जलसंपदा विभाग
पश्चिम घाटमाथ्याच्या पाण्याबाबत नेते शीतनिद्रेत,…यांचा आरोप!

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
मराठवाड्यासह नगर-नाशिक जिल्ह्याला वरदान ठरणाऱ्या अप्पर वैतरणेचे अतिरिक्त पाणी कोपरगाव व अहिल्यानगरला मिळण्यासाठी लढा गरजेचा असून याबाबत उत्तर नगर जिल्ह्यातील नेते शीतनिद्रेत असून यासाठी जनतेने जागृत होऊन हरकती नोंदवाव्यात असे आवाहन कोपरगाव तालुका काँग्रेसचे अध्यक्ष नितीन शिंदे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

सह्याद्रीच्या पश्चिम घाटमाथ्याचे 115 टी.एम.सी.पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्याच्या प्रक्रियेला गती मिळावी,यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मागील 08 मे 2026 रोजी प्रतिज्ञापत्र दाखल करण्याची शेवटीची संधी दिली आहे.यात पत्रकार नानासाहेब जवरे आणि रूपेंद्र काले यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात 05 जानेवारी 2024 रोजी जनहित याचिका (क्रं.05/2024) दाखल केली आहे.तर यात शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड.अजित काळे यांचे मोफत विधी सहाय्य मिळत आहे.त्यात केंद्र सरकार आणि राज्य सरकार व संबंधित जलसंपदा विभागाला नोटिसा बजावून प्रतिज्ञापत्र देण्याची शेवटची संधी दिली आहे.आगामी सुनावणी आगामी 08 जून 2026 रोजी संपन्न होणार आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,”पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर आणि सह्याद्रीच्या पट्ट्यात मुसळधार पडणारे व वाहून जाणारे पाणी मराठवाड्यातील दुष्काळी भागाकडे वळवण्याचा हा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे.घाटमाथ्याचे 115 टी.एम.सी.पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्याच्या प्रक्रियेला गती मिळावी,यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मागील 08 मे 2026 रोजी प्रतिज्ञापत्र दाखल करण्याची शेवटीची संधी दिली आहे.यात पत्रकार नानासाहेब जवरे आणि रूपेंद्र काले यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात 05 जानेवारी 2024 रोजी जनहित याचिका (क्रं.05/2024) दाखल केली आहे.तर यात शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड.अजित काळे यांचे मोफत विधी सहाय्य मिळत आहे.त्यात केंद्र सरकार आणि राज्य सरकार व संबंधित जलसंपदा विभागाला नोटिसा बजावून यावर भूमिका स्पष्ट करण्याचे आणि प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले होते.त्याची सुनावणी आगामी 08 जून 2026 रोजी संपन्न होणार आहे.या पार्श्वभूमीवर तालुकाध्यक्ष नितीन शिंदे यांनी हे प्रसिद्धी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.

“वर्तमानात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे हे अहिल्यानगर जिल्ह्यातीलच असल्याने पश्चिम घाटमाथ्याचे 115 टी.एम.सी.पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याचे काम अधिक सोपे झाले आहे.मात्र,सत्ताधारी महायुती पक्षाचे स्थानिक युवा नेते आणि आमदार सध्या आगामी मंत्रिमंडळ विस्तार आणि मंत्रीपदाच्या शर्यतीत मश्गुल आहेत.प्रस्थापित घराणेशाहीत वाढलेल्या या नेत्यांचे सामान्य जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे-नितीन शिंदे,अध्यक्ष,कोपरगाव तालुका काँग्रेस.
त्यात यांनी पुढे म्हटले आहे की,”महाराष्ट्र शासनाने नुकतेच पाणी वाटपाबाबत एक नवीन परिपत्रक जारी केले आहे.या परिपत्रकानुसार कोपरगाव तालुक्यातील शेतकरी आणि सामान्य जनतेने प्रशासनाकडे आपल्या हरकती नोंदवणे अत्यंत गरजेचे आहे.यात अप्पर वैतरणेचे वाढलेले अतिरिक्त 10.50 टी.एम.सी.पाणी कोपरगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील जनतेला लाभदायी ठरेल,असे आवाहन कोपरगाव तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन मनोहर शिंदे यांनी केले आहे.वर्तमानात जलसंपदा मंत्री हे अहिल्यानगर जिल्ह्यातीलच असल्याने हे काम अधिक सोपे झाले असल्याचा दावा त्यांनी केला आहे.मात्र,सत्ताधारी पक्षाचे स्थानिक युवा नेते आणि आमदार सध्या आगामी मंत्रिमंडळ विस्तार आणि मंत्रीपदाच्या शर्यतीत मश्गुल आहेत.प्रस्थापित घराणेशाहीत वाढलेल्या या नेत्यांचे सामान्य जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.कमाल जमीन धारणा (सीलिंग) कायद्याचा कोपरगाव,राहाता तालुक्यातील शेतकऱ्यांना 1969 साली मोठा फटका शेतकऱ्यांनी सहन केला आहे,याचा कदाचित सध्याच्या लोकप्रतिनिधींना विसर पडला असावाअसा टोलाही त्यांनी लगावला आहे.

दरम्यान नितीन शिंदे यांनी या प्रकल्पाच्या पार्श्वभूमीची माहिती देताना सांगितले की,”सन -२०२२ मध्ये तत्कालीन महाविकास आघाडी सरकारचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी घोटी या ठिकाणी वारंवार बैठका करून सह्याद्रीच्या पश्चिम घाट माथ्यावरून अरबी समुद्रात वाहून जाणारे पावसाळ्यातील अतिरिक्त पाणी पूर्वेकडे गोदावरी नदीत वळवण्याच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली होती.नाशिक येथे स्वतंत्र प्राधिकरण स्थापन केले होते.या कामासाठी मविआ सरकारने १०८ कोटी रुपये वर्ग केले होते.सुरुवातीला १ टी.एम.सी.आणि टप्प्याटप्प्याने सॅडल डॅमद्वारे १६ टी.एम.सी.पर्यंत पाणी वळवण्याचे नियोजन तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले होते.हा प्रश्न प्रथम सन -1952 साली डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी उपस्थित केला होता.त्यानंतर भाजपचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी त्याला ऐरणीवर आणले होते.मात्र त्यानंतर आलेल्या सरकारांनी त्याकडे दुर्लक्ष केलं आहे.त्यानंतर 2019 साली सत्तेत आलेल्या तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पुढाकार घेऊन हा प्रकल्प मार्गी लावण्याचा प्रयत्न केला.या प्रकल्पामुळे गोदावरी खोऱ्यातील पाण्याची तूट भरून निघणार असून,याचा थेट फायदा मराठवाडा,नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्याला होणार आहे.
त्यावेळी ऐन उन्हाळ्यात समन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार नाशिक व नगर जिल्ह्यातील धरणांमधून जायकवाडीसाठी पाणी सोडावे लागत असे.यामुळे स्थानिक शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होत होते.मात्र,भविष्यात पावसाळ्यातील १६ टी.एम.सी.पाणी वळवल्यामुळे जायकवाडीची तहान भागत असतानाच,स्थानिक शेतकऱ्यांवरही अन्याय होणार नाही.
शासन परिपत्रकानुसार,पाणी वाटपाच्या मुद्यावर सत्ताधारी नेत्यांनी जनतेला हरकती घेण्यासाठी जागृत करणे व जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांच्याकडे पाठपुरावा करून तालुक्यासाठी अधिक पाणी पदरात पाडून घेणे गरजेचे आहे.मात्र,नेते वैयक्तिक राजकारणात व्यस्त असल्याने काँग्रेस पक्ष जनतेच्या हक्कासाठी मैदानात उतरला असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
सदर प्रसंगी काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते कैलास पंडोरे पैलवान,हशमभाई पटेल,सचिन होन,विजय सुधाकर जाधव,विष्णू पाडेकर,ज्ञानेश्वर भगत,राहुल गवळी,सोमनाथ पगारे,सोपान धेणक,सुभाष रणधीर,रौनक अजमेरे,पुष्पाताई भगत,राजुभाई पठाण,महादेव नाना जगताप,बाळासाहेब शिंदे,मयुर आव्हाड,ॲड.शीतल देशमुख,मझर शेख, चंद्रहार जगताप आदी मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.



