जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
पाणी पुरवठा योजना

कोपरगावच्या…’त्या’ साठवण तलावाचे काय झाले-नागरिकांचा सवाल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगांव शहराच्या १३१ कोटींच्या मंजुर असलेल्या पाणी योजनेचे काम सुरु करण्याच्या प्रक्रियेबाबत माहिती घेण्यासाठी नगरपालिकेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांची शहरातील सामाजिक कार्यकर्ते नागरीक यांनी भेट घेतली असून सदरचे काम वेगाने सुरु करावे अशी महत्वाची मागणी केली आहे.

“कोपरगाव येथील साठवण तलावासाठी सरकारने १३१.२४ कोटी रुपयांच्या योजनेला मंजुरी मिळून तीन महिने उलटले आहे.शासकीय कार्यादेशानुसार योजना मंजुर झाल्याच्या दिवसापासून ९१ व्या दिवसांच्या आत हे काम प्रत्यक्ष सुरु करणे बंधनकारक केलेले आहे तसेच या कालमर्यादेचे पालन पालिकेचे मुख्याधिकारी यांनी करण्याचे स्पष्ट आदेश त्यात शासनाने दिलेले आहेत.२४ जुन २०२२ रोजी ९१ दिवस पुर्ण झालेले आहेत तरी देखिल प्रत्यक्ष कामास सुरुवात झालेली नाही हि गंभीर बाब आहे”-राजेश मंटाला,सामाजिक कार्यकर्ते कोपरगाव.

कोपरगाव शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या साठवण तलाव क्रमांक ५ साठी ‘महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत’ १३१.२४ कोटी रुपये खर्चाला दि.२५ मार्च २०२२ रोजी आ.आशुतोष काळे व स्थानिक कार्यकर्ते संजय काळे,राजेश मंटाला आदींनी प्रयत्न करून आर्थिक मान्यता राज्याच्या नगरविकास मंत्रालयाने दिली होती.त्या बाबतची माहिती नुकतीच आमच्या प्रतिनिधीस मिळाली होती.त्यामुळे कोपरगाव शहरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले होते.मात्र या योजनेला मंजुरी मिळून आज तीन महिने उलटून गेले आहे.सदर कामाची निविदा प्रसिद्ध होऊन त्यासाठी काम सुरु करण्यासाठी एक सप्ताहाचा अवधी जीवन प्राधिकरण विभागाने दिला होता.मात्र त्यास तीन महिने उलटूनही अद्यापही कुठलीही कार्यवाही दिसत नाही.त्यामुळे नगरपरिषद निवडणूक काढण्याची तालुक्यातील नेत्यांची जुनी सवय तर पुन्हा एकदा अनुभवयास मिळणार नाहीना अशी शंका काही नागरिकांनी बोलून दाखवली आहे.

त्यामुळे या कामासाठी पाठपुरावा करणारे कार्यकर्ते राजेश मंटाला,म.न.से. जिल्हा उपाध्यक्ष संतोष गंगवाल,कोपरगाव काँग्रेसचे अध्यक्ष नितीन शिंदे,तुषार विध्वांस यांनी आज नगर परिषद प्रशासनास जाग आणण्यासाठी भेट घेऊन निवेदन दिले आहे.

त्यात त्यांनी म्हटले आहे की,”योजनेच्या शासकीय कार्यादेशानुसार योजना मंजुर झाल्याच्या दिवसापासून ९१ व्या दिवसांच्या आत हे काम प्रत्यक्ष सुरु करणे बंधनकारक केलेले आहे तसेच या कालमर्यादेचे पालन पालिकेचे मुख्याधिकारी यांनी करण्याचे स्पष्ट आदेश त्यात शासनाने दिलेले आहेत.२४ जुन २०२२ रोजी ९१ दिवस पुर्ण झालेले आहेत तरी देखिल प्रत्यक्ष कामास सुरुवात झालेली नाही.मुख्याधिकारी गोसावी यांना याबाबत जाब विचारण्यात आला आहे.

“सदर १३१.२४ कोटी रुपयांच्या साठवण तलावाच्या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली आहे.अंतिम मंजुरीसाठी पाठवलेले असून सदरचे काम एक महिन्यात प्रत्यक्षात सुरु करण्यात येईल”-शांताराम गोसावी,मुख्याधिकारी,कोपरगाव नगरपरिषद.

याप्रश्नी नागरीकांच्या भावना तिव्र आहेत,भर पावसाळ्यात आठ दिवसातून एकदा पाणी मिळत आहे.जर एक महिन्यात काम सुरू झाले नाही तर आम्ही सर्व नागरीक आंदोलनाचा मार्ग हाताळू असा इशारा उपस्थितांनी दिला आहे.

सध्या पावसाळा सुरु झाला असल्याने कालव्याला नियमित पाणी सुरु आहे.त्यामुळे पाणी चार दिवसाआड करावे अशीही मागणी केली आहे.गेल्या वर्षी चार दिवसाआड पाणी होते.मुख्याधिकारी गोसावी हे मुख्याधिकारी म्हणून रुजु झाल्यानंतर आठ दिवसातून एकदाच पाणी मिळत आहे .

याप्रसंगी राजेश मंटाला,म.न.से.जिल्हा उपाध्यक्ष संतोष गंगवाल,कोपरगाव काँग्रेसचे अध्यक्ष नितीन शिंदे,तुषार विध्वांस,ॲॅड.नितीन पोळ,किरण बिडवे,शरद खरात,प्रसाद निकम,सिद्धार्थ शेळके,अमित आगलावे,अकबर शेख,निसारभाई,आतिश शिंदे,दिपक घोडले,मुन्ना पाटणी हे सर्व उपस्थित होते.

जाहिरात-9423439946

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close