नैसर्गिक आपत्ती
अवकाळी पावसाचा धुमाकूळ,मोठे नुकसान !

न्यूजसेवा
कोपरगाव -(नानासाहेब जवरे)
राज्याच्या विविध भागात मान्सूनपूर्व पावसानं धुमाकूळ घातला आहे.वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळत असल्यामुळं शेती पिकांचं विशेषत: फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.उत्तर नगर जिल्ह्यात कोपरगाव तालुक्यातील वायव्येस धामोरी,रवंदे कोळगाव थडी,सांगवी भुसार,टाकळी,मंजूर आदी ठिकाणी काल सायंकाळी 06 वाजेच्या सुमारास अवकाळी पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.यामुळं जनजीवन विस्कळीत झाले आहे.सुदैवाने कोणतीही जीवीत हानी झाली नसल्याची माहिती तहसीलदार महेश सावंत त्यांनी दिली आहे.

कोपरगाव तालुक्यातील धामोरी,रवंदे,सोनारी,टाकळी या परिसरात वादळी पावसामुळे मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली,तर अनेक ठिकाणी झाडे व फांद्या कोसळल्याच्या घटना घडल्या.त्याचा शेती क्षेत्राला फटका बसला मात्र सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.अनेकांच्या कांद्याच्या चाळी,शेड नेट,जनावरांचे गोठे,शाळांचे पत्रे उडून गेले असून अनेक झाडे उन्मळून पडली आहे.शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकनास झाले आहे.त्यामुळे सर्वत्र दणादान झाली असून शेतकरी अस्वस्थ झाला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
वर्तमानात एल निनोमुळे पाऊस कमी आणि उशिरा पडणार असल्याच्या बातम्या असताना कोपरगाव तालुक्यात दुपारनंतर अचानक बदललेल्या हवामानामुळे तालुक्याच्या विविध भागांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस,विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट अनुभवायला मिळाला.या परिसरात वादळी पावसामुळे मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली,तर अनेक ठिकाणी झाडे व फांद्या कोसळल्याच्या घटना घडल्या.त्याचा शेती क्षेत्राला फटका बसला मात्र सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.अनेकांच्या कांद्याच्या चाळी,शेड नेट,जनावरांचे गोठे,शाळांचे पत्रे उडून गेले असून अनेक झाडे उन्मळून पडली आहे.शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकनास झाले आहे.त्यामुळे सर्वत्र दणादान झाली असून शेतकरी अस्वस्थ झाला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.कोपरगाव तहसील कार्यालयाचे अधिकारी आणि महसूल कर्मचारी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामे सुरू केले आहे.

दरम्यान आ.आशुतोष काळे यांनी महसूल विभागाला या वादळाचे पंचनामे करण्याचे आदेश कोपरगाव तहसीलचे तहसीलदार महेश सावंत यांना दिले असून त्यांनी नुकसान झालेल्या ठिकाणी महसूली कर्मचाऱ्यांनी भेट देऊन तत्काळ पंचनामे करण्याचे फर्मान जारी केले आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना काही अंशी दिलासा मिळणार आहे.
दरम्यान मिळालेल्या माहिती नुसार धामोरी,सांगवी भुसार,रवंदे आणि टाकळी परिसरात हा वादळाचा केंद्रबिंदू असल्याचे दिसून आले आहे.

दरम्यान सांगवी भुसार येथे झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे ज्ञानेश्वर कराडे यांच्या मालकीचा गाईंचा गोठा कोसळून मोठे नुकसान झाले आहे.मात्र सदर घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.


दरम्यान या वादळात भिकुनाथ कारभारी भुसे यांचे घराचे छत वादळाने हिसकावून घेतले असल्याचे दिसून आले आहे.
दरम्यान कोपरगाव पंचायत समितीच्या सर्व विभागात नागरीकांना येणाऱ्या अडचणी व समस्या सोडविण्यासाठी सोमवार दि.०८ रोजी दुपारी ०३:०० वा. कोपरगाव तहसील कार्यालयात आ.आशुतोष काळे जनता दरबार घेणार असून नागरिकांनी त्यास हजर रहावे असे आवाहन त्यांचे कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

दरम्यान या वादळाने ब्राम्हणगाव येथील सौरव अनिल रोहम यांचे गोठ्यावरिल पत्र्याचे शेड उडून नुकसान झाले आहे.सुदैवाने त्यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही.

काल झालेल्या वादळी पावसामुळे धामोरी येथील गट नं ४५५ मध्ये दत्तात्रय बाजीराव साळुंखे यांचे पत्र्याचे शेड उडाले तसेच राजेंद्र दत्तात्रय खिलारी यांचे घराचे पत्रे उडून गेले असल्याचे आढळून आले आहे तर गट नं.४७२ मध्ये प्रवीण माधव खिलारी यांचे घराचे समोर चे पत्र्याचे शेडचे नुकसान झाले.व सचिन निर्भावने यांच्या राहत्या घराची पडझड होऊन आर्थिक नुकसान झाले.सुदैवाने त्यात कोणतीही जीवित हानी झाली नाही.
दरम्यान या वादळाच्या तडाख्यात ब्राम्हणगाव येथील भीमराज तुकाराम अष्टेकर यांच्या घरावरील पत्र्याचे शेड उडून गेले आहे. तर संतोष भिकाजी अंबीलवादे यांचे घरावर झाड पडून मोठे नुकसान झाले आहे.

मंजूर येथील ग्रामपंचायत हद्दीत विजय वाल्मीक भोसले यांचे कांदा चाळीवर झाड पडून त्यात चाळीचे नुकसान झाले असल्याची माहिती महसूल विभागाचे नायब तहसीलदार चंद्रशेखर कुलथे यांनी दिली आहे.तर मोर्विस येथील शेतकरी महेश चंद्रभान जाधव यांचे गट क्रमांक ९७ मध्ये मोरया ऍग्रो इंडस्ट्रीजचे पत्र्याचे शेडचे मोठे नुकसान झाले आहे.

दरम्यान मौजे टाकळी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेचे मोठे नुकसान झाले असून त्यावरील पत्रे वादळाच्या तडाख्यात उडून गेले आहे. परिणामी आगामी 15 जून रोजी सुरू होणाऱ्या शाळेसाठी आता हे मोठे आव्हान ठरणार असल्याचे दिसून येत आहे.



