आंदोलन
…या रस्त्यावर ०५ वर्षात ५३ अपघात २१ बळी,ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा-मागणी

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव-शिर्डी या राष्ट्रीय महामार्गाच्या दिरंगाईमुळे गत पाच वर्षात ५३ अपघात होऊन २१ प्रवाशांचे बळी गेल्याची धक्कादायकं माहिती हाती आली असून या कामाच्या ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा” अशी मागणी कोपरगाव येथील लोकस्वराज्य आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष ॲड.नितीन पोळ यांनी केली आहे.

कोपरगाव-शिर्डी या महामार्गाबाबत कोपरगाव शहर पोलिस ठाण्यामधून माहिती अधिकारात ॲड.पोळ यांनी विचारली असता कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत येवला नाका ते आत्मा मलिक हॉस्पिटल या साधारण ०३-०४ कि.मी.अंतरावर या कालावधीत प्राप्त माहिती प्रमाणे एकूण ५३ अपघात गुन्ह्यांची नोंद केली आहे.त्यात साधारण २१ अपघातात वाहन चालक अथवा प्रवाशी मृत्यूमुखी पडले असल्याची धक्कादायक माहिती हाती आली असल्याचा दावा केला आहे.यात मृतांचा आकडा समाविष्ट करण्यात आलेला नाही.इतर ३२ अपघातात वाहन चालक अथवा प्रवाशी यांना कायमचे अपंगत्व आलेले आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव ते शिर्डी या महामार्ग दुरुस्तीचे काम गेल्या काही वर्षा पासून अत्यंत संथ गतीने सुरु असुन या महामार्गाचे काम करत असताना आवश्यक ती काळजी न घेतल्याने व ठेकेदाराने कामात दिरंगाई व निष्काळजी पणा केल्यामुळे अनेक निष्पाप नागरिकांना कायमचे अपंगत्व तर काहींना आपले जीव गमवावे आहे.त्यामुळे या रस्त्याच्या ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी ॲड. पोळ यांनी एका प्रसिद्धीपत्रकांवये केली आहे.
त्यांनी त्यात म्हटले आहे की,कोपरगाव ते अहिल्यानगर रस्त्याची अनेक वर्षापासून दुरावस्था झालेली आहे.त्यामुळे हा रस्ता दुरुस्त व्हावा अशी वारंवार मागणी सामाजिक कार्यकर्ते आणि प्रवाशांकडून केली जात आहे. मागील दोन तीन वर्षापूर्वी या रस्त्याचा समावेश राष्ट्रीय महामार्ग मध्ये कऱण्यात आला आहे.या रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामास मंजुरी मिळाली असल्याचा दावा केला आहे.रस्त्याचे काम सुरु झाले.मात्र या कामाच्या ठेकेदाराने वेळेत काम पूर्ण करणे आवश्यक होते.त्याच प्रमाणे हे काम सुरु असताना वाहतुकीची कोंडी होऊ नये.वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये यासाठी आवश्यक काळजी घेणे गरजेचे होते.मात्र राजकिय नेत्यांची अनास्था व प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघात होऊन अनेकांचे बळी गेले तर कित्येकांना कायमचे अपंगत्व येऊन आयुष्य बरबाद झाले आहे.राजकिय नेत्यांनी कित्येकदा ठेकेदारास काळया यादीत टाकू अशी घोषणाही केली.मात्र कामात प्रगती होण्याऐवजी ठेकेदाराला कामात मुदत वाढ मिळाली आहे.
या रस्त्यावर १ जानेवारी २०२० ते १ जून २०२५ या सुमारे ०५ वर्षाच्या कालावधीत झालेल्या अपघाताची माहिती कोपरगाव शहर पोलिस ठाण्यामधून माहिती अधिकारात ॲड.पोळ यांनी विचारली असता कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत येवला नाका ते आत्मा मलिक हॉस्पिटल या साधारण ०३-०४ कि.मी.अंतरावर या कालावधीत प्राप्त माहिती प्रमाणे एकूण ५३ अपघात गुन्ह्यांची नोंद केली आहे.त्यात साधारण २१ अपघातात वाहन चालक अथवा प्रवाशी मृत्यूमुखी पडले असल्याची धक्कादायक माहिती हाती आली असल्याचा दावा केला आहे.यात मृतांचा आकडा समाविष्ट करण्यात आलेला नाही.इतर ३२ अपघातात वाहन चालक अथवा प्रवाशी यांना कायमचे अपंगत्व आलेले आहे तर किरकोळ अपघाताच्या घटना घडल्या नंतर त्यांची तक्रार पोलीस ठाण्यात झालेली नाही अशा अनेक घटना घडल्या आहेत.
दरम्यान दुसऱ्या बाजूला झगडे फाटा ते वडगाव पान रस्त्याच्या ठेकेदाराची तक्रार आ.आशुतोष काळे यांनी विधानसभेत चर्चेत घेतली असल्याचा दावा करत आहे.मात्र कोपरगाव तालुक्यात बहुचर्चित रस्त्यावर झालेल्या अपघाताची काळी बाजू मांडण्याची गरज असताना या विषयावर विधान सभेत चर्चा केली जाणे अपेक्षित होते.ठेकेदारांनी वेळेत काम पूर्ण करावे म्हणून अनेक आंदोलने झाली मात्र ठेकेदाराकडून हप्ते मिळावे यासाठी या कामावरील कामगारांना मारहाण करण्यात आली व पुणतांबा चौफुली येथे सूरू असलेले काम बंद पाडले अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू असताना किमान या अपघातात अनेक नागरिक बळी गेले तर कित्येकांना कायमचे अपंगत्व आले आहे या विषयावर शासन स्तरावर गंभीरपणे विचार होऊन ठेकेदारावर कामात दिरंगाई केली म्हणून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणीही ॲड.नितीन पोळ यांनी शेवटी केली आहे.



