जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आंदोलन

…या डॉक्टरांच्या नोंदणीविरुद्ध संताप,डॉक्टरांची सेवा बंदची धमकी!

न्यूजसेवा

कोपरगाव -(नानासाहेब जवरे)
 
   सी.सी.एम.पी.पात्रता असलेल्या बी.एच.एम.एस.डॉक्टरांच्या महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमधील (एम.एम.सी.) नोंदणीवरून राज्यात मोठा वाद निर्माण झाला असून आय.एम.ए.आणि निवासी डॉक्टरांच्यात तीव्र विरोध व राज्यव्यापी बंदच्या आंदोलनाच्या इशाऱ्यामुळे वैद्यकीय सेवा प्रभावित झाली असून,यावर सध्या वैद्यकीय वर्तुळात तीव्र मतभेद सुरू झाले असल्याचे उघड झाले आहे.याचे पडसाद कोपरगावच्या वैद्यकीय वर्तुळात उमटले असून त्यांनी बंदचे हत्यार उपसले आहे.सदर बाब मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित असून अंतिम निर्णय होईपर्यंत कोणतीही अंमलबजावणी करू नये अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.पंकज बुब आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एका निवेदनाद्वारे आज केली आहे.

कोपरगाव येथील  इंडियन मेडिकल असोसिएशनच्या कोपरगाव शाखेने आज एक निवेदन पोलिस निरीक्षक उद्धव डमाळे आणि कोपरगाव तहसीलदार यांना निवेदन दिले त्यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.पंकज बूब,सचिव डॉ.योगेश लाडे त्यांचे सहकारी.

“एक वर्षाचा सी.सी.एम.पी.अभ्यासक्रम एम.बी.बी.एस.डॉक्टरांना दिल्या जाणाऱ्या सर्वसमावेशक वैज्ञानिक व क्लिनिकल प्रशिक्षणाची जागा घेऊ शकत नाही.त्यामुळे वैद्यकीय दर्जाचे अवमूल्यन होत असून संपूर्ण एम.बी.बी.एस.प्रशिक्षणाशिवाय आधुनिक वैद्यकाची परवानगी दिल्यास पुराव्यावर आधारित वैद्यकीय सेवेचा दर्जा व विश्वासार्हता कमी होणार आहे.शिवाय त्यामुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो”-डॉ.पंकज बूब,अध्यक्ष,इंडियन मेडिकल असोसिएशन,शाखा कोपरगाव.

    महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वपूर्ण निर्देशानुसार,राज्यातील ‘सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकोलॉजी’ (सी.सी.एम.पी.) यशस्वीरीत्या उत्तीर्ण केलेल्या सर्व होमिओपॅथिक (बी.एच.एम.एस.) डॉक्टरांच्या महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत (एम.एम.सी.) स्वतंत्र पुस्तिकेत अधिकृत नोंदणी करण्यास मंगळवार दि.04 ऑगस्ट पासून सुरुवात झाली आहे.विशेषतः ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी आणि प्राथमिक उपचार वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने हा निर्णय घेतल्याची माहिती होमिओपॅथिक समन्वय समितीचे राज्य सदस्य डॉ.योगेश ढेंबरे यांनी जाहीर केली आहे.दरम्यान,’एमएमसी’मार्फत ‘सीसीएमपी’ डॉक्टरांच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू झाल्याने राज्यातील होमिओपॅथी डॉक्टरांनी आनंदोत्सव सुरू केला असतानाच त्याला एक वर्षाचा सी.सी.एम.पी.अभ्यासक्रम एम.बी.बी.एस.डॉक्टरांना दिल्या जाणाऱ्या सर्वसमावेशक वैज्ञानिक व क्लिनिकल प्रशिक्षणाची जागा घेऊ शकत नाही असे जाहीर करून त्यांच्या आनंदात इंडियन मेडिकल असोसिएशनने विरजण पाडले असल्याचे दिसून येत आहे.याबाबत कोपरगाव येथील  इंडियन मेडिकल असोसिएशनच्या कोपरगाव शाखेने आज एक निवेदन पोलिस निरीक्षक आणि कोपरगाव तहसीलदार यांना देऊन त्यात हा विरोध दर्शवला आहे.

  त्यात त्यांनी म्हटले आहे की,”एक वर्षाचा सी.सी.एम.पी.अभ्यासक्रम एम.बी.बी.एस.डॉक्टरांना दिल्या जाणाऱ्या सर्वसमावेशक वैज्ञानिक व क्लिनिकल प्रशिक्षणाची जागा घेऊ शकत नाही.त्यामुळे वैद्यकीय दर्जाचे अवमूल्यन होत असून संपूर्ण एम.बी.बी.एस.प्रशिक्षणाशिवाय आधुनिक वैद्यकाची परवानगी दिल्यास पुराव्यावर आधारित वैद्यकीय सेवेचा दर्जा व विश्वासार्हता कमी होणार आहे.शिवाय त्यामुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.एम.एम.सी.नोंदणीमुळे सी.सी.एम.पी.पात्रता असलेले बी.एच.एम.एस.डॉक्टर हे एम.बी.बी.एस.डॉक्टरांप्रमाणेच पात्र असल्याचा गैरसमज जनतेमध्ये निर्माण होऊ शकतो.सदरचे प्रकरण वर्तमानात मुंबई उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे.त्याचा अंतिम निर्णय होईपर्यंत या निर्णयाची कोणतीही अंमलबजावणी करू नये.या नवीन नियमात विसंगती असल्याचा आरोप करून त्यांनी,”बी.एच.एम.एस.डॉक्टरांची नोंदणी आधीच महाराष्ट्र होमिओपॅथी परिषदेत आहे.त्यामुळे एम.एम.सी.मध्ये दुहेरी नोदणीची आवश्यकता नसल्याचे आपल्या निवेदनात म्हटले आहे.

   दरम्यान या मागणीसाठी आम्ही सर्व सदस्य व सभासद बाह्यरुग्ण व अत्यावश्यक सेवा अनिश्चित कालासाठी बंद ठेवत असल्याचे जाहीर केले आहे.या बंद मधून उद्भवणाऱ्या परिस्थितीशी सामना करण्यास प्रशासनाने पर्यायी व्यवस्था करावीअसे आवाहन त्यांनी केले आहे.व आमच्या मागण्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संबंधित विभागाकडे पाठवाव्या अशी विनंती केली आहे.या निवेदनावर इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.पंकज रामनारायण बूब,सचिव डॉ.योगेश हिरालाल लाडे आदींच्या सह्या आहेत.आता याबाबत राज्य शासन काय निर्णय घेणार याकडे या संघटनेचे आणि रुग्णांचे आणि त्यांच्या नातेवाईंकाचे लक्ष लागून राहिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close