जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

कोपरगावातील…या रस्त्याच्या कॉंक्रिटीकरण कामास प्रारंभ

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील न अंगरिकांच्या दळणवळणासाठी महत्वपूर्ण ठरत असलेला व आ.आशुतोष काळे यांनी १६ लाख रुपये मंजूर केलेला अ.नगर-मनमाड रस्ता ते जानकीविश्व या रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामास मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात प्रारंभ करण्यात आला आहे.

   

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी अनिरुद्ध काळे व सोमनाथ आढाव यांनी या भागातील नागरिकांची होत असलेली गैरसोय त्यामुळे या रस्त्याला ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी या रस्त्यासाठी निधी द्यावा अशी मागणी आ.आशुतोष काळे यांच्याकडे केली होती.त्यातून १६ लाख रुपयांचा निधी आ.काळे यांनी मंजूर केला आहे.

  कोपरगाव शहरातील अ.नगर-मनमाड महामार्ग ते जानकीविश्व ह्या रस्त्याचे अस्तित्व जवळपास संपले होते.त्यामुळे अहमदनगर-मनमाड महामार्गालगत असणाऱ्या आढाव वस्ती,जानकी विश्व,साई सिटी,भामानगर,रिद्धी सिद्धी नगर,निवारा सुभद्रानगर भागातील नागरिकांची मोठी गैरसोय झाली होती.विशेषत:ज्येष्ठ नागरीक,शाळा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता.त्याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी अनिरुद्ध काळे व सोमनाथ आढाव यांनी या भागातील नागरिकांची होत असलेली गैरसोय त्यामुळे या रस्त्याला ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी निधी द्यावा अशी मागणी आ.आशुतोष काळे यांच्याकडे केली होती.नागरिकांना होत असलेल्या त्रासाची गैरसोय लक्षात घेवून आ.काळे यांनी या रस्त्यासाठी १६ लक्ष रुपये निधी दिला असून नुकतेच या रस्त्याच्या कॉंक्रीटीकरण कामास प्रत्यक्षात सुरुवात केली आहे.

   यावेळी अनिरुद्ध काळे,सोमनाथ आढाव,कार्तिक सरदार,सतीश आढाव,विनोद थोरात,शशिकांत शेळके,सचिन थोरे,वाल्मिक चांदर,सार्थक आढाव,संजय अधिकार,माऊली बिडगर,सचिन गोर्डे,विजय खेडकर,बंडू आढाव,सागर जाधव,बाबासाहेब आढाव, शंकर आढाव,विठ्ठल आढाव,संतोष आढाव,भूषण मराठे आदी उपस्थित होते.
  दरम्यान या कामाबद्दल आढाव वस्ती,जानकी विश्व,साई सिटी,भामानगर,रिद्धी सिद्धी नगर,निवारा सुभद्रानगर भागातील नागरिकांनी आ.काळे यांचे आभार मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close