जाहिरात-9423439946
निवडणूक

उमेदवार नगराध्यक्ष आणि नगरसेवक दोन पदावर काम करणार-सभापती प्रा.शिंदे

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

   आपण राज्याच्या मंत्रिमंडळा समोर प्रश्न मांडून नगराध्यक्षपदाचा उमेदवार हा नगराध्यक्ष आणि नगरसेवक या दोन्ही पदावर काम करण्यासाठी पात्र राहणार असून आपण मुख्यमंत्र्यांकडून अध्यादेश काढून घेतला आहे.
त्याला कास्टिंग मतदानाचा अधिकार राहणार आल्याची घोषणा राज्याच्या विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी आज कोपरगाव येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

प्रा.राम शिंदे,सभापती,विधानपरिषद.

कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराग संधान यांची छबी पुढे होती (अर्थात दोन्ही प्रस्थापितांनी हा उद्योग केला होता)मात्र निवडणूक झाली आणि शपथ विधी झाल्यावर मात्र विवेक कोल्हे यांची छबी मोठी आणि पराग संधान यांची छबी लहान झाली असल्याने आगामी काळात पालिकेचे काम कोण करणार आहे हे उघड झाले असल्याची मोठी चर्चा उपस्थितात दिसून आली आहे.

 

भाजपचे नूतन नगराध्यक्ष पराग संधान व नवोदित नगरसेवक शपथविधी प्रसंगी दिसत आहे.

  कोपरगाव नगरपरिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत भाजप कोल्हे गटाचे पराग संधान यांची नगराध्यक्षपदी निवड झाली असून त्यांच्या पदग्रहण समारंभासाठी विधान परिषदेचे अध्यक्ष प्रा.राम शिंदे यांची प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.

विवेक कोल्हे बोलताना दिसत आहे.

 

“नूतन नगराध्यक्ष पराग संधान यांनी पहिल्याच बैठकीत अनेक लोकप्रिय कामे सुरू केले आहे.
विश्वासनाम्यातील सर्व कामे पूर्ण करणार असल्याचा पुनरुच्चार केला आहे.०६ हजार घरकुलाचा सातबारा उतारा देण्याचा प्रश्न सोडविणार आहे.सर्व प्रश्न सोडवल्याशिवाय आपण पुढील निवडणुकीत मतदान मागण्यास येणार आहे.निवडणूक पुढे गेल्याने दोन महिने बोलत होतो.आता करण्याची वेळ आली आहे.५० टक्के पाणी पट्टी कमी करण्याची वेळ आली आहे”-विवेक कोल्हे,अध्यक्ष,सहकार महर्षी कारखाना.सहजनंदनगर.

  सदर कार्यक्रमासाठी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे,माजी आ.स्नेहलता कोल्हे,सहकार महर्षी कोल्हे सहकारी कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे,रेणुका कोल्हे,भारत संचार निगमचे संचालक रवींद्र बोरावके,कोपरगाव नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष,ऐश्वर्या सातभाई,राजेंद्र सोनवणे,माजी उपनगराध्यक्ष रवींद्र पाठक,सरला दिदी,कारखान्याचे उपाध्यक्ष राजेंद्र कोळपे,डॉ.राजेंद्र पिपाडा,विविध संस्थांचे पदाधिकारी नगरसेवक,प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

  यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”राज्यात सर्व प्रथम जगजाहीर आणि जनतेसमोर शपथविधी फक्त कोपरगाव शहरात झाली असल्याचे दिसून येत आहे.नगरपरिषदेत काम करण्यासाठी अप सुरू करून दूरदृष्टीचा युवक नेता म्हणून विवेक कोल्हे यांचा गौरव केला आहे.राज्यात तिकीट न मिळाल्यावर राज्यात काय राडा होतो हे तुम्ही सामाजिक संकेतस्थळावर पाहिला असल्याचे सांगून भाजपला घरचा आहेर दिला असून आपल्या पायाखाली काय जळत आहे हे दाखवून दिले आहे.३० नगरसेवकापैकी १९ नगरसेवक एक नगराध्यक्ष निवडून दिला असून हे कमी वयात यश मिळाले असल्याचे सांगून देशाचे सहकार मंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठबळ पुरवले आहे.माझा पोरगा अजून लहान आहे.आणि आज तरी माझ्यावर घराणेशाहीचा आरोप होणार नाही.मला त्या कार्यक्रमाला येता आले नाही आपण अमेरिकेत होतो.पण मी माहिती घेतली असल्याचे कोडकौतुक केले आहे.या शहरात ०६ हजार घरे लोकांच्या नावावर नाही.महसूलमंत्र्यांनी शब्द दिला आहे.नगरविकासची अडचण नाही.विरोधक आणि सत्ताधारी आमच्याकडे काम करण्याची मागतात.त्यांच्यात नाहीच जमले तर दोघेही माझ्याकडे येतात.तेंव्हा तुमचे काम नाहीच झाले तर आपले काम सुरू होईल.”विवेक,तू नक्की आपल्याकडे ये आपण तुझी कामे मार्गी लावू” असे आश्वासन दिले आहे.जामखेडच्या उमेदवाराचे उदाहरण देऊन त्या महिला दोन पदावर निवडून आल्याने आपण राज्याच्या मंत्रिमंडळाचसमोर प्रश्न मांडून नगराध्यक्षपदाचा उमेदवार आणि नगरसेवक या दोन्ही पदावर काम करण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांकडून अध्यादेश काढून घेतला आहे.
त्याला कास्टिंग मतदानाचा अधिकार राहील असे जाहीर करून आपल्या भाषणाचा समारोप केला आहे.

  यावेळी विवेक कोल्हे बोलताना म्हणाले की,”माजी आ.स्नेहलता कोल्हे यांनी कोपरगाव शहरात बस स्थानक,पोलिस ठाणे,कोपरगाव नगरपरिषद इमारत दोन महिन्यात पूर्ण होणार आहे.सभापती प्रा.राम शिंदे पालकमंत्री नसले तरी तुम्ही आमचे पालकत्व घ्यावे असे आवाहन केले आहे.नूतन नगराध्यक्ष पराग संधान यांनी पहिल्याच बैठकीत अनेक लोकप्रिय कामे सुरू केले आहे.
विश्वासनाम्यातील सर्व कामे पूर्ण करणार असल्याचा पुनरुच्चार केला आहे.घरकुलाचा सातबारा उतारा देण्याचा प्रश्न सोडविणार आहे.सर्व प्रश्न सोडवल्याशिवाय आपण पुढील निवडणुकीत मतदान मागण्यास येणार आहे.निवडणूक पुढे गेल्याने दोन महिने बोलत होतो.आता करण्याची वेळ आली आहे.५० टक्के पाणी पट्टी कमी करण्याची वेळ आली आहे.दर चार महिन्यात आढावा बैठक घेऊन कामे करणार आहे.

  सदर प्रसंगी माजी आ.स्नेहलता कोल्हे म्हणाल्या की,”या निवडणुकीत शहरासह ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी चांगला सहभाग नोंदवला आहे.मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व करण्याचे आश्वासन दिले आहे.यावेळी त्यांनी आपण आमदार असताना तत्कालीन मंत्री राम शिंदे यांनी चांगले सहकार्य केले.आपल्या मागण्या पूर्ण केल्याचा दावा करुन त्यांचे जोरदार कौतुक केले आहे.त्यात पोलिस ठाणे,पोलिस वसाहत इमारत आदी कामे केली असल्याची आठवण करून दिली आहे. विधानपरिषदेचे सभापती यांचा शब्द कोणी मंत्री डावलत नाही.त्यांच्याकडून खूप अपेक्षा असल्याचे शेवटी सांगितले आहे.

*पत्रकार नानासाहेब जवरे* यांच्या विश्वसनीय बातम्यासाठी *’न्यूजसेवा‘* वाचा आणि खालील लिंकवर क्लिक करून ग्रुप’मध्ये सामील व्हा.
https://bit.ly/newsseva2025
*न्यूजसेवा* डिजिटल युग डिजिटल बातमी.

  सदर प्रसंगी प्रास्ताविक नूतन अध्यक्ष पराग संधान यांनी केले त्यावेळी बोलताना ते म्हणाले की,”कोपरगाव नगरपरिषदेत पहिल्यांदाच नगराध्यक्ष व नगरसेवक पहिल्यांदा बहुमतात आले असल्याचे सांगून जनतेच्या तक्रारीसाठी एक अँप विकसित केले आहे.विश्वासनाम्यातील सर्व कामे पूर्ण करणार आहे.गावात महिलाना एकही स्वच्छता गृह नव्हते ते बांधणार आहे.एक डॉक्टर आपले स्वच्छतागृह उपलब्ध करून देणार आहे.विवेक कोल्हे यांचे मार्गदर्शनाखाली काम करणार आहे.

  सदर प्रसंगी सूत्रसंचालन किरण ठाकरे यांनी केले आहे.उपस्थितांचे आभार नगरसेवक जितेंद्र रणशूर यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close