जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आंदोलन

दर्शना पवारच्या मृत्यूची चौकशी करून तिला न्याय द्या-मागणी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्याची कन्या कु.दर्शना पवार हिचा झालेला मृत्यू संशयास्पद असून त्याची सखोल चौकशी करून तिच्या कुटुंबाला न्याय द्यावा अशी मागणी कोपरगाव राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने तहसीलदार संदीपकुमार भोसले यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

कु.दर्शना पवारांचा संशयित आरोपी राहुल हांडोरे हा मूळचा नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील शाह गावाचा आहे.त्याने बी.एस.सी.चं शिक्षण पूर्ण केलं आहे.तर तो पुण्यात एम.पी.एस.सी.ची तयारी करत होता.दर्शना आणि राहुल यांची ओळख पुण्यातच झाली होती. मागील काही महिन्यांपासून दर्शना आणि राहुल एकमेकांच्या संपर्कात होते. दोघेही ट्रेकिंगला गेले असता ही घटना घडली.०९ तारखेला हे दोघं ट्रेकिंगला गेले होते.त्यानंतर सदर घटना उघडकीस आली होती.त्यानंतर राज्यभर तिच्या मृत्यूच्या चौकशची मागणी होत आहे.

कोपरगाव तालुक्याची रहिवासी असलेल्या व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन वन परिक्षेत्र अधिकारी म्हणून निवड झालेल्या कु.दर्शना पवार (वय २६) हिचा मृत्यू झाला आहे.मागील काही दिवसापासून बेपत्ता असलेल्या कु.दर्शनाचा मृतदेह सापडला असून तिच्या मृत्यूमागे घातपात असल्याचे दिसून येत आहे.तिच्या डोक्यावर व शरीरावर गंभीर जखमा झाल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदनाच्या अहवालातून समोर आले आहे.त्यामुळे मयत कु. दर्शना पवार हिच्या संशयास्पद मृत्यूची सखोल चौकशी होणे अत्यंत गरजेचे आहे.पोलीस प्रशासनाने तिच्या मृत्यूची लवकरात लवकर सखोल चौकशी करून तिच्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा असे दिलेल्या दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगूले,राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा माजी नगरसेविका प्रतिभा शिलेदार,युवती तालुकाध्यक्षा वैशाली आभाळे,जिल्हा सचिव रेखा जगताप,शहर युवक अध्यक्ष नवाज कुरेशी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामदास केकाण,माजी नगरसेवक मंदार पहाडे,मेहमूद सय्यद,राजेंद्र वाकचौरे, अजीज शेख,कृष्णा आढाव,फकीर कुरेशी,दिनकर खरे,माजी नगरसेविका माया खरे,चंद्रशेखर म्हस्के आदींसह कार्यकर्ते व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close