जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवड

…या खासदारांचा दिल्लीत गौरव संपन्न !

न्यूजसेवा

कोपरगांव -(प्रतिनिधी)

   शिर्डीचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांचा ‘प्राईड ऑफ भारत लीडरशिप समिट २०२६’ मध्ये विशेष सन्मान नवी दिल्ली येथे गौरविण्यात आले आहे.त्यांच्या या पुरस्काराबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

  

शिर्डीचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांचा ‘प्राईड ऑफ भारत लीडरशिप समिट २०२६’ मध्ये विशेष सन्मान नवी दिल्ली येथे गौरविण्यात आले आहे तो क्षण.

खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी पहिल्या निवडणुकीत विजय मिळविल्यावर गेली चाळीस वर्षे प्रलंबित असलेल्या निळवंडे प्रकल्पाच्या कालव्यांना गती मिळावी म्हणून निळवंडे कालवा कृती समितीच्या विनंतीला मान देऊन केंद्रिय जल आयोगाच्या 17 पैकी 14 मान्यता मिळवून दिल्या होत्या.त्यामुळे पुढे जाऊन कालवा कृती समितीने उच्च न्यायालयातून उर्वरित तीन मान्यता मिळवून कालव्यांचा प्रश्न 56 वर्षानंतर मार्गी लावला असल्याचे दिसून आले आहे.त्यामुळे उत्तर नगर जिल्ह्यातील सात  तालुक्यातील दुष्काळी 190 गावांना न्याय मिळण्यास मदत झाली आहे.त्यात नाशिक जिल्ह्यातील सहा गावांचा समावेश आहे.शिर्डी विमानतळाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी आपल्या आयुष्याचा बराच काळ खर्ची घातला आहे.काकडी विमानतळ कृती समितीने दिलेल्या लढयाला त्यामुळे पंचेचाळीस वर्षानंतर यश आले आहे.

   देशभरातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित केला होता.त्यावेळी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी आपल्या मतदार संघात समाजासाठी विविध विकास कामे केलेली आहे.त्यांनी मतदार संघात समाज मंदिरे,व्यायाम शाळा,शाळा इमारती,विविध मंदिरे आणि त्यांना सभा मंडप आदी उपक्रम राबवले असल्याचे दिसून आले आहे.त्याची दखल घेण्यात आली असल्याचे दिसून आले आहे.त्यांची या आधी सन-2009 साली प्रथम निवडून आले होते.त्यानंतर त्यांनी सलग तीन निवडुकांमध्ये पराभव झाला होता.त्यांनी सन -2014 साली श्रीरामपूर येथील विधानसभा निवडणुकी लढवली होती.तरी त्यांनी हार मानली नाही.त्यांनी आपला लोकसंपर्क कमी होऊ दिला नाही.त्यांनी समाजातील दुर्बल आणि गरजू लोकांच्या समस्यांना कायम प्राधान्य दिले असल्याचे दिसून आले आहे.त्यामुळे जनतेने त्यांना सन-2024 च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्याने निवडून दिले असल्याचे दिसून आले आहे.त्यांनी पहिल्या निवडणुकीत विजय मिळविल्यावर गेली चाळीस वर्षे प्रलंबित असलेल्या निळवंडे प्रकल्पाच्या कालव्यांना गती मिळावी म्हणून पत्रकार नानासाहेब जवरे आणि सहकाऱ्यांनी सुरू केलेल्या निळवंडे कालवा कृती समितीच्या विनंतीला मान देऊन केंद्रिय जल आयोगाच्या 17 पैकी 14 मान्यता मिळवून दिल्या होत्या.त्यामुळे पुढे जाऊन कालवा कृती समितीने उच्च न्यायालयातून उर्वरित तीन मान्यता मिळवून कालव्यांचा प्रश्न 56 वर्षानंतर मार्गी लावला असल्याचे दिसून आले आहे.त्यामुळे उत्तर नगर जिल्ह्यातील सात  तालुक्यातील दुष्काळी 190 गावांना न्याय मिळण्यास मदत झाली आहे.त्यात नाशिक जिल्ह्यातील सहा गावांचा समावेश आहे.

नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या “द प्राइड ऑफ भारत लीडरशिप समिट-2026″या प्रतिष्ठित राष्ट्रीय कार्यक्रमास उपस्थित खा.भाऊसाहेब वाकचौरे दिसत आहे.

    शिर्डी विमानतळाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी आपल्या आयुष्याचा बराच काळ खर्ची घातला आहे.काकडी विमानतळ कृती समितीने दिलेल्या लढयाला त्यामुळे पंचेचाळीस वर्षानंतर यश आले आहे.व त्याचे तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण या हस्ते भूमिपूजन संपन्न झाले होते.अंगणवाडी सेविका,मदतनीस,महिला,दलीत,वंचित,शोषित घटकांना यांनी सातत्याने न्याय दिला आहे.त्यामुळेच नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या “द प्राइड ऑफ भारत लीडरशिप समिट-2026″या प्रतिष्ठित राष्ट्रीय कार्यक्रमास त्यांना गौरविण्यात आले आहे.

   देशभरातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींसह अनेक मान्यवर सहभागी झाले होते.या कार्यक्रमातील सहभागामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व राष्ट्रीय स्तरावर अधिक प्रभावीपणे अधोरेखित झाले असल्याचे मानले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close