मनोरंजन
अखिल भारतीय प्रतिभा संमेलनाचे अध्यक्ष पदी राम गायकवाड यांची निवड
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी)
मुंबई येथील सरदार रणजितसिंह सचदेव फाऊंडेशन व शिर्डी येथील साई बहुउद्देशीय प्रतिष्ठाण, कम्युनिटी वेलफेअर फाऊंडेशन इंडीयाच्या सन्मानार्थ 17 नोव्हेंबर रोजी आयोजित 12 वे अखिल भारतीय प्रतिभा संमेलन साई निमट्री हॉटेल शिर्डी येथे संपन्न होणार आहे. या संमेलनासाठी आत्मा मालिकचे शिक्षक तसेच नाटय चित्रपट अभिनेते, गझलकार व गीतकार राम गायकवाड यांची समेलनाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. त्यांनी आत्तापर्यंत विविध संमेलनामध्ये सहभाग घेवून रसिकांची मने जिंकलेली आहे.
या कवी संमेलनात निमंत्रितांचे कवी संमेलन, पुस्तक प्रकाशन, नृत्य-संगीत कला सादरीकरण व गौरव सोहळा पार पडणार आहे. या निवडीबद्दल आत्मा मालिकच्या वतीने राम गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी ते म्हणाले की, माझ्यासारख्या ग्रामीण भागातील कवीला संमेलनाध्यक्ष होण्याचा बहुमान मिळाला ही अभिमानाची बाब आहे. यातून निश्चितच ग्रामीण भागातील नवोदित साहित्यीकांना प्रेरणा मिळेल आणि मराठी साहित्य आणखी समृध्द होईल. तसेच या संमेलनाचे मुख्य संयोजक क्रांती महाजन यांनी त्याना संधी दिल्याबद्दल आभार मानले आहेत.
राम गायकवाड यांची संमेलनाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आश्रमाचे आत्मा मालिक माऊली, परमानंद महाराज, निजानंद महाराज, संत मांदियाळी, अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी, उपाध्यक्ष भगवान दौंड, सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे, कोषाध्यक्ष विठ्ठलराव होन, विश्वस्त वसंतराव आव्हाड, प्रकाश भट, प्रकाश गिरमे, बाळासाहेब गोर्डे, प्रभाकर जमधडे, व्यवस्थापक हिरामण कोल्हे, सर्व प्राचार्य, शिक्षक व विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.