जाहिरात-9423439946
जलसंपदा विभाग

उजनी उपसा जलसिंचन योजना सुरु राहणार-माहिती

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

रांजणगाव देशमुख,जवळके,धोंडेवाडी,वेस,सोयगाव,अंजनापूर,बहादरपूर,मनेगाव आदी गावातील व परिसरातील शेती व शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण असलेली रांजणगाव देशमुख उजनी उपसा जलसिंचन योजना दुसऱ्या टप्यातील थकीत वीज बिल व वीज मोटारींची व पंपांची दुरुस्तीची कामे सुरु झाले असून हि उजनी चारी उपसा जलसिंचन योजना यावर्षीही सुरु राहणार आहे असल्याची माहिती रांजणगाव देशमुख उजनी उपसा जलसिंचन योजनेचे अध्यक्ष बाबुराव थोरात यांनी दिली आहे.

 

सन-२००४ पर्यंत बंद ठेवलेली कोपरगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील जिरायती गावांना वरदान असलेली उजनी चारी उपसा जलसिंचन योजना माजी खा.सूर्यभान पाटील वहाडणे यांनी १९९३च्या या भागातील विविध आंदोलनानंतर सुरु केली होती.ती निवडणूका आल्यावर नेत्याना या योजनेची हमखास आठवण आल्याशिवाय रहात नाही हे तिचे वैशिष्ट्य राहिले आहे.

  सन-२००४ पर्यंत बंद ठेवलेली कोपरगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील जिरायती गावांना वरदान असलेली उजनी चारी उपसा जलसिंचन योजना माजी खा.सूर्यभान पाटील वहाडणे यांनी १९९३च्या या भागातील विविध आंदोलनानंतर सुरु केली होती.पुन्हा सुरु करण्यासाठी माजी आ.अशोक काळे यांनी २००५ साली विधानसभेच्या अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित करून या योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळवत हि योजना पूर्ववत सुरु करून पश्चिम भागातील गावांना त्यांच्या १० वर्षाच्या कार्यकाळात मोठा दिलासा दिला होता.दुर्दैवाने २०१४ नंतर या योजनेकडे पुन्हा दुर्लक्ष झाल्यामुळे हि योजना बंद पडून या भागातील शेती व शेतकऱ्यांचे भवितव्य धोक्यात आले असतांना आ.आशुतोष काळे यांनी आपल्या २०१९ च्या विधानसभा जाहीरनाम्यात उजनी चारी उपसा जलसिंचन योजना पुन्हा सुरु करण्याचा दिलेला शब्द दिला होता.

   त्यासाठी दरवर्षी येणारे वीज मोटारीचे वीज बिल व वीज मोटारीच्या पंपांच्या दुरुस्तीसाठी येणाऱ्या खर्चासाठी करावी लागणारी तरतूद काळे सहकारी साखर कारखाना करीत आहेत.त्यामुळे २०१९ ते २०२४ पर्यंत हि योजना कार्यान्वित राहिली आहे. यावर्षी देखील हि योजना कार्यान्वित ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या मोठ्या क्षमतेच्या वीज मोटारी व पंपांच्या दुरुस्ती कामास सुरुवात करण्यात आली असून महावितरणचे सहाय्यक अभियंता अरविंद अग्रवाल,कनिष्ठ अभियंता रोशन टर्ले यांनी भेट देवून सुरु असलेल्या कामाची पाहणी केली.पाईपलाईन लिकेज व इतर किरकोळ कामाबरोबरच दुसऱ्या टप्यातील थकीत विजेचे बिल देखील महावितरणला अदा करण्यात आले असल्याची माहिती या योजनेचे अध्यक्ष बाबुराव थोरात यांनी दिली आहे.त्यामुळे रांजणगाव देशमुख,जवळके,धोंडेवाडी,वेस,सोयगाव,अंजनापूर,बहादरपूर,मनेगाव आदी गावातील व परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close