जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुकामनोरंजन

वृद्ध कलावंताच्या मानधनाचा प्रश्न मार्गी लावू-आश्वासन

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

आयुष्यभर कलेची जोपासना करणाऱ्या वृद्ध कलावंतांना निवृत्तीनंतर उर्वरित आयुष्य सन्मानाने व्यतीत व्हावे यासाठी त्यांच्या मानधनाचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी अशासकीय वृद्धकलावंत मानधन समितीच्या अध्यक्षपदी वारकरी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची नेमणूक होण्यासाठी प्रयत्न करून मानधनाचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आश्वासन आ.आशुतोष काळे यांनी नुकतेच एका कार्यक्रमात दिले आहे.

अशासकीय वृद्धकलावंत मानधन समितीच्या सदस्यपदी वारकरी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची नेमणूक होण्यासाठी प्रयत्न करून मानधनाचा प्रश्न मार्गी लावणार -आ.काळे

कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या कोपरगाव शहर व तालुका नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा नियुक्तीपत्र प्रदान व सन्मान सोहळा कर्मवीर शंकरराव काळे स्मृती उद्यान येथे माजी आ. अशोकराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली व आ. आशुतोष काळे यांच्या शुभहस्ते पार पडला याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी अखिल भारतीय वारकरी मंडळाचे प्रदेशाध्यक्ष ह.भ.प.अनिल महाराज वाळके, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,नाशिक विभाग अध्यक्ष ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज बोगीर, नाशिक विभाग कोषाध्यक्ष ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज सोनवणे,नाशिक विभाग मुख्य सचिव ह.भ.प.प्रदीप महाराज जगताप,अहमदनगर जिल्हाध्यक्ष ह.भ.प. गणेश महाराज डोंगरे,अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष ह.भ.प. राम महाराज उदागे,नाशिक जिल्हाध्यक्ष ह.भ.प. निवृत्ती महाराज रायते,नाशिक जिल्हा पत्रकार व प्रसिद्धी प्रमुख ह.भ.प. रामभाऊ महाराज आवारे,अहमदनगर जिल्हा व्यासमुक्ती समिती अध्यक्ष ह.भ.प. बाळासाहेब महाराज बारहाते, कोपरगाव तालुकाध्यक्ष ह.भ.प.काशीनाथ महाराज मोरे, कोपरगाव तालुका उपाध्यक्ष ह.भ.प. पोपटराव महाराज जाधव,कोपरगाव शहराध्यक्ष ह.भ.प. गणपत महाराज लोहाटे,कोपरगाव शहर उपाध्यक्ष ह.भ.प. नंदकुमार महाराज तांबट,नुतन पदाधिकारी व वारकरी उपस्थित होते.

या वेळी पुढे बोलतांना ते म्हणाले की,”अखिल भारतीय वारकरी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प.प्रकाश महाराज बोधले यांनी तीर्थक्षेत्र देहू येथे आंतरराष्ट्रीय भव्य-दिव्य अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन करून वारकरी संप्रदायाची महती सातासमुद्रापार पोहचविली आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली नूतन पदाधिकाऱ्यांनी वारकरी संप्रदायासाठी भूषणावह कामगिरी करावी.कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर कारखाना स्थापनेपासून कर्मवीर शंकरराव काळे यांनी नेहमीच धार्मिक कार्यक्रमांना प्राधान्य देऊन ५६ वर्षापासून सुरु केलेला अखंड हरीनाम सप्ताह आजतागायत सुरु आहे.आजपर्यंत काळे परिवाराने नेहमीच वारकरी संप्रदायासाठी सर्वतोपरी मदत केली आहे.हि परंपरा यापुढेही अखंडितपणे सुरु राहील असे आश्वासन दिले.तसेच प्रदेशाध्यक्ष अनिल महाराज यांनी सुचविल्याप्रमाणे अशासकीय वृद्धकलावंत मानधन समितीच्या सदस्यपदी वारकरी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची नेमणूक होण्यासाठी प्रयत्न करून मानधनाचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आ.काळे यांच्या हस्ते वारकरी मंडळाच्या पदाधिकारीपदी निवड झालेल्या सर्व पदाधिकारी व मान्यवरांना संत एकनाथ महाराज रचित भागवत ग्रंथ देऊन त्यांचा यथोचित सत्कार केला.
याप्रसंगी अखिल भारतीय वारकरी मंडळाचे प्रदेशाध्यक्ष अनिल महाराज वाळके म्हणाले की,”कर्मवीर शंकरराव काळे यांनी वारकरी संप्रदायासाठी दिलेले योगदान अजोड आहे. त्यांनी शिक्षण क्षेत्राबरोबरच अध्यात्मिक जीवनात वारकरी संप्रदायाला वेळोवेळी सर्वोच्च स्थान देऊन मदत केली आहे. त्यांच्याकडे आलेला वारकरी कधीही रित्या हाती परत गेलेला नाही हा आजवरचा काळे कुटुंबाकडून वारकरी संप्रदायाला मिळालेला अनुभव आहे.वारकऱ्यांचा आदर सत्कार करण्याची माजी आ. काळे यांनी कधी हि खंडित होऊ दिली नाही. हि परंपरा आज आ.काळे पुढे चालवीत आहे हे वारकरी संप्रदायासाठी अभिमानास्पद असल्याचे सांगत जिल्ह्यातील व कोपरगाव तालुक्यातील नूतन पदाधिकाऱ्यांना वारकरी संप्रदायाचे पावित्र्य टिकवून ठेऊन आपल्यावर टाकलेल्या जबाबदारीची त्यांनी जाणीव करून दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ह.भ.प.पोपटराव जाधव व ह.भ.प. नंदकुमार तांबट यांनी केले. प्रास्ताविक ह.भ.प. ज्ञानेश्वर सोनवणे तर आभार ह.भ.प.काशिनाथ महाराज मोरे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close