जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

कोपरगाव नगरपरिषद हद्दीत रस्ता रुंदी वाढवा-मागणी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील सर्वे नंबर २०६/२ मधील नगरपालिका हद्दीत रस्त्याची रुंदी वाढवून रस्ता करून द्या अशा मागणीचे निवेदन स्थानिक रहिवाशांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना दिले आहे.

सदर प्रसंगी मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी आपण या प्रकरणी संबंधितांना बोलावून घेऊन या प्रश्नी त्यांची भूमिका समजावुन घेऊ व त्यावर योग्य कार्यवाही करू असे आश्वासन उपस्थित महिला व नागरीकांना दिले आहे.

त्यांनी दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की,”येवला नाका सर्वे नंबर २०६/२ मध्ये मागील अनेक वर्षापासून रस्ता आहे.हा परिसर नगरपालिका हद्दीत असून या रस्त्यावर काही प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या आहेत.या अडचणी दूर करण्यात याव्यात यासाठी अनेक वेळा कोपरगाव नगरपालिकेकडे पाठपुरावा केलेला आहे मात्र पालिका प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही असा दावा करून आमच्या अर्जाची गांभीर्याने दखल घेऊन या रस्त्यावर झालेल्या अडचणी दूर करून व रस्त्याचे रुंदी वाढवावी व रस्ता करून द्यावा असे दिलेल्या निवेदनात शेवटी म्हटले आहे.

सदर प्रसंगी मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी आपण या प्रकरणी संबंधितांना बोलावून घेऊन या प्रश्नी त्यांची भूमिका समजावुन घेऊ व त्यावर योग्य कार्यवाही करू असे आश्वासन उपस्थित महिला व नागरीकांना दिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close