जाहिरात-9423439946
नैसर्गिक आपत्ती

…या शाळेच्या विद्यार्थ्यांना एन.डी.आर.एफ.चे मार्गदर्शन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील समता इंटरनॅशनल स्कूल येथे नुकतीच विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाची कार्यशाळा मोठ्या उत्साहात नुकतीच संपन्न झाली आहे.

आपत्कालीन परिस्थितीत मदत,बचाव व इतर प्रतिसादात्मक कार्ये सक्षमपणे हाती घेण्यासाठी ‘राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दला’ची (NDRF ची) स्थापना करण्याची तरतूद कायद्यात करण्यात आली आहे व हे दल राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या निंयंत्रणाखाली काम करत आहे.त्यासाठी शाळा महाविद्यालयांत जनजागृती करण्यात येत आहे.

आपत्ती व्यवस्थापनाविषयी संशोधन व प्रशिक्षणाची जबाबदारी पार पाडण्यासाठी ‘राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे.राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ही केंद्र शासनाची अधिकृत संस्था असल्याने आपत्ती व्यवस्थापनाच्या राष्ट्रीय स्तरावरील धोरणांमध्ये व कारभारामध्ये या संस्थेचा मोलाचा वाटा असणार आहे.कायद्यानुसार या प्राधिकरणाचे सर्वेसर्वा भारताचे पंतप्रधान असतात.त्यासाठी नैसर्गिक आपत्ती आल्यावर करावयाच्या उपाय योजना सोबतच नैसर्गिक आपत्ती रोखण्यासाठी करावयाच्या उपाय योजनांचा समावेश करण्यात आल्या आहेत.त्यासाठी शाळा महाविद्यालयात जनजागृती करण्यात येत आहे.त्या मोहिमेअंतर्गत नुकतीच कार्यशाळा कोपरगाव नजीक असलेल्या समता इंटरनॅशनल स्कूल येथे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीच्या जवाना समवेत कार्यशाळा संपन्न झाली आहे.

सदर प्रसंगी समता इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या हर्षलता शर्मा यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात पुणे विभाग एन.डी.आर.एफ.चे वरिष्ठ अधिकारी रोहित राठोड,जालिंदर फुंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

या बाबत सविस्तर माहिती देताना एन.डी.आर.एफचे जवान विकास राऊत म्हणाले की,”अनेक युवकांचे स्वप्न हे राष्ट्र सेवा करण्याचे असते.या दलाच्या माध्यमातून देशाची राष्ट्र सेवा करता येते.त्यासाठी एच.एस.सी.परीक्षा उत्तीर्ण होऊन बीएसएफ,एसएसबी,सीआयएसएफ,सीआरपीएफ,आयटीबीपी यापैकी एका दलात भरती होणे गरजेचे असते.या दलांमध्ये राहून ३-४ वर्ष सेवा द्यावी लागते.या दलात ठराविक काळात सेवा दिल्यानंतर या दलात सेवेसाठी पात्र ठरत असतो.या दलात येण्यासाठी आपण पात्र झाल्यानंतर आपल्याला प्रशिक्षण दिले जाते.नंतर एन.डी.आर.एफ.पथकात समावेश होतो.

सदर कार्यक्रमाचे प्रास्तविक प्राचार्या हर्षलता शर्मा यांनी केले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि आभार उपप्राचार्य समीर आत्तार यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close