जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
क्रीडा विभाग

…या ठिकाणी क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

   पुणे येथील राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय,अहिल्यानगर येथील जिल्हा क्रीडा कार्यालय,कोपरगाव येथील तालुका क्रीडा समिती व कोकमठाणा येथील आत्मा मालिक कुस्ती केंद्र  यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच आत्मा मालिक कुस्ती केंद्र कोकमठाण येथे १४,१७ व १९ वर्षीय शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धांचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले होते. त्याला मोठा प्रतिसाद लाभला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

 

  या स्पर्धेत के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाचा अकरावी विज्ञान शाखेचा विद्यार्थी विनित पवन हाडा याने १९ वर्षाखालील मुलांच्या ६५ किलो वजनी गटात रौप्यपदक मिळवले आहे.तसेच महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय श्रीगोंदा येथे पार पडलेल्या शालेय जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धांमध्ये के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाची बारावी विज्ञान शाखेची विद्यार्थीनी सप्तमी डहारे हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

    या स्पर्धेत के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाचा अकरावी विज्ञान शाखेचा विद्यार्थी विनित पवन हाडा याने १९ वर्षाखालील मुलांच्या ६५ किलो वजनी गटात रौप्यपदक मिळवले आहे.तसेच महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय श्रीगोंदा येथे पार पडलेल्या शालेय जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धांमध्ये के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाची बारावी विज्ञान शाखेची विद्यार्थीनी सप्तमी डहारे हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.व तिची निवड पुणे येथे होणाऱ्या विभागस्तरीय तायक्वांदो स्पर्धेसाठी झाली आहे.विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे,विश्वस्त संदीप रोहमारे,सचिव ॲड.संजीव कुलकर्णी आदीसह पदाधिकारी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजय ठाणगे, उपप्राचार्य प्रा.बाळासाहेब सोनवणे आदींनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close