जाहिरात-9423439946
अपघात

दोन वेगवेगळ्या अपघात दोन ठार,कोपरगावात गुन्हा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील मढी खुर्द शिवारातील शिर्डी-नाशिक मार्गावर असलेल्या मढी खु.शिवारात कोल्हे वस्तीजवळ वाजेच्या सुमारास टोयोटा इनोव्हा या कारने दिलेल्या धडकेत देर्डे-कोऱ्हाळे येथील दुचाकीस्वार अब्बास बाबूलाल सय्यद (वय-५२) हा इसम जागीच ठार झाला असून अन्य डाऊच शिवारात झालेल्या अपघातात पोहेगाव येथील रहिवासी असलेले व कोपरगावात वकिली करणारे वकील साहेबराव औताडे हे ठार झाले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान दुसऱ्या अपघातात पुणतांबा फाटा ते झगडे फाटा या मार्गावर डाऊच खुर्द शिवारात होंडा युनिकॉर्न हि दुचाकी ( एम.एच. १७ सी.जे.९९९२) हि पोहेगाव कडून कोपरगाव कडे येत असताना त्यांना जोरात जाणाऱ्या कंटेनरने धडक दिली होती.त्यात ते जागीच मृत्यू झाला आहे.त्यात पोहेगाव येथील रहिवासी व कोपरगाव येथील वकील व्यवसाय करत असलेले वकील अड्.साहेबराव औताडे (वय ५८) यांचा समावेश आहे.

शिर्डी मार्गे नगर सिन्नर हा मार्ग राष्ट्रीय झाला असून या मार्गावर नुकताच सिन्नर तालुक्यातील पाथरे हद्दीत एक बस आणि ट्रक यांच्यात काल झालेल्या अपघात दहा जण ठार झाले होते.तर सतरा जण जखमी झाले होते.त्याची बातमी प्रसिद्ध होऊन त्याची शाई वाळण्याच्या आत कोपरगाव तालुक्यातील मढी बु.शिवारात मढी फाट्याजवळ आज समोरून आलेल्या इनोव्हा कारने दिलेल्या जोराच्या धडकेत यात देर्डे-कोऱ्हाळे येथील रहिवासी असलेला इसम अब्बास बाबूलाल सय्यद (वय-५२) हा ठार झाला आहे.या अपघातानंतर संबंधित कार चालकाने त्यास उपचारार्थ दवाखान्यात दखल केले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

दरम्यान आज दुपारी झालेल्या दुसऱ्या अपघातात पुणतांबा फाटा ते झगडे फाटा या मार्गावर डाऊच खुर्द शिवारात होंडा युनिकॉर्न हि दुचाकी ( एम.एच. १७ सी.जे.९९९२) हि पोहेगाव कडून कोपरगाव कडे येत असताना त्यांना जोरात जाणाऱ्या कंटेनरने धडक दिली होती.त्यात ते जागीच मृत्यू झाला आहे.त्यात पोहेगाव येथील रहिवासी व कोपरगाव येथील वकील व्यवसाय करत असलेले वकील अड्.साहेबराव औताडे (वय ५८) यांचा समावेश आहे.त्यांना भरधाव जाणाऱ्या कंटेनरने सुमारे शंभर फूट फरफटत नेले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

दरम्यान घटनास्थळी त्यावेळी तेथे उपस्थित झालेले डाऊच खुर्दचे माजी सरपंच संजय गुरसळ व कुंभारी येथील रहिवासी तुषार कदम शंकर गुरसळ,पंकज पुंगळ व स्थानिक ग्रामस्थांनी त्यांना तातडीने रूग्णवाहिका बोलवून औताडे यांना कोपरगाव येथील रूग्णालयात पाठवले व कंटेनर ताब्यात घेतला परंतु या गडबडीत चालक पळून जाण्यात यशस्वी झाला या घटनेची माहिती माजी सरपंच संजय गुरसळ यांनी पोलिसांना कळवली आहे.कंटेनर चालक हा घटनेनंतर मात्र फरार झाला आहे.घटनास्थळी कोपरगाव शहर पोलीसांनी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

दरम्यान या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रं.१९/२०२३ भा.द.वि.कलम ३०४(अ) २७९,३३७,३३८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत.

स्व.साहेबराव औताडे यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,दोन मुली असा परिवार आहे.त्यांच्या अपघाती निधनाने कोपरगाव व पोहेगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close