भारतीय रेल्वे
शिर्डीसह परिसरातील रेल्वे प्रकल्पांना मिळणार गती- रेल्वे मंत्र्यांचे आश्वासन

न्यूजसेवा
कोपरगांव -(प्रतिनिधी)
शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी आपल्या मतदार संघातील विविध रेल्वे मार्गाबाबत लोकसभेत तारांकित उपस्थिती केले असता रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांनी बेलापूर-परळ थेट रेल्वे जोडणीसह नाशिक रोड-साईनगर शिर्डी नवीन रेल्वेमार्ग (९५ कि.मी.) या प्रस्तावाचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला असल्याची माहिती देऊन जुना नाशिक पुणे हा मार्ग पूर्ववत सुरू करावा अशी मागणी केली असल्याची माहिती दिली असल्याने दुष्काळी गावातील ग्रामस्थानी समाधान व्यक्त केले आहे.

“नाशिक-पुणे लोहमार्ग 2012 मध्ये सर्वे होउन मंजूर झाला आहे.तर जमीन अधिग्रहणाचे काम सुरु झालेले होते.हा प्रकल्प नारायणगांव तालूका जुन्नर (पुणे) येथील दुर्बिणीच्या कारणास्तव मार्ग बदलविण्याचे चालू आहे.त्यामुळे अकोले,संगमनेर-जुन्नर येथील सर्व जनतेमध्ये असंतोष व आकोश आहे.जनता आंदोलन करत आहे.त्यामुळे नाशिक-पुणे लोहमार्गामध्ये बदल न करता सन-2012 च्या मंजुरीप्रमाणे कार्यान्वित करण्यात यावा”-खा.भाउसाहेब वाकचौरे,शिर्डी लोकसभा मतदार संघ.
अहिल्यानगर जिल्ह्यातील अर्धवट रेल्वे प्रकल्प हे स्थानिकांसाठी चिंतेचा विषय बनले आहेत,प्रामुख्याने अहिल्यानगर-बीड-परळी वैजनाथ नवीन रेल्वे मार्ग आणि प्रलंबित छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर रेल्वे लाईन डीपीआर मुळे जिल्ह्याच्या विकासावर मोठा परिणाम करत आहेत.हमदनगर-बीड-परळी मार्ग: २६१.३ किमी लांबीचा हा नवीन ब्रॉडगेज प्रकल्प निधी आणि जमिनीच्या कमतरतेमुळे वर्षांनुवर्षे रखडला आहे.छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर रेल्वे८५ कि.मी.चा हा दुहेरी मार्ग अद्याप डी.पी.आर.आणि मंजुरीच्या टप्प्यातच अडकलेला आहे पुणे-नाशिक रेल्वे मार्गास शिर्डी मार्गे नेण्यास स्थानिकांचा विरोध आहे तर जवळके,बहादरपूर,सायाळे,बहादराबाद,धोंडेवाडी,वेस सोयगाव,अंजनापुर,शहापूर आदी गावांचे जोरदार समर्थन मिळत आहे.परिणामी संगमनेर मार्गे जाणाऱ्या या बहुप्रतिक्षित प्रकल्पाच्या भवितव्याबद्दल संभ्रम आहे,त्यामुळे उतर अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध प्रकल्पाबाबत शिर्डीचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी नुकताच तारांकित प्रश्न क्र.151 द्वारे रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांचे लक्ष वेधून घेतले होते.त्यावेळी त्यांनी हे उत्तर दिले आहे.

“शिर्डी आणि परिसरातील शेतकऱ्यांना आणि रेल्वे प्रवाशांना महत्वाचा ठरणारा नाशिक रोड-साईनगर शिर्डी नवीन रेल्वेमार्ग (९५ कि.मी.) या प्रस्तावाचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे.तसेच पुणे-अहिल्यानगर,धाराशिव-बीड-छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर या नवीन रेल्वेमार्गाचे सर्वेक्षणही मंजूर करण्यात आले आहे”-अश्विनी वैष्णव,रेल्वे मंत्री,भारत सरकार.
त्यावेळी त्यांनी दिलेल्या उत्तरात स्पष्ट केले की,”बेलापूर आणि परळी दरम्यान सध्या थेट रेल्वेमार्ग उपलब्ध नाही.मात्र या भागातील संपर्क अधिक सक्षम करण्यासाठी अनेक महत्त्वाचे रेल्वे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत.मंत्रालयाच्या माहितीनुसार अहिल्यानगर-बीड-परळी वैजनाथ नवीन रेल्वेमार्ग (२६१ कि.मी.) हा ५ हजार ८०० कोटी रुपये खर्चाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून,त्यातील अहिल्यानगर-बीड-बडवणी (२०१ कि.मी.) हा टप्पा कार्यान्वित करण्यात आला आहे.उर्वरित भागाचे काम सुरु आहे.तसेच राहुरी-शनी शिंगणापूर नवीन रेल्वेमार्ग (२२ कि.मी.) या रु.४९४ कोटी खर्चाच्या प्रकल्पासाठी विशेष रेल्वे प्रकल्प म्हणून मंजुरी देण्यात आली असून,सक्षम प्राधिकाऱ्यांची नियुक्ती करून भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याशिवाय पुणतांबा-साईनगर शिर्डी दुहेरीकरण (१७ कि.मी.) या रु.२२७ कोटी खर्चाच्या प्रकल्पासाठीही विशेष रेल्वे प्रकल्पाचा दर्जा देण्यात आला आहे.या प्रकल्पाचेही भूसंपादन सुरु असल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाने दिली आहे.
दरम्यान रेल्वे मंत्रालयाने पुढे सांगितले की,”नाशिक रोड-साईनगर शिर्डी नवीन रेल्वेमार्ग (९५ कि.मी.) या प्रस्तावाचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे.तसेच पुणे-अहिल्यानगर,धाराशिव-बीड-छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर या नवीन रेल्वेमार्गाचे सर्वेक्षणही मंजूर करण्यात आले आहे. खा.वाकचौरे यांनी सांगितले की,”बेलापूर-परळी रेल्वे जोडणी हा केवळ वाहतुकीचा विषय नसून शिर्डी,शनी शिंगणापूर,मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाशी संबंधित महत्त्वाचा प्रश्न आहे.या मार्गामुळे धार्मिक पर्यटन,उद्योग,व्यापार,कृषी मालाची वाहतूक आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील.”बेलापूर-परळी रेल्वे मार्गासह शिर्डी लोकसभा मतदारसंघातील सर्व रेल्वे प्रकल्पांना गती मिळावी,आवश्यक निधी उपलब्ध व्हावा आणि कामे लवकर पूर्ण व्हावीत यासाठी मी संसदेत तसेच रेल्वे मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा करत राहणार आहे.

दरम्यान खा.वाकचौरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे बेलापूर-परळी रेल्वे जोडणीसह शिर्डी परिसरातील अनेक महत्त्वाच्या रेल्वे प्रकल्पांच्या प्रगतीची अधिकृत माहिती रेल्वे मंत्र्यांनी दिली असून ती पुढील प्रमाणे आहे.त्यात रेल्वे मार्गाचे नाव व पुढे येणारा खर्च कोटींत दर्शवला आहे.पुणे-मिरज-दौंड दुपदरीकरण (467 कि.मी.)-6,463 कोटी,होटगी-कुडगि-गदग दुपदरीकरण (284 कि.मी.)-2,459,मनमाड-जळगांव तीसरी लाइन (160 कि.मी.)-1,677,जबलपुर-गोंदिया आमान परिवर्तन (300 कि.मी.)-2005,छिंदवाड़ा-नागपुर आमान परिवर्तन (150 कि.मी.)खर्च -1,512, पनवेल-पेन दुपदरीकरण (35 कि.मी.)-263,पेन-रोहा दुपदरीकरण (40 कि.मी.)-330,उधना-जळगांव दुपदरीकरण (307 कि.मी.)-2,448,मुदखेड़-परभणी दुपदरीकरण (81 कि.मी.)-673 1,भुसावल-जळगांव तीसरी लाइन (24 कि.मी.)-325,जळगांव-भुसावळ चौथी लाइन (24 कि.मी.)-261,दौंड-गुलबर्गा दोहरीकरण (225 कि.मी.)-3,182,दौंड-मनमाड दुपदरीकरण (236 कि.मी.)-3,426,अहिल्यानगर-परळी-वैजनाथ नवी लाइन (261 कि.मी.)-5,800,बारामती-लोणांद नई लाइन (64 कि.मी.)-1,844 वर्धा-नांदेड़ नई लाइन (284 कि.मी.)-5,248 इंदौर-मनमाड नवी लाइन (360 कि.मी.)-18,529, वाडसा-गडचिरोली नई लाइन (52 कि.मी.)-1,886,जालना-जळगांव नवी लाइन (174 कि.मी.)-5,804,वर्धा-नागपुर तीसरी लाइन (76 कि.मी.)-917,वर्धा-बल्लारशाह तीसरी लाइन (132 कि.मी.)-1,755,इटारसी-नागपुर तीसरी लाइन (280 कि.मी.)-2,607,राजनांदगांव-नागपुर तीसरी लाइन (228 कि.मी.)-3,545 वर्धा-नागपुर चौथी लाइन (79 कि.मी.)-1,215 जळगांव-मनमाड चौथी लाइन (160 कि.मी.)-2,574 भुसावळ खंडवा तीसरी और चौथी लाइन (131 कि.मी.)-3,285,सोलापुर-तुळजापुर-उस्मानाबाद नवी लाइन (84 कि.मी.)-3,296,पनवेल-चौक दुपदरीलाइन (17 कि.मी.)-491,वर्धा-बल्हारशाह चौथी लाइन (135 कि.मी.)-2,226,इटारसी-नागपुर चौथी लाइन (297 कि.मी.)-5,010 वर्धा-भुसावळ तीसरी और चौथी लाइन (314 कि.मी.)-9,197,गोंदिया-डोंगरगढ़ चौथी लाइन (84 कि.मी.)-2,223,गोंदिया-बल्हारशाह दुपदरीकरण (240 कि.मी.)-4,819,कल्याण-कसारा तीसरी लाइन (68 कि.मी.)-1,433 नाइगांव-जुइचेंद्र दुपदरी कॉर्ड लाइन (5 कि.मी.)-176,नीलजे-कोपर दोहरी कॉर्ड लाइन (5 कि.मी.) 338,बदलापुर-कर्जत तीसरी व चौथी लाइन (32 कि.मी.)-1,324,आसनगांव-कसारा चौथी लाइन (35 कि.मी.)-794 कसारा-मनमाड तीसरी व चौथी लाइन (131 कि.मी.)-10,154 गोंदिया-जबलपुर दुपदरीकरण (231 कि.मी.)-5,236 चाळीसगांव रेलो परिरेल उड्डाणपूल (11 कि.मी.)-264,चिखली व सोमताने (4 कि.मी.)दरम्यान कॉर्ड लाइन-172,पुणतांबा-साईनगर शिर्डी दुपदरीकरण (17 कि.मी.)-227,नाशिक-पुणे लोहमार्ग 2012 मध्ये सर्वे होउन मंजूर झाला आहे.तर जमीन अधिग्रहणाचे काम सुरु झालेले होते.हा प्रकल्प नारायणगांव तालूका जुन्नर (पुणे) येथील दुर्बिणीच्या कारणास्तव मार्ग बदलविण्याचे चालू आहे.त्यामुळे अकोले,संगमनेर-संगमनेर-जुन्नर येथील सर्व जनतेमध्ये असंतोष व आकोश आहे.जनता आंदोलन करत आहे तरी नाशिक-पुणे लोहमार्गामध्ये बदल न करता सन-2012 च्या मंजुरीप्रमाणे कार्यान्वित करण्यात यावा अशी आग्रही मागणी खा.भाउसाहेब वाकचौरे यांनी शेवटी केली आहे.



