जाहिरात-9423439946
आंदोलन

गोदावरी कालवे जल-पुनर्रस्थापना समिती स्थापन,वरिष्ठ अधिकाऱ्यांची घेतली भेट !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

गोदावरी खोऱ्यातील पाण्याची तूट भरून काढण्यासाठी आता शेतकऱ्यांची संघटना स्थापना करणे गरजेचे असून आता या कामासाठी प्रलंबित निळवंडे कालव्यांसारखे नेत्यांवर अवलंबून रहाणे धोक्याचे बनले असल्याची जाणीव ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यात झाल्याने याबाबत आता शेतकऱ्यांनी माजी नगराध्यक्ष पद्मकांत कुदळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढाकार घेतला असून त्यावर काम करण्यास प्रारंभ केला आहे व गोदावरी कालवे जल-पुनर्स्थापना समिती स्थापना केली असून त्यासाठी नुकतीच जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता डॉ.संजय बेलसरे यांची भेट घेऊन याबाबत काम सुरु केले आहे.त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

“गोदावरी कालवे शंभर वर्षाचे होऊनही त्या कालव्यांचे पाणी वाढणे गरजेचे असताना दर निवडणुकीत येथील शेतकऱ्यांना आश्वासनापलीकडे काहीही मिळाले नाही.त्यामुळे शेतकऱ्यांची घोर निराशा झाली आहे.आता आपल्यालाच आपले शेतीसिंचनाचे पाणी मिळविण्यासाठी बाहेर पडणे गरजेचे आहे.अन्यथा आगामी पिढी आपल्याला माफ करणार नाही म्हणून हा शेती सिंचनाचा लढा उभारला आहे.त्यात शेतकऱ्यांनी सहभागी होणे अभिप्रेत आहे”-पद्मकांत कुदळे,माजी नगराध्यक्ष व प्रगतशील शेतकरी कोपरगाव.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव तालुक्यासह पर्जन्यछायेतील चाळीसगाव तालुक्यापासून सोलापूर जिल्ह्यातील अकलूज या तालुक्यासह नाशिक जिल्ह्यातील पर्वतरांगापासून पूर्व बाजूस शंभर कि.मी.अंतरापर्यंत हा भाग हजारो वर्षांपासून दुष्काळी भाग म्हणून ओळखला जात होता.त्यावर इंग्रज राजवट आल्यावर या भागात मोठ्या प्रमाणावर भूकबळी होत होते.त्या वेळी रेल्वे प्रगत झाली नव्हती.अशा काळी दळणवळण संसाधने प्रगत नव्हती त्यामुळे अन्न धान्य वेळेत आणणे शक्य होत नसल्याने हे मुत्यु थांबवणे शक्य नव्हते म्हणून लाखो जीव हातपाय खोडून,टाचा घासून मरत होते.अनेक गावे ओस पडत होती.त्यामुळे हा मुत्युदर असाच सुरु राहिला तर लवकरच केवळ दगड आणि भिंतीवर राज्य करावे लागेल अथवा या भागात लवकरच बंडाळी होऊन सरकार चालवणे शक्य होणार नाही याची जाणीव सरकारला झाली होती.म्हणून त्या काळी या भागात शेती सिंचनाचे पाणी फिरविण्यासाठी इंग्रज राजवटीने याभागात धरणे बांधण्यासाठी सर्व्हे केला होता.व त्याचा अहवाल इंग्रज राणीला पाठवला होता.त्यातून मोठ्या प्रमाणावर पाणी पडणाऱ्या नाशिक जिल्ह्यात धरणे बांधण्याचा निर्णय घेतला होता.त्यातून दारणा,भंडारदरा,नीरा,खडकवासला,आदी धरणाची निर्मिती झाली व पूर्व बाजूस शेती सिंचनासाठी जवळपास शंभर कि.मी.कालवे काढून या भागातील कृषि जीवन स्थिरस्थावर केले असल्याची नोंद इतिहासात आहे.

तथापि उत्तोरोत्तर नाशिक जिल्ह्यात उद्योग वाढ आणि शहराची प्रचंड झालेली वाढ,व त्यासाठी नवीन धरणांचा अभाव यामुळे या धरणांचे पाणी शेती सिंचनाकडून बिगर सिंचनाकडे वळवले गेले त्याचा प्राधान्यक्रम बदलला गेला व तो उद्योगकेंद्री केला.व आगामी साठ वर्षात याभागात सहकारी साखर कारखानदारीचे संस्थाने निर्माण झाली.त्यांची नेत्रदीपक प्रगती झाली मात्र ज्यासाठी ते साखर कारखाने निर्माण झाले ते शेतकरी भिकेला लागले.त्यांना कारखाण्याचे मालक बनविण्याचे आश्वासन मिळाले मात्र ते गुलाम बनवले गेले हे वास्तव आहे.या व्यवस्थेतून निर्माण झालेल्या संस्थानिक नेत्यांनी आपली संस्थाने व मद्यउद्योग सांभाळण्यासाठी शेतीसिंचन व शेतकरी यांच्याकडे सोयीस्कर कानाडोळा केला होता.हे करताना जनता लाचार बनविण्याचे कारस्थान रचले गेले हे गुपित लपून राहिले नाही.कार्यकर्ते दरिद्री राहतील याची व्यवस्था निर्माण केली.परिणामस्वरूप १९५३ साली नगर दौऱ्यावर आलेले भारताचे तत्कालीन पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांनी गौरविलेल्या या “भारताच्या कॅलिफोर्निया”चे शंभर वर्षात वाळवंट झाले आहे.हे सत्य आज कोण नाकारेल !

दर पंचवार्षिक निवडणुका आल्या की,मतदानावर डोळा ठेऊन दारणा धरणाच्या अकरा टी.एम.सी.पाण्याची,निळवंडे धरणाच्या कालव्यांची पिपाणी वाजवायची हा उघड ‘गोरखधंदा’ बनला.स्वातंत्र्यानंतर हा धंदा मोठा तेजीत आला आहे.लाचार फौजा जवळ बाळगलेले नेते स्वतः हस्तिदंती मनोऱ्यात सुरक्षित समजत आहेत.त्यातून नागवला गेलेला शेतकरी मात्र रस्त्यावर आलेला आहे.नेत्यांच्या नाकाखालून लाभक्षेत्राच्या बाहेर,व महानगराना व उद्योगांना शेती सिंचनाचे पाणी जाताना दिसत असताना ते हाताची घडी तोंडावर बोट ठेऊन पहात असतांना दिसत आहे.त्यामुळे गत ७५ वर्षात तो आता या थापांना वैतागला आहे.निवडणुकांच्या वेळेस दिलेली आश्वासने पाळण्यासाठी नसतात हे राज्याचे मुख्यमंत्री राजरोस सांगत सुटले असल्याने खालच्या संस्थानिकांनी गोष्टच सोडा.अशा स्थितीत आता शेतकऱ्यांना आपला लढा स्वतःच हातात घेण्याची वेळ येऊन ठेपली असून त्या साठी आता तरुणांची फळी पुढे येऊ घातली आहे.

त्यासाठी माजी नगराध्यक्ष पद्मकांत कुदळे यांनी अभ्यास करून पुढे येण्याचा निर्णय घेतला असून सर्व पदांना सोडण्याची वेळ आली तरी हा सिंचन निर्णय करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.त्याशिवाय यात शिवसेना,राष्ट्रवादी,काँग्रेस,मनसे आदी सर्व पक्षातील शेतकरी संघटीत झाले आहे.त्यांनी आपला लढा स्वतःच लढण्याचा निर्णय घेतला आहे.त्यासाठी त्यांना ५२ वर्षांपासून प्रलंबित असलेले कालवे केंद्रीय पातळी पासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत पाठपुरावा करून दोन जिल्ह्यातील सात तालुक्यातील १८२ दुष्काळी गावांना शेती सिंचनाचे पाणी मिळविण्यात यशस्वी ठरलेली,”निळवंडे कालवा कृती समिती” प्रेरणास्थान ठरली आहे.त्यांनी यासाठी नुकतीच एक बैठक घेऊन या लढ्याचे रणशिंग फुंकले आहे.

त्यांनी नुकतीच राज्याच्या उत्तर विभागाचे जलसंपदाचे मुख्यअभियंता ड़ॉ.संजय बेलसरे,नाशिक जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे,उपविभागीय अभियंता टी.के.थोरात आदींची भेट घेतली आहे.व नगर जिल्ह्यातील ऊर्ध्व गोदावरी कालव्यांचे पाणी पुनर्स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे.व त्यासाठी आयुधे गोळा करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यासाठी शिवसेनेचे तारोडी संपर्क प्रमुख व कोपरगाव तालुका सेनेचे नेते प्रवीण शिंदे,मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष गंगवाल,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नितीन शिंदे,तरुण कार्यकर्ते तुषार विध्वंस,जेष्ठ कार्यकर्ते सदाशिव उर्फ बाबा रासकर आदींनी उपस्थित होते.त्या मुले घटनेचा स्थानिक नेत्यांनी धसका असल्याचे विश्वसनीय वृत्त हाती आले आहे.त्यासाठी गोदावरी कालव्याच्या सिंचनाखालील शेतकऱ्यांनी एकत्र येण्याचे आवाहन व आपल्या प्रतिक्रिया कळविण्याचे आवाहन पद्मकांत कुदळे,तुषार विध्वंस,प्रवीण शिंदे,नितीन शिंदे,संतोष गंगवाल,सदाशिव (बाबा) रासकर आदींनी केले आहे.

दरम्यान याबाबत आमच्या प्रतिनिधीने माजी नगराध्यक्ष पद्मकांत कुदळे यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी,”गोदावरी कालवे शंभर वर्षाचे होऊनही त्या कालव्यांचे पाणी वाढणे गरजेचे असताना दर निवडणुकीत येथील शेतकऱ्यांना आश्वासनापलीकडे काहीही मिळाले नाही.त्यामुळे शेतकऱ्यांची घोर निराशा झाली आहे.आता आपल्यालाच आपले शेतीसिंचनाचे पाणी मिळविण्यासाठी बाहेर पडणे गरजेचे आहे.अन्यथा आगामी पिढी आपल्याला माफ करणार नाही म्हणून हा शेती सिंचनाचा लढा उभारला आहे.त्यात शेतकऱ्यांनी सहभागी होणे अभिप्रेत आहे”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close