जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
पुरस्कार,गौरव

… या पतसंस्थेला,’ब्ल्यु रिबन’ पुरस्कार जाहीर

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

    कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहाचे कर्मचारी तसेच कारखाना परिसरातील छोट्या मोठ्या व्यवसायिकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करणाऱ्या कोपरगाव तालुक्यातील गौतमनगर येथील पद्मविभुषण डॉ.शरद पवार नागरी सहकारी पतसंस्थेला अविज पब्लिकेशन,कोल्हापूर व गेलेक्सी इन्मा,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा पतसंस्था विभागातील बँको पतसंस्था ‘ब्ल्यू रिबन’ पुरस्कार जाहीर झाला असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन देवेंद्र रोहमारे यांनी दिली आहे.

            कर्मवीर शंकरराव काळे यांनी स्थापन केलेल्या पद्मविभूषण डॉ.शरद पवार नागरी सहकारी पतसंस्थेच्या कार्याची दखल घेवून सन २०२३ चे गुणवत्तापूर्ण व उल्लेखनीय काम केल्याबद्दल पतसंस्था ठेवी ३५ कोटी ते ४० कोटी या पतसंस्था विभागात बँको पतसंस्था ‘ब्ल्यू रिबन’ पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.

त्याबद्दल संस्थेचे मार्गदर्शक माजी आ.अशोक काळे व आ.आशुतोष काळे यांनी संस्थेचे अध्यक्ष,उपाध्यक्ष,संचालक मंडळ,व्यवस्थापक आदींनी अभिनंदन केले आहे.हा पुरस्कार दिनांक १३ फेब्रुवारी २०२४ रोजी दमण येथे पद्मविभुषण डॉ.शरद पवार नागरी सहकारी पतसंस्थेला प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती व्यवस्थापक मंगेश देशमुख यांनी दिली आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close