जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

श्री गुरु तेग बहादूर साहिब यांचे सारखी छत्रपतींची देशात जयंती होण्याची गरज

न्यूजसेवा

कोपरगाव -(नानासाहेब जवरे)

  ‘ हिंद दी चादर’ हा शीख धर्माचे नववे गुरू,श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी शताब्दीनिमित्त हा सोहळा गुरूंच्या त्याग,धर्मरक्षण आणि मानवतेच्या संदेशाला समर्पित असून,शाळांमध्ये निबंध,चित्रकला,आणि समूह गायनातून त्यांच्या बलिदानाची स्मृती जागृत केली जाते असून हा उपक्रम स्तुत्य आहेच पण त्याचं बरोबर केंद्र सरकारने अखंड भारताला मुस्लिम आक्रमणापासून वाचविण्यास महत्वाचे योगदान दिल्याने त्यांची पुण्यतिथी देशभर सुरू करून त्यांचे योगदान देशापुढे आणण्याची गरज असल्याचे प्रतिपादन कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी नुकतीच केले आहे.

श्री गुरु तेग बहादुरर्जी साहिब.

“छत्रपती शिवाजी महाराज जोपर्यंत जिवंत होते तो पर्यंत औरंगजेबाला महाराष्ट्रात येण्याचे धाडस झाले नाही.तत्कालीन सात पात शाह्यांनी त्यांच्या कार्याचा धसका घेतला होता.मात्र आजही त्यांची जयंती केवळ महाराष्ट्रात साजरी होते.किंवा जेथे जेथे मराठी माणूस आहे त्या ठिकाणी ती साजरी होते.मात्र उत्तर भारतात ती अभावाने साजरी होते.मात्र वर्तमानात देशात हिंदवी विचारांचे सरकार असल्याने त्यांनी ही जयंती देशभर साजरी करण्यासाठी शासन आदेश काढून ती साजरी करणे गरजेचे आहे”-राजेंद्र झावरे,माजी नगराध्यक्ष,कोपरगाव नगरपरिषद.

    सदरचे वृत्त असे की,”वर्तमानात गुरु तेग बहादूरजी यांनी धर्म स्वातंत्र्य आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी दिल्लीच्या चांदनी चौकात बलिदान दिले.त्यांना ‘हिंद दी चादर’ (भारत भूमीचे कवच) म्हटले जाते.या वर्षी शीख परंपरेचे नववे गुरु श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या बलिदानाच्या ३५० व्या जयंतीनिमित्त,संपूर्ण भारतात विविध धार्मिक आणि सामाजिक संघटना असंख्य कार्यक्रमांचे आयोजित करत आहेत.संघर्षाच्या त्या काळात भारताचा बराचसा भाग परदेशी शासक औरंगजेबाच्या क्रूर अत्याचारांनी त्रस्त होता.जुनी,खोलवर रुजलेली धार्मिक संस्कृती आणि श्रद्धा नष्ट करण्यासाठी संपूर्ण देशात जबरदस्तीने धर्मांतर केले जात होते.त्याच काळात,पंडित कृपाराम दत्त यांच्या नेतृत्वाखाली काश्मीर खोऱ्यातील समुदायाचे प्रमुख सदस्य मार्गदर्शनासाठी श्री गुरु तेग बहादूर जी यांच्याकडे गेले.तत्कालीन परिस्थितीचे गांभीर्य समजून गुरुजींनी औरंगजेबाच्या क्रूर राजवटीला आव्हान देत समाजाला जागृत करण्यासाठी आपले बलिदान देण्याचा निर्धार केला.कट्टर,मूलतत्त्ववादी राजवटीने त्यांना अटक केली आणि इस्लाम स्वीकारण्यास किंवा मृत्युदंड स्वीकारण्यास सांगितले.जुलमी राजवटीसमोर झुकण्याऐवजी गुरु तेग बहादूर यांनी मृत्युदंड स्वीकारला.गुरु तेग बहादूर यांचा संकल्प आणि आत्मविश्वास तोडण्याच्या प्रयत्नात,मुघल साम्राज्याने त्यांचे शिष्य,भाई दयाला यांना गरम तेलात उकळून मृत्यू दिला तर भाई सतीदास यांना कापसाच्या लोकरीत गुंडाळून क्रूर हत्या केली शिवाय भाई मतिदास यांची क्रूरपणे हत्या केली  होती.मार्गशीर्ष शुक्ल ५,संवत १७३२ (१६७५) रोजी तेग बहादूर दिल्लीच्या चांदणी चौकात धर्माचे रक्षण करत दिव्य प्रकाशात विलीन झाले होते.त्यांच्या हौतात्म्याने धर्माच्या रक्षणासाठी संपूर्ण त्याग आणि संघर्षाचे वातावरण निर्माण केले,ज्यामुळे मुघल राजवटीचा पाया हादरवला गेला होता.गुरु तेग बहादूरजींचे जीवन समाजातील धार्मिक श्रद्धा मजबूत करण्यासाठी आणि रूढीवादी कल्पना आणि वाईट गोष्टींपासून मुक्त करण्यासाठी आणि सामाजिक कल्याणासाठी समर्पित होते.त्यांनी चांगले जीवन जगण्यासाठी आनंद आणि दुःख,स्तुती आणि निंदा,सन्मान आणि अपमान,लोभ आणि आसक्ती,वासना आणि क्रोध याचा त्याग करण्याचा सल्ला दिला.मुघलांच्या अत्याचारांनी दहशतग्रस्त असलेल्या समाजात,“भाई कहू को देत नाही,न भय मानत आणिनी” (कोणालाही घाबरवू नका आणि कोणालाही घाबरू नका) या त्यांच्या संदेशाने भीती दूर केली आणि धर्माचे रक्षण करण्याची भावना जागृत केली.भारतीय परंपरेतील तेजस्वी तारा,श्री गुरु तेग बहादूर जी यांना खरी श्रद्धांजली म्हणजे त्यांचे विचार आणि बलिदानाचे महत्त्व जनतेपर्यंत पोहोचवणे हे आहे.त्याला सर्वच समाजाने दाद दिली आहे.दरम्यान पंजाबातील शीख समाजाने यापूर्वी 
संत नामदेव महाराज यांना आपलेसे करून यांचे वर्णन आणि त्यांची पवित्र रचना गुरू ग्रंथ साहिब या पवित्र ग्रंथात समाविष्ट केली आहे.मात्र अद्याप छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वतंत्र भारताचे विचार अद्याप पर्यंत देशभर पोहचलेले दिसत नाही.कारण मध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचा चित्रपट प्रसिद्ध झाल्यानंतर अनेकांना त्यावेळी यांचे जीवन चरित्र माहिती झाल्याने अनेकांनी वाचले असेल.अशीच स्थिती अद्याप छत्रपती शिवाजी महाराज यांचे बाबत आढळून येत असल्याने त्याबाबत त्यांचे विचार आणि कार्य सामान्य जनतेपर्यंत पोहचणे आवश्यक आहे.

छत्रपती शिवाजी महाराज.

“गुरु तेग बहादूरजींचे जीवन समाजातील धार्मिक श्रद्धा मजबूत करण्यासाठी आणि रूढीवादी कल्पना आणि वाईट गोष्टींपासून मुक्त करण्यासाठी आणि सामाजिक कल्याणासाठी समर्पित होते.त्यांनी चांगले जीवन जगण्यासाठी आनंद आणि दुःख,स्तुती आणि निंदा,सन्मान आणि अपमान,लोभ आणि आसक्ती,वासना आणि क्रोध याचा त्याग करण्याचा सल्ला दिला होता.ते आजही भारताचे आदर्श आहे पण हे करताना छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार भारतभर पोहचणे गरजेचे आहे”-विजय वहाडणे,माजी नगराध्यक्ष, कोपरगाव नगरपरिषद.

   छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य असून त्यांची जयंती (त्यांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी झाला) नुकतीच १९ फेब्रुवारी रोजी साजरी केली आहे.त्यांचा
३ एप्रिल १६८० त्यांचा मृत्यू झाला होता) हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते.शिवनेरीवर जन्मलेले शिवाजी महाराज हे शहाजीराजे भोसले आणि राजमाता जिजाबाईंचे पुत्र होते.त्यांनी विजापूरच्या आदिलशाही आणि मुघलांच्या बलाढ्य शक्तींशी लढा देत मावळ्यांच्या सोबतीने स्वराज्य स्थापन केले.त्यांनी १६७४ मध्ये रायगडावर छत्रपती म्हणून राज्याभिषेक केला.शिवाजी महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता. त्यांच्यावर माता जिजाबाईंनी उत्तम संस्कार केले.महाराजांनी वयाच्या अवघ्या १५-१६ व्या वर्षी,२७ एप्रिल १६४५ रोजी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली.त्यांनी तोरणा,कोंढाणा (सिंहगड),पुरंदर,रायगड यांसारखे महत्त्वाचे किल्ले जिंकले होते.१६५९ साली विजापूरच्या आदिलशाहाने धाडलेल्या अफजल खानाचा प्रतापगडाच्या पायथ्याशी वध केला शिवाय त्यांनी शाईस्तेखानची १६६३ साली पुण्यात लाल महालात शिरून शाहिस्तेखानाची बोटे छाटली होती व त्याची फजिती केली होती.त्यानंतर त्याला औरंगजेबाने आपल्या मामाचे थेट तोंड न पाहता त्याची पश्चिम बंगाल मध्ये रवानगी केली होती.त्यानंतर त्यांनी औरंगजेबाचा खजिना लुटण्यासाठी व मुघलांच्या खजिन्याला धक्का लावण्यासाठी स्वराज्याची केलेली लूट वसुलीसाठी त्यांनी सुरतेवर छापा टाकला व स्वराज्य बळकट केले होते.याशिवाय त्यांनी मोठ्या हिकमतीने १६६६ साली आग्र्याहून औरंगजेबाच्या कैदेतून अत्यंत हुशारीने सुटका करून घेतली होती.त्यांनी आपला राज्याभिषेक ६ जून १६७४ रोजी रायगडावर करून घेऊन ते ते ‘छत्रपती’ झाले.त्यानंतर आपल्या स्वराज्याचा कारभार चालवण्यासाठी त्यांनी आठ मंत्र्यांचे ‘अष्टप्रधान मंडळ’ नियुक्त केले होते.त्यानंतर त्यांनी दक्षिण दिग्विजय करून त्यांनी दक्षिण भारतात आपल्या राज्याचा विस्तार केला होता.येथील मंदिरे आणि प्राचीन संस्कृतीचे रक्षण केले होते.छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय नौदलाचे जनक म्हणून आजही स्वतंत्र भारतात मानाचे स्थान आहे.छत्रपती शिवाजी महाराज जोपर्यंत जिवंत होते तो पर्यंत औरंगजेबाला महाराष्ट्रात येण्याचे धाडस झाले नाही.तत्कालीन सात पात शाह्यांनी त्यांच्या कार्याचा धसका घेतला होता.मात्र आजही त्यांची जयंती केवळ महाराष्ट्रात साजरी होते.किंवा जेथे जेथे मराठी माणूस आहे त्या ठिकाणी ती साजरी होते.मात्र उत्तर भारतात ती अभावाने साजरी होते.मात्र वर्तमानात देशात हिंदवी विचारांचे सरकार असल्याने त्यांनी ही जयंती देशभर साजरी करण्यासाठी शासन आदेश काढून ती साजरी करून छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्थान नेमके कोठे आहे हे दाखवून देणे गरजेचे आहे.आज पर्यंत गुजरात आणि प्रदेशात सुरत शहरात शिवाजी महाराजांना लुटारू म्हणूनच ओळखले जात होते.हे दुर्दैवी आहे.त्यासाठी राज्य सरकारसह केंद्र सरकारने पुढाकार घेऊन शीख धर्माचे नववे गुरू,श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी शताब्दी सारखा देशभर हा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्सव साजरा करण्याची गरज आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close