जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

कोपरगावात जनगणना…या तारखेपासून होणार सुरू मुख्याधिकारी

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

  सन-२०११ नंतरची जनगणना सन २०२१ मध्ये पार पडणे अपेक्षित असताना कोविड च्या प्रादुर्भावामुळे ही जनगणना पुढे ढकलण्यात आलेली होती.वर्तमानात जनगणनेचे कामकाज कोपरगावसह संपूर्ण देशात सुरु झालेले असून यामध्ये ०२ टप्प्यात जनगणना कामकाज पार पाडले जाणार असून पहिला टप्पा १६ मे पासून सुरू होत आहे.या प्रक्रियेत कोपरगाव शहरातील नागरिकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी एका प्रसिद्धीपत्रकांवये केले आहे.

सुहास जगताप,मुख्याधिकारी,कोपरगाव.

जनगणना कायदा,१९४८च्या कलम ११ (१) (ड) अंतर्गत, जनगणना प्रगणकाने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यास नकार देणे किंवा खोटी माहिती देणे हा गुन्हा आहे.या कलमानुसार दोषी व्यक्तीला एक हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. गंभीर प्रकरणांमध्ये तीन वर्षांच्या तुरुंगवासाचीही तरतूद असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. 

कल्याणकारी योजनांचे नियोजन,संसाधनांचे न्याय्य वाटप,मतदारसंघांची पुनर्रचना,आपत्ती व्यवस्थापन,स्थलांतर आणि शहरीकरण नियोजन या दृष्टीने जनगणनेचे मोठे महत्त्व आहे.लोकसंख्येचे अचूक आकडे मिळतात, सामाजिक-आर्थिक स्थिती कळते,त्यामुळे सरकारला योजनांची प्रभावी अंमलबजावणी करता येते.पायाभूत सुविधांची उभारणी कुठे आवश्यक आहे ते स्पष्ट होते.शिक्षण,आरोग्य, रोजगाराचे अचूक नियोजनकरता येते.त्यामुळे जनगणनेला महत्व असल्याने केंद्र सरकारने ०१ एप्रिल पासून या योजनेचा प्रारंभ केला आहे.कोपरगाव नगरपरिषद हद्दीतही या योजनेचा प्रारंभ करण्यात आला असून प्रशिक्षण सुरू झाले आहे.या पार्श्वभूमीवर पालिकेचे मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी हे प्रसिद्धी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.

त्यात त्यांनी म्हटले आहे की,”यावेळेस ची जनगणना ही संपूर्णतः डिजिटल पद्धतीने राबविली जाणार असून जणगनणेचा पहिला टप्पा हा दिनांक १६ मे ते १४ जून या कालावधीत पार पडणार आहे.यापुर्वी १५ दिवस म्हणजेच ०१ मे ते १५ मे या कालावधीत नागरिकांसाठी स्व-गणनेचा पर्याय उपलब्ध असणार आहे.यावेळी प्रथमच स्व-गणना या पर्यायाद्वारे नागरिकांना आपल्या कुटुंबाची माहिती सेन्सस (Census) पोर्टल वर भरता येणार आहे.स्व-गणना कालावधी संपल्यावर म्हणजेच दिनांक १६ मे ते १४ जून या कालावधीत प्रगणाकांमार्फत घरांना प्रत्यक्ष भेटी देऊन माहिती संकलनाचे काम सुरु होणार आहे.या अनुषंगाने कोपरगाव शहर हद्दीतील जनगणनेचे कामाकरीता मुख्याधिकारी सुहास जगताप यांची चार्ज अधिकारी तर उपमुख्याधिकारी,संचित धुमाळ यांची अतिरिक्त चार्ज अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.

   दरम्यान कोपरगाव शहरातील १५ प्रभागांकरिता एकूण २१ पर्यवेक्षक,त्यांना नेमून दिलेले १२४ प्रगणक,अन्य ०२ राखीव पर्यवेक्षक व १२ राखीव प्रगणक,०४ चार्ज युजर असे एकूण १६३ शिक्षक,अधिकारी, कर्मचारी यांचे माध्यमातून क्षेत्रीय कार्य व त्यावरील नियंत्रणाचे काम पार पाडले जाणार आहे.सर्व नियुक्त प्रगणक व पर्यवेक्षक यांना ०३ फिल्ड ट्रेनर द्वारे प्रशिक्षण देण्यात येणार असून याकरिता श्री सदगुरु गंगागीर महाराज महाविद्यालयाचे सहकार्य लाभले असून कॉलेज च्या सुसज्ज अशा सभागृहात दिनांक २७ पासून प्रारंभ करण्यात आला आहे ते २९ एप्रिल व दिनांक ०४ ते ०६ मे या कालावधीत एकूण ०४ प्रशिक्षण बॅचचे नियोजन करण्यात आलेले आहे.सदर प्रशिक्षणाची सुरवात दिनांक २७ एप्रिल रोजी करण्यात आलेली आहे.
प्रगणाकांमार्फत घरांना प्रत्यक्ष भेटी देऊन माहिती संकलनाचे काम सुरु होणेपुर्वी नागरिकांना स्व-गणना करता येणार असल्याने शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी हा पर्याय निवडून जनागानाने च्या राष्ट्रीय कार्यात हातभार लावावा,तसेच आपल्या घरी भेट देणाऱ्या जनगणना कर्मचाऱ्यांशी सौहार्दपूर्णपणे व्यवहार करून आपल्या कुटुंबाची खरी माहिती पुरवावी असे आवाहन मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी शेवटी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close