पुरस्कार,गौरव
आयुर्वेद प्रशिक्षण देण्यासाठी कोपरगावातील…या डॉ.ना नेपाळ सरकारचे निमंत्रण

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
नेपाळ गव्हर्नमेंट च्या नॅशनल आयुर्वेद रिसर्च व ट्रेनिंग सेन्टर काठमांडू या आरोग्य विभागातर्फे त्यांचे डॉक्टर्सना पंचकर्म ट्रेनिंग देण्यासाठी कोपरगाव येथील प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य व राष्ट्रीय आयुर्वेद गुरु डॉ.रामदास आव्हाड यांना व त्यांचे सहकारी श्रीरामपूर येथील आयुर्वेद तज्ञ सतीश भट्टड यांना निमंत्रित केले आहे.त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
आयुर्वेदाला सुमारे ३००० वर्षापासून चालत आलेली व्यापक आणि उत्तुंग परंपरा आहे. आयुर्वेदातील उपचार पद्धतींमध्ये वनौषधी,वनस्पतीजन्य औषधी,आहाराविषयक नियम,व्यायामाचे विविध प्रकार,आणि त्याद्वारे शरीरातील नैसर्गिक प्रतिकार शक्तीला वाढविण्यावर भर दिला जातो.आजही या क्षेत्रातील तज्ज्ञ भारतात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत.कोपरगावातील डॉ.रामदास आव्हाड हे या क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात.
आयुर्वेदाची सुरुवात ब्रह्मापासून झाली असे मानले जाते.आयुर्वेद आणि त्यासारख्या विद्याशाखांमधून भारतात प्राचीन काळापासून असलेल्या वैद्यकीय ज्ञानाची कल्पना येते.आयुर्वेदाला सुमारे ३००० वर्षापासून चालत आलेली व्यापक आणि उत्तुंग परंपरा आहे. आयुर्वेदातील उपचार पद्धतींमध्ये वनौषधी,वनस्पतीजन्य औषधी,आहाराविषयक नियम,व्यायामाचे विविध प्रकार,आणि त्याद्वारे शरीरातील नैसर्गिक प्रतिकार शक्तीला वाढविण्यावर भर दिला जातो.आजही या क्षेत्रातील तज्ज्ञ भारतात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत.कोपरगावातील डॉ.रामदास आव्हाड हे या क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात.
नेपाळ तेथे १८ ते २० या तीन दिवस चालणारी हि कार्यशाळा डॉ.रामदास आव्हाड व डॉ.सतीश भट्टड तीन दिवस दिवसभर व्याख्यान व प्रत्यक्ष कर्माद्वारे करणार आहेत.भारतीय स्वदेशी आयुर्वेदाचा प्रसार परदेशात करण्यासाठी हे आयुर्वेद डॉ.काठमांडूस रवाना होत आहेत.कुठल्याही अर्ज विनंती शिवाय शिवाय नेपाळ सरकारच्या आरोग्य विभागाकडून गेल्या सहा महिन्यापासून डॉ.आव्हाड यांना विनंती करण्यात येत होती.ग्रामीण भागात राहून परदेशात निमंत्रित केले जाणे हि नक्कीच गौरवास्पद व अभिमानास्पद गोस्ट असल्याचे डॉ.आव्हाड व डॉ.भट्टड यांनी आमच्या प्रतिनिधींशी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले आहे.प्रत्यक्ष कर्म करण्यासाठी डॉ.आव्हाड यांची कन्या डॉ.रिद्धी आव्हाड त्यांना मदत करणार आहेत.नुकतीच राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठाने डॉ.रामदास आव्हाड यांची सलग आठव्यांदा राष्ट्रीय आयुर्वेद गुरु म्हणून नियुक्ती केली आहे.
भारतातील सर्व राज्यातील आयुर्वेद पदवीधर डॉ.ना पंचकर्म शिकविण्याचे काम डॉ.आव्हाड करत आहेत.आता परदेशातील डॉ.ना आयुर्वेद शिकविण्याचे कामही ते काठमांडूस जाऊन करणार आहेत.त्यांच्या या यशाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.