कोपरगाव शहर वृत्त
कोपरगाव एक्स्पोत नागरिकांना मोफत प्रवेश देणार!

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगावात लायन्स क्लबच्या वतीने पाच दिवस संपन्न होत असलेल्या एक्स्पो २०२६ साठी अल्पबचत गटांना मोफत स्टॉल उपलब्ध करून देत असून कोपरगाव शहरातील व्यापाऱ्यांना कमी दरात स्टॉल उपलब्ध करून देत असून सकाळी १० ते सायंकाळी ०६ पर्यंत नागरिकांना या ठिकाणी मोफत प्रवेश देणार असल्याची माहिती कोपरगाव क्रेडाईचे अध्यक्ष राजेश ठोळे यांनी एका कार्यक्रमात बोलताना दिली आहे.

दरम्यान या पाच दिवसाच्या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री लिमये,प्रसिद्ध विनोदी अभिनेते ऋषी हराळ,स्पृहा जोशी उपस्थित राहणार आल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.या उपक्रमाचा लाभ व्यापारी,ग्राहक, आणि नागरिकांनी घ्यावा असे आवाहन शेवटी केले आहे.
कोपरगाव लायन्स क्लब,क्रेडाई आणि कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना यांच्या संयुक्त विद्यमाने १३ वा एक्स्पो २०२६ चे दि.१२ फेब्रुवारी ते १६ फेब्रुवारी रोजी महात्मा गांधी ट्रस्ट प्रदर्शन हॉल या ठिकाणी आयोजन करण्यात येत आहे.त्या निमित्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.त्यावेळी ते बोलत होते.
सदर प्रसंगी माजी नगरसेवक सत्येन मुंदडा,उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर,माजी नगरसेवक दिनार कुदळे,क्रेडाईचे अध्यक्ष राजेश ठोळे,लायन्सचे अध्यक्ष अक्षय गिरमे, लिओचे अध्यक्ष धीरज कराचीवाला, लीनेन्सच्या अध्यक्षा सोनाली गिरमे आदीसह बहुसंख्य मान्यवर उपस्थित होते.
सदर प्रसंगी लायनेन्स अध्यक्षा सोनाली गिरमे म्हणाल्या की,”विद्यार्थ्यांसाठी दिनांक १२ फेब्रुवारी रोजी दुपारी ०४ वाजता चित्रकला स्पर्धा,सुंदर अक्षर स्पर्धा,नृत्य स्पर्धा,निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.तर याशिवाय विविध राज्यांची वेशभूषा परंपरा,लोकनृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी पंकज आशिया यांचे हस्ते करण्यात येणार आहे.या कार्यक्रमाचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे हे राहणार आहे.तर प्रमुख उपस्थिती क्रेडाईचे अध्यक्ष प्रफुल्ल तावरे,उपाध्यक्ष सुनील कोतवाल,गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे,कृष्णा इंझिटेक च्या संचालिका मीनल वर्मा आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे.
दरम्यान शुक्रवार १३ फेब्रुवारी सकाळी १०. वा.डिपोल पब्लिक स्कूल प्रायोजित निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.त्यासाठी प्रमुख उपस्थिती गौतम बँकेचे अध्यक्ष संजय आगवण कोपरगाव जिनिंगचे अध्यक्ष गोरख जामदार आदी उपस्थित राहणार आहे.तर सायंकाळी ६.वा.समर्थ वर्मा ग्रुप प्रायोजित डान्स कोपरगाव डान्स स्पर्धा संपन्न होणार आहे.यासाठी प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री लिमये,अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर,सहकार महर्षी कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे,अपर पोलिस अधीक्षक सोमनाथजी वाकचौरे,साईबाबा संस्थान चे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षजी गाडीलकर,संजीवनी महिला गृह उद्योग च्या अध्यक्षा रेणुका कोल्हे,कृष्णा एन्झिटेक प्रा.लि.चे संचालक विक्रम वर्मा आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे.
दरम्यान तिसऱ्या दिवशी १४ फेब्रुवारी रोजी साई कॉम्प्युटर सेंटरच्या वतीने चित्रकला स्पर्धा आयोजित केल्या आहेत.त्यासाठी प्रमुख उपस्थिती माजी नगराध्यक्षा सुहासनी कोयटे, कोपरगाव नगरपरिषद गटनेत्या गौरी पहाडे,तर संध्याकाळी ०६ वाजता समर्थ ग्रुपच्या वतीने डान्स स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.त्यासाठी प्रमुख उपस्थिती शिर्डीचे खा. भाऊसाहेब वाकचौरे,माजी आ.अशोक काळे,उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती,तहसीलदार महेश सावंत,क्रेडाईचे सचिव आशिष पोखरणा,राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे,महात्मा गांधी ट्रस्टचे सचिव धरम बागरेचा,हिमांशी वर्मा,आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे.
दरम्यान १५ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता भास्कर मॅथ्स अँड सायन्स अकादमीचे आयोजित सुंदर हस्ताक्षर स्पर्धा आयोजित केल्या आहेत.त्यासाठी प्रमुख उपस्थिती कर्मवीर काळे कारखान्याचे उपाध्यक्ष प्रवीण शिंदे,शरद पवार नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष देवेन रोहमारे,गौतम कुक्कुट पालन संस्थेचे अध्यक्ष विजय कुलकर्णी हे उपस्थित राहणार आहे. तर संध्याकाळी ०६ वाजता तुलसीदास खुबानी पुरस्कृत कॉमेडी नाटक स्पर्धा आयोजित केली आहे.त्यासाठी प्रमुख उपस्थिती आ.सत्यजित तांबे,चैताली काळे,नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुहास जगताप,शहर पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार,लायन्सचे प्रांताधिकारी राजेश अग्रवाल,तुलसीदास खुबानी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे.
*पत्रकार नानासाहेब जवरे* यांच्या विश्वसनीय बातम्यासाठी *’न्यूजसेवा‘* वाचा आणि खालील लिंकवर क्लिक करून ग्रुप’मध्ये सामील व्हा.
https://bit.ly/newsseva2025
*न्यूजसेवा* डिजिटल युग डिजिटल बातमी.
दरम्यान दिनांक १६ रोजी सायंकाळी ०६ वाजता पारितोषिक वितरण समारंभ होणार असून त्याला प्रमुख उपस्थिती माजी आ.स्नेहलता कोल्हे,संजीवनीचे अध्यक्ष बिपीन कोल्हे,प्रांताधिकारी माणिक आहेर,तालुका पोलिस निरीक्षक संदीप कोळी,प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे, कोपरगाव चे नगराध्यक्ष पराग संधान,कॉलेजन लाईफ सायन्स चे अध्यक्ष सम्राट वर्मा,गिरीश मालपाणी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे.तरी या कार्यक्रमाचा कोपरगाव,येवला,राहाता,वैजापूर,निफाड,सिन्नर तालुक्यातील नागरिकांनी,व्यापाऱ्यांनी,ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहन सत्येन मुंदडा यांनी शेवटी केले आहे.



