सहकार
सहवीज निर्मिती प्रकल्पातून ऊस उत्पादकांना होणार फायदा -आश्वासन

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
सहवीज निर्मिती प्रकल्पातून कारखान्याच्या आर्थिक उत्पन्नात भर पडणार आहे.त्याचा फायदा कर्मचारी व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होणार असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला आहे.

“काळाच्या ओघात सहकारी साखर कारखानदारी होत असलेले बदल स्विकारतांना नवीन कारखान्याची निर्मिती करून यशस्वीपणे गळीत हंगाम घेत आहोत आणि सर्वच प्रकारच्या खर्चात मोठी बचत होत आहे”- आ.आशुतोष काळे,कोपरगाव.
कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पाचे भूमिपूजन कारखान्याचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे व त्यांच्या धर्मपत्नी जिल्हा बँकेच्या संचालिका चैताली काळे यांच्या हस्ते आज संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी माजी आ.अशोक काळे हे होते.

सदर प्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष शंकरराव चव्हाण,संचालक दिलीप बोरनारे,सुधाकर रोहोम,राजेंद्र घुमरे,सचिन चांदगुडे,सूर्यभान कोळपे,श्रीराम राजेभोसले,प्रवीण शिंदे,अनिल कदम,अशोक मवाळ,राहुल रोहमारे,सुनील मांजरे,मनोज जगझाप,वसंतराव आभाळे,डॉ.मच्छिंद्र बर्डे,वत्सला जाधव,इंदुबाई शिंदे,दिनार कुदळे,प्रशांत घुले,गंगाधर औताडे,श्रावण आसने,प्र.कार्यकारी संचालक सुनिल कोल्हे,आसवणी विभागाचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर आभाळे,सेक्रेटरी बाबा सय्यद,डेप्यु.सेक्रेटरी संदीप शिरसाठ तसेच सर्व सलग्न संस्थांचे पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”काळाच्या ओघात होत असलेले बदल स्विकारतांना नवीन कारखान्याची निर्मिती करून यशस्वीपणे गळीत हंगाम घेत आहोत आणि सर्वच प्रकारच्या खर्चात बचत होत आहे याचे मोठे समाधान वाटते.मागील गळीत हंगामाच्या सांगता समारंभ प्रसंगी लवकरच सहवीज निर्मिती प्रकल्प उभारण्याचे सुतोवाच केले होते. त्याची पूर्तता करतांना आज प्रत्यक्षात सहवीज निर्मिती प्रकल्पाबरोबरच भूमिपूजन झाले आहे.त्यामुळे कारखान्याच्या प्रगतीबरोबरच ऊस उत्पादक शेतकरी व कर्मचारी यांचे देखील कल्याण होणार असल्याचे आ.काळे यांनी शेवटी सांगितले आहे.
सदर कार्यक्रमाचे प्रास्तविक कारखान्याचे प्र.कार्यकारी संचालक सुनिल कोल्हे यांनी केले. सूत्रसंचालन सेक्रेटरी बाबा सय्यद यांनी केले तर आभार संचालक सूर्यभान कोळपे यांनी मानले.