कोपरगाव शहर वृत्त
…या शहरात कुटुंबांना मिळणार घरे-..यांची माहिती

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव नगरपालिका हद्दीतील स्वतःच्या हक्काचे घर नसणाऱ्या आणि कच्च्या घरात राहणाऱ्या नागरिकांना हक्काचा निवारा मिळवून देण्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी शासन दरबारी केलेल्या पाठपुराव्यातून प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून शहरातील ४८ पात्र लाभार्थ्याच्या घरकुलांना मंजुरी मिळाली असून या लाभार्थ्यांना सोमवार दि.१६ रोजी मंजुरी पत्रांचे आदेश अधिकृतपणे वितरीत करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मेहमूद सय्यद यांनी दिली आहे.

“कोपरगाव नगरपालिका हद्दीत स्वतःचे हक्काचे घर मिळवण्यासाठी पंतप्रधान आवास योजना (शहरी) आणि रमाई आवास योजना या प्रमुख सरकारी योजना आहेत.या योजनांअंतर्गत पात्र बेघर व्यक्तींना किंवा कच्च्या घरात राहणाऱ्यांना पक्के घर बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते.त्यात ही घरे मंजूर झाली असल्याची माहिती नगरसेवक महमूद सय्यद यांनी दिली आहे.
कोपरगाव नगरपालिका हद्दीत स्वतःचे हक्काचे घर मिळवण्यासाठी पंतप्रधान आवास योजना (शहरी) आणि रमाई आवास योजना या प्रमुख सरकारी योजना आहेत.या योजनांअंतर्गत पात्र बेघर व्यक्तींना किंवा कच्च्या घरात राहणाऱ्यांना पक्के घर बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते.यासाठी संबंधित नगरपालिकेत अर्ज करावा लागतो.त्यानंतर त्या प्रस्तावांची छाननी होऊन त्याचा सरकारकडे पाठपुरावा केल्यानंतर ते मंजूर होतात.मागील वर्षी या योजनेसाठी विशेष प्रयत्न करून या प्रयत्नांमुळेच कोपरगाव शहरातील ३१० पात्र कुटुंबांना यापूर्वीच हक्काची घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.ही परंपरा पुढे सुरू ठेवत याहीवर्षी पुन्हा ४८ कुटुंबांसाठी घरकुल मंजूर करून आणण्यात त्यांना यश मिळाले आहे.फक्त घरकुले मंजूर करून घरकुल अनुदान आणि अनुदान हप्ते वेळेवर मिळावे यासाठीसुद्धा ते प्रयत्न करीत असतात त्यामुळे शहरातील गरीब व गरजू कुटुंबांमध्ये हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण झाल्याने आनंदाचे वातावरण आहे.

कोपरगाव नगरपालिकेच्या हद्दीत राहणाऱ्या आणि घरकुल योजनेच्या अटींची पूर्तता करणाऱ्या प्रत्येक पात्र लाभार्थ्याला या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी ते प्रयत्न करत आहे.ज्या कुटुंबांकडे स्वतःची जागा आहे परंतु आर्थिक परिस्थिती अभावी पक्के घर बांधणे शक्य नाही अशा नागरिकांना केंद्र आणि राज्य शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेतून घरकुलाचा लाभ मिळवून देण्यासाठी यापुढेही राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक पाठपुरावा करीत राहणार असल्याचे नगरसेवक मेहमूद सय्यद यांनी शेवटी सांगितले आहे.


