जाहिरात-9423439946
आरोग्य

कोपरगाव तालुक्यात मुन्नाभाईस तीन वर्षाची सक्तमजुरी,10 हजारांचा दंड

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी )

कोपरगाव तालुक्याच्या पश्चिमेस सुमारे सोळा कि.मी. अंतरावर असलेल्या सुरेगाव ग्रामपंचायत हद्दीत दंत वैद्यक असल्याचा बनाव करून सामान्य नागरिकांना लुबाडणारा त्याच ग्रामपंचायत हद्दीतील मोतीनगर येथील रहिवाशी इसम गणेशगिरी देवगिरी गोसावी याच्या विरुद्ध तालुका आरोग्य अधिकारी वैशाली वसंतराव बडदे यांनी 28 मार्च 2013 रोजी टाकलेल्या धाडीनंतर कोपरगाव न्यायालयात दाखल केलेल्या दाव्याचा निकाल नुकताच लागला असून यात कोपरगाव न्यायदंडाधिकारी रफिक ए. शेख यांनी आरोपीस महाराष्ट्र वैद्यकीय अधिनियम 33 (2) अन्वये तीन वर्षाची सक्त मजुरी व 10 हजारांचा दंड ठोठावला आहे.दंड न भरल्यास सहा महिन्याची साधी कैद अशी शिक्षा सुनावली असल्याने वैद्यकीय क्षेत्राचे पावित्र्य भंग करणाऱ्यांना चाप बसण्यास मदत होणार असल्याचे मानले जात आहे.

गणेशगिरी देवगिरी गोसावी हा दंतवैद्यक असल्याचे ग्रामस्थांना भासवून त्यांची लुबाडणूक करीत असल्याच्या तक्रारी कोपरगाव तालुका पंचायत समितीच्या तत्कालीन तालुका वैद्यकीय अधिकारी वैशाली बडदे यांना प्राप्त झाल्या होत्या.त्यांनी या गंभीर दखल घेऊन या प्रकरणात बनावट रुग्ण बनून सदर ठिकाणी 28 मार्च 2013 रोजी दाखल झाल्या होत्या.व आपल्या पडलेल्या दातावर उपचार करण्याचा बहाणा केला होता. त्यावेळी तेथील बनावट दंतवैद्यक गणेशगिरी गोसावी याने त्यांच्यावर उपचार कारण्याची तयारी दर्शवत व त्या अनुषंगाने फिर्यादीचे मोजमाप घेऊन उपचार सुरु केले होते.त्यातून हा गुन्हा दाखल झाला होता.

सदरचे सविस्तर वृत्त असे कि,सुरेगाव ग्रामपंचायत हद्दीत स्वतः गणेशगिरी देवगिरी गोसावी हा दंतवैद्यक असल्याचे ग्रामस्थांना भासवून त्यांची लुबाडणूक करीत असल्याच्या तक्रारी कोपरगाव तालुका पंचायत समितीच्या तत्कालीन तालुका वैद्यकीय अधिकारी वैशाली बडदे यांना प्राप्त झाल्या होत्या.त्यांनी या गंभीर दखल घेऊन या प्रकरणात बनावट रुग्ण बनून सदर ठिकाणी 28 मार्च 2013 रोजी दाखल झाल्या होत्या.व आपल्या पडलेल्या दातावर उपचार करण्याचा बहाणा केला होता. त्यावेळी तेथील बनावट दंतवैद्यक गणेशगिरी गोसावी याने त्यांच्यावर उपचार कारण्याची तयारी दर्शवत व त्या अनुषंगाने फिर्यादीचे मोजमाप घेऊन उपचार सुरु केले होते.त्यातून तालुका वैद्यकीय अधिकारी वैशाली बडदे यांची या गैरप्रकाराबाबद खात्री झाली. त्यामुळे त्यांनी या बनावट दंत वैद्यकाकडे परवान्याची मागणी केली असता त्यांना तो देण्यास तो असमर्थ ठरल्यावर त्यांनी त्या व्यवसायाची सर्व उपकरणे जप्त करून त्या विरुद्ध कोपरगाव पोलीस ठाण्यात भा.द.वि.कलम 417,420,महाराष्ट्र वैद्यकीय अधिनियम 1961चे कलम 33 (2) अन्वये दोषारोप पात्र दाखल केले होते.सदर घटनेस आरोपीने कबुली न दिल्याने सदरचा खटला न्यायप्रविष्ट करण्यात आला होता व खटला चालून त्यातील सहा साक्षीदारांची तपासणी करण्यात आली होती.त्या बाबतचे सर्व कागदपत्रिय पुरावे लक्षात घेऊन न्या.रफिक शेख यांनी आरोपीस तीन वर्षाची सक्त मजुरी व 10 हजारांचा द्रव्य दंड ठोठावला आहे.दंड न भरल्यास 6 महिन्याची साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे.सरकारी पक्षाच्या वतीने सहाय्यक सरकारी अभियोक्ता एस.ए. व्यवहारे यांनी काम पाहिले आहे.त्यांनी हा खटला यशस्वी चालविल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.या खटल्याने ग्रामीण नागरिकांच्या जीवनाशी खेळणाऱ्या अपप्रवृत्तीस चाप बसण्यास मदत होणार आहे.या खटल्याकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागून होते.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close