आंदोलन
अहिल्यानगर नामांतर,प्रभावी अंमलबजावणी न झाल्यास आंदोलन-…यांचा इशारा

न्यूजसेवा
कोपरगाव (प्रतिनिधी)
अहिल्यानगर नामांतर होऊन जवळपास तीन वर्षे उलटली असून अद्यापही त्याबाबत प्रशासन प्रभावी अंमलबजावणी करत असल्याचे उघड आले आहे.त्यामुळे या नामांतराची काटेकोर अंमलबजावणी न झाल्यास आपण आंदोलन करणार असल्याचा इशारा महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच महाराष्ट्र राज्य,मुंबईचे अहिल्यानगरचे जिल्हाध्यक्ष सचिन कोळपे यांनी नुकताच एका प्रसिद्धी पत्रकान्वये केला आहे.

“महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असणाऱ्या चोंडी येथे 31 मे 2023 रोजी आपल्या जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर करण्याच्या ऐतिहासिक निर्णयाची घोषणा केली होती.त्यानंतर शासनाने या संदर्भातील शासन आदेश देखील काढला होता मात्र 3 वर्षे होऊन गेले तरी आपल्या जिल्ह्यामध्ये शासनस्तरावर अहिल्यानगर नामांतराची अंमलबजावणी झालेली दिसून येत नाही.काही स्थानिक नागरिकांमध्ये किंवा शासकीय कार्यालयांमध्ये अजूनही जुने नाव वापरले जात असल्यामुळे संभ्रम किंवा चिंता निर्माण होत आहे”-सचिन कोळपे,जिल्हाध्यक्ष,महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच महाराष्ट्र राज्य.
अहमदनगर जिल्ह्याचे ‘अहिल्यानगर’असे नामांतर करण्याची प्रशासकीय आणि कायदेशीर अंमलबजावणी पूर्ण झाली असून,ऑक्टोबर २०२४ मध्येच राज्य शासनाने याची अधिकृत अधिसूचना जारी केली आहे.महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असणाऱ्या चोंडी येथे 31 मे 2023 रोजी आपल्या जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर करण्याच्या ऐतिहासिक निर्णयाची घोषणा केली होती.त्यानंतर शासनाने या संदर्भातील शासन आदेश देखील काढला होता मात्र 3 वर्षे होऊन गेले तरी आपल्या जिल्ह्यामध्ये शासनस्तरावर अहिल्यानगर नामांतराची अंमलबजावणी झालेली दिसून येत नाही.काही स्थानिक नागरिकांमध्ये किंवा शासकीय कार्यालयांमध्ये अजूनही जुने नाव वापरले जात असल्यामुळे संभ्रम किंवा चिंता निर्माण होत आहे.ही अंमलबजावणी प्रभावीपणे होण्यासाठी आमच्या संघटनेने जिल्हाधिकारी,सार्वजनिक बांधकाम विभाग,जिल्हा परिषद तसेच सर्वच शासकीय विभागांना लोकप्रतिनिधी मार्फत आदेश होणे आवश्यक आहे.तसेच संबंधित अंमलबजावणी साठी आवश्यक तेथे शासनाला निधी देखील देण्याची तयारी दाखवावी लागणार आहे.
दरम्यान कागदपत्रांमधील बदलांना लागणारा वेळ आपण समजु शकतो पण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने एकाही जुन्या फलकावर नाव बदललेले दिसत नाही, ग्रामपंचायती,जिल्हा परिषद शाळा,प्राथमिक आरोग्य केंद्र यावर देखील जुनाच उल्लेख आहे.सर्वात मोठी शोकांतिका अशी आहे लोकप्रतिनिधींनी वास्तव्यास असलेल्या गावांमधील शासकीय संसाधनांच्या नावात बदल केलेला नाही.आपल्या अहिल्यानगर च्या जडणघडणीत पतसंस्था तसेच विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांचे मोठे योगदान राहिले आहे त्यांनी देखील नामांतरासाठी पुढे आले पाहिजे.या बाबतीत योग्य त्या उपाययोजना दिसत नसल्याने महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून जिल्हाभर या बाबतीत जागृती निर्माण केली जाणार असून प्रसंगी आंदोलन केले जाणार असल्याचे माहिती संचिन कोळपे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.या बाबतीत सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी,पदाधिकारी यांनी नामांतर अंमलबजावणी साठी पुढाकार घ्यावा हे आवाहन सचिन कोळपे यांनी शेवटी केले आहे.



