जाहिरात-9423439946
निवडणूक

कोपरगावातील…या ग्रामपंचायतीवर येणार प्रशासक !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

कोपरगाव तालुक्यातील यापूर्वी ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या २६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या असताना आता कुंभारी,ब्राम्हणगाव,वारी,कान्हेगाव आदी चार ग्रामपंचायतीवर प्रशासक लागले असून उर्वरित जवळकेसह १३ ग्रामपंचायतीवर आगामी सप्टेंबर पर्यंत प्रशासक नियुक्ती होणार असल्याची माहिती तालुका स्तरावरून प्राप्त झाली आहे.त्यामुळे अनेक पदाधिकाऱ्यांना आपल्या परतीचे वेध लागले आहे.

कोपरंगाव तालुक्यात पहिल्या टप्प्यात कोपरगाव तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीत कुंभारी,ब्राम्हणगाव,वारी,कान्हेगाव आदी चार ठिकाणी प्रशासक नियुक्त करण्यात आला असून जवळके (११फेब्रुवारी मुदत संपली )आणि बोलकी (१७ फेब्रुवारी संपणार) आदी दोन ठिकाणी प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.त्यामुळे तालुक्यातील या ग्रामपंचायतीत राजकीय प्रक्रियांना वेग येणार हे ओघाने आलेच आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”राज्य निवडणूक आयोगानं राज्यातील ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या सुमारे ७६७५ ग्रामपंचायतीच्या निवडणुका नुकत्याच घेतल्या आहेत.मात्र,ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेनंतर मतदार याद्या तयार करणे व प्रत्यक्ष निवडणूक यासाठी सुमारे २-३ महिन्यांचा कालावधी आवश्यक असतो.त्यामुळं जानेवारी ते डिसेंबर २०२३ मध्ये मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित होणाऱ्या ग्रामपंचायतींची माहिती निवडणूक आयोगाने मागितली असल्याचे समजते.या ग्रामपंचायतींच्या मुदती जस जशा संपतील तसतसे त्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची कार्यवाही करण्यात यावी असे आदेश देण्यासाठी राज्य निवडणूक आयोगानं दिले असल्याची माहिती दि.१९ जानेवारी २०२३ रोजी मागितली असल्याचे समजत आहे.त्यानुसार जिल्हा प्रशासनाने कार्यवाही सुरु केली असल्याची माहिती हाती आली आहे.
त्यात पहिल्या टप्प्यात कोपरगाव तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीत कुंभारी,ब्राम्हणगाव,वारी,कान्हेगाव आदी चार ठिकाणी प्रशासक नियुक्त करण्यात आला असून जवळके आणि बोलकी आदी दोन ठिकाणी प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.
दरम्यान कोपरगाव तालुक्यातील गठीत झालेल्या ग्रामपंचायतींची तारीख व पुढे त्यांचा संपलेला कालावधी दर्शवला आहे.मुदत संपलेल्या ठिकाणी प्रशासक नेमण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.त्यात जवळके ग्रामपंचायत १२ फेब्रुवारी २०१८-११ फेब्रुवारी २०२३,कान्हेगाव १७ जानेवारी २०१८-१६ जानेवारी २०२३,कुंभारी-२३ जानेवारी २०१८-२२ जानेवारी २०२३,घोयेगाव २० ऑगष्ट २०१८-१९ ऑगष्ट २०२३,ब्राम्हणगाव-दि.२० सप्टेंबर २०१८-१९ सप्टेंबर २०२३,वारी-१७ सप्टेबर २०१८-१६ सप्टेंबर २०२३,धोत्रे-२३ एप्रिल २०१८-२२ एप्रिल २०२३,बोलकी-१८ फेब्रुवारी २०१८-१७ फेब्रुवारी २०२३,सुरेगाव-०३ सप्टेंबर २०१८-०२ सप्टेंबर २०२३,लौकी-२७ जुलै २०१८-२६ जुलै २०२३,मुर्शतपुर-१० ऑगष्ट २०१८-०९ ऑगष्ट २०२३,चांदगव्हाण-११ ऑगष्ट २०१८-१० ऑगष्ट २०२३,दहिगाव बोलका-२० ऑगष्ट २०१८-१९ ऑगष्ट २०२३,कारवाडी-२० ऑगष्ट २०१८-१९ ऑगष्ट २०२३,पोहेगाव-२३ एप्रिल २०१८-२२ एप्रिल २०२३,शहाजापूर दि.१० ऑगष्ट २०१८-०९ ऑगष्ट २०२३,मंजूर दि.०३ सप्टेबर २०१८-०२ सप्टेंबर २०२३ आदींचा समावेश आहे.त्यामुळे आगामी काळात सदर ठिकाणी निवडणुकांचा शिमगा रंगणार आहे.त्यासाठी सर्व राजकीय पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते कामास लागणार असल्याचे चित्र आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close