जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

कोपरगावातील कब्रस्तानचे त्वरित सुरु करा-मागणी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील सर्व्हे क्र. १०५ मधील अक्सा मस्जिद व कब्रस्तानसाठी निधी दिला असून २५ लाख निधीतील या मस्जिद व कब्रस्तानचे काम तातडीने सुरु करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कोपरगाव नगरपरिषदेकडे करण्यात आली आहे.

“कोपरगाव शहरातील सर्व्हे क्र.१०५ मधील अक्सा मस्जिद व कब्रस्तानच्या संरक्षक भीत व इतर दुरुस्तीसाठी १० लाख व २५ लाख असा एकूण ३५ लाख रुपये निधी दिलेला आहे.रुपये १० लाख निधीतील काम प्रगतीपथावर असून २५ लाख निधीतील काम मात्र आजपर्यंत सुरु झालेले नाही हि खेदजनक बाब आहे”-फकिर कुरेशी,जेष्ठ कार्यकर्ते,कोपरगाव.

त्याबाबत कोपरगाव नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी ज्ञानेश्वरजी चाकणे यांना निवेदन देण्यात आले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,”सर्व्हे क्र. १०५ परिसरातील मुस्लीम समाज बांधवांना दफण विधी व नमाज पठण करतांना येणाऱ्या अडचणींची दखल घेवून आ.आशुतोष काळे यांनी स्थानिक विकास निधीतून घेवून कोपरगाव शहरातील सर्व्हे क्र.१०५ मधील अक्सा मस्जिद व कब्रस्तानच्या संरक्षक भीत व इतर दुरुस्तीसाठी १० लाख व २५ लाख असा एकूण ३५ लाख रुपये निधी दिलेला आहे.रुपये १० लाख निधीतील काम प्रगतीपथावर असून २५ लाख निधीतील काम मात्र आजपर्यंत सुरु झालेले नाही.त्यामुळे मुस्लीम समाज बांधवांना येत असलेल्या अडचणीची दखल घेवून तातडीने अक्सा मस्जिद व कब्रस्तानचे २५ लाख निधीतील काम तातडीने सुरु करावे अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नवाज कुरेशी,अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष जावेद शेख,फकीर कुरेशी,अजीज शेख,मौलाना मुस्कार,डॉ.झिया शेख,जुनेद शेख,रियाज शेख,परवेज शेख,युसूफ पठाण,आमीन पठाण आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close