जाहिरात-9423439946
नैसर्गिक आपत्ती

क्षेत्राची अट न ठेवता एकरी ५० हजार नुकसान भरपाई द्या-माजी खा.तनपुरेची मागणी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

राज्यभर परतीच्या पावसाने थैमान घातले आहे.अतिवृष्टीने खरीप वाया गेला आहे.सोयाबीन,कापूस खरीप पिकांचे शतप्रतिशत नुकसान झाले आहे. जून पासून शेतातील विद्युत पंप बंद आहेत.शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला आहे.शासन कशाची वाट पाहत आहे.क्षेत्राची अट न ठेवता सरसकट एकरी ५० हजार नुकसान भरपाई द्यावी. तसेच सहा महिन्याचे वीजबिल माफ करावे अशी मागणी माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी नुकतीच केली आहे.

“बागायत,जिरायत असा भेदभाव न करता. नुकसानीच्या मदतीसाठी तीन हेक्टरची अट न ठेवता.सातबारा उताऱ्यावरील उसाच्या नोंद क्षेत्रानुसार सरसकट एकरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी.जून पासून शेतकऱ्यांचे विद्युत पंप बंद आहेत.त्यामुळे,सहा महिन्यांचे शेतीपंपाचे वीजबिल माफ करावे. जेणेकरुन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने आर्थिक मदत मिळेल”-प्रसाद तनपुरे, माजी खासदार,राहुरी.

आमच्या प्रतिनिधीशी माजी खा.तनपुरे पुढे बोलताना म्हणाले,”शिंदे-फडणवीस सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी वेतन देण्याची घोषणा केली. संघटित कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड केली.परंतु,असंघटित शेतकरी ओल्या दुष्काळात होरपळला आहे.पंधरा दिवसापूर्वी अतिवृष्टीने नुकसानीचे पंचनामे झाले. राहुरी तालुक्यातील ४८ हजार शेतकऱ्यांचे ८३ हजार एकर क्षेत्राचे नुकसानीचे पंचनामे झाले.परंतु,पावसाचा हाहाकार सुरूच आहे.त्यात,आणखी वीस टक्के क्षेत्रावर नुकसानीची वाढ झाली आहे.

“राज्यात विदर्भ, मराठवाडा,कोंकण,पश्चिम महाराष्ट्र,उत्तर महाराष्ट्र असे सर्वदूर अती पाऊस झाला आहे.धरणे,नद्या,ओढे-नाले ओसंडून वाहत आहेत. शेतातील उभी पिके जलमय झाली आहेत.शासनाने कपाशी, सोयाबीन पिकाच्या नुकसानीची हेक्टरी दहा हजार व फळबागांना हेक्टरी सतरा हजार मदत जाहीर केली. अत्यंत तुटपुंजी आहे.अतिवृष्टीने पीकांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे.

“अती पावसाने ऊसपिके जलमय आहेत.त्यामुळे ऊस तोडणी होऊ शकत नाहीत.लंपी आजाराने जनावरे ग्रासली आहेत.त्यांना लंपीमुक्त असल्याचे दाखले मिळाल्याशिवाय ऊस वाहतुकीसाठी जनावरे उपलब्ध नाहीत.त्यामुळे साखर कारखाने १५ नोव्हेंबर पूर्वी सुरू होऊ शकत नाहीत. त्यामुळे, जानेवारी २०२३ नंतर शेतकऱ्यांना ऊसबिले मिळतील.सोयाबीन,कापूस,बाजरी आदी खरीप पिके वाया गेली.अशा आर्थिक समस्येत रब्बी हंगामातील पिके घेणे दुरापास्त आहे. शासनाने वाट न पाहता सरसकट नुकसान भरपाई द्यावी.अन्यथा, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतील अशी साधार भीती माजी खासदार तनपुरे यांनी शेवटी व्यक्त केली आहे.याबाबत शेतकऱ्यांत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.व जिल्ह्यातील विविध भागातील शेतकऱ्यांनी त्यांच्या मागणीला सहमती दर्शवली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close