जाहिरात-9423439946
अपघात

कोपरगाव पंचायत समितीजवळ अपघात,मुलगा ठार

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव पंचायत समितीच्या नूतन इमारतीचे काम सुरु असून ते अंतिम टप्य्यात आले असताना आज एक दुर्घटना घडली असून तेथे फाटक बसविण्याचे काम सुरु आहे.त्या ठिकाणी आज सकाळी ०८.२० वाजेच्या सुमारास सुरक्षा रक्षकाचे नऊ वर्षाचा लहान मूलगा कु.दिनेश दिलीप धनके मु.रा.मंगरूळ ता.सिल्लोड जि.औरंगाबाद हा खेळत असताना त्याच्या डोक्यात सदरचे फाटक पडून झालेल्या अपघातात तो जागीच ठार झाला आहे.त्यास उपचार्थ नजीच्या खाजगी रुग्णालायत भरती केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले आहे.या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

संकल्पित छायाचित्र

आज सकाळी आपले माता-पिता आपल्या कामात असताना नजर चुकवून काम सुरु असलेल्या कोपरगाव पंचायत समितीच्या फाटकाजवळ गेले व त्याचे काम पूर्ण झालेले नसल्याने त्याच्याशी पंगा घेत असताना ते त्याच्या अंगावर पडले व त्यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.त्या वेळी त्या अपघातात त्याला रक्ताची उलटी झाली व त्या ठिकाणीच तो मुलगा गतप्राण झाला आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव पंचायत समितीच्या नूतन इमारतीचे मूळ ०४.९८ कोटी रुपयांच्या प्रशासकीय मान्यता असलेले काम २०१५ पासून सुरु आहे.ते अद्याप पूर्ण झालेले नाही.त्यास पूर्ण होण्यास काही दिवसांचा कालावधी राहिला असताना आज दि.०२ ऑक्टोबर रोजी सकाळी ०८.२० वाजेच्या दरम्यान सदर ठिकाणी सुरक्षा रक्षक दिलीप धनके हे काम पहात असून त्यांना एक मुलगी व दोन मुले आहेत.ते सकाळी आपले माता-पिता आपल्या कामात असताना नजर चुकवून काम सुरु असलेल्या पंचायत समितीच्या फाटकाजवळ गेले व त्याचे काम पूर्ण झालेले नसल्याने त्याच्याशी पंगा घेत असताना ते त्याच्या अंगावर पडले व त्यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.त्या वेळी त्या अपघातात त्याला रक्ताची उलटी झाली व त्या ठिकाणीच तो मुलगा गतप्राण झाला आहे.त्यावर नजीकच्या नागरिकांनी खाजगी रुग्णालयात उपचारार्थ भरती केले असता तेथे उपचार करण्याऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले आहे.दरम्यान या घटनेने कोपरगाव शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान या बाबत वैद्यकीय अधिकारी डॉ.योगेश कोठारी यांनी दिलेल्या खबरी नुसार कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या अकस्मात मृत्यू दप्तर क्रं.५६/२०२१ सी.आर.पी.सी.१७४ प्रमाणे अकस्मात मृत्युची नोंद केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार एस.सी,पवार हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close