रदूषण महामंडळाने या परिसरातील पाण्याचे नमुने तपासले असता त्यात पी.एच.९.७ पर्यंत असून टी.डी.एस.चे प्रमाण साधारण पाण्याचा टी.डी.एस.१५०-२५० असताना तो कंपनीकडून तब्बल ४२६९ एम.जी.एल.या भीषण पातळीवर पोहोचला असल्याचे उघड झाले आहे.परिणामी या परीसरातील ३८ गावे पाणी योजनेपासून वंचित राहण्याचा धोका निर्माण झाली आहे.भूगर्भातील विहिरी व बोरवेलचे पाणी रासायनिक कचऱ्यामुळे पूर्णपणे दूषित झाल्यामुळे या परीसरातील रहिवाशांना पिण्यासाठी व वापरासाठी शुद्ध पाणी उपलब्ध होणे कठीण बनले आहे.गावात ‘३८ गाव पाणीपुरवठा योजना’ कार्यरत असतानाही त्यांच्यावर टांगती तलवार निर्माण झाली असल्याचा येथील ग्रामस्थांचा आरोप आहे.
दरम्यान याबाबत आमच्या प्रतिनिधीने संबंधित शेतकऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी,”सदर कंपनी प्रतिदिन दोन लाख लिटरचा पाणी वापर करत असून त्यांचे प्रशासन ग्रामपंचायत आणि सरकार यांचा अनेकवर्षापासून लाखो रुपयांचा महसूल बुडवत आहे.हि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प खर्चिक असल्याने संबंधित कंपनी त्याला फारकत देत आहे.शिवाय कंपनीचा परवाना मुदत मार्च महिन्यात संपलेली असताना सदर कंपनी बेकायदा सुरू असून सरकारच्या डोक्यावर मिरे वाटत आहे.परिणामी आपण शेतकरी संघटनेच्या वतीने आगामी काळात सरकारच्या हरित लवादाकडे या प्रश्नी दाद मागणार असल्याची माहिती नानासाहेब महिपती मोरे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना शेवटी दिली आहे.दरम्यान शेतकऱ्यांच्या या लढ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.