जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवडणूक

शिर्डी नगरपंचायत निवडणूक,आ.काळेंची आढावा बैठक संपन्न

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

काही दिवसांवर नगरपालिका निवडणुका येवून ठेपल्या आहेत.या निवडणुकीच्या दृष्टीने सर्वपक्षीयांची जय्यत तयारी सुरु आहे.या नगरपालिका निवडणुकीमध्ये राहाता नगरपालिका व शिर्डी नगरपंचायतची देखील निवडणूक होणार आहे.या पार्श्वभूमीवर कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आ.आशुतोष काळे यांनी नुकतीच प्रमुख कार्यकर्त्यांची राहाता व शिर्डी येथे बैठक घेवून येणारी निवडणूक राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने लढणार असल्याचे संकेत दिले आहेत.

“आगामी शिर्डी नगरपरिषद निवडणुकीला सामोरे जातांना प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचणे महत्वाचे आहे.विकास करण्याचे एकमेव उद्दिष्टय डोळ्यासमोर ठेवून शिर्डी तसेच राहाता शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सर्वच प्रभागात उमेदवार उभे करायचे असून कार्यकर्त्यांनी मतदारांच्या संपर्कात राहून निवडणुकीच्या कामाला लागावे”-आशुतोष काळे,आमदार,कोपरगाव विधानसभा.

राजकीय दृष्ट्या अतिशय महत्वाच्या असलेल्या राहाता नगरपालिका व शिर्डी नगरपंचायतच्या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने निवडणूक लढण्यासाठी आ.काळे यांनी कार्यकर्त्यांची सल्लामसलत करून त्यांचे विचार जाणून घेतले. निवडणुकीला सामोरे जातांना प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचणे महत्वाचे आहे.विकास करण्याचे एकमेव उद्दिष्टय डोळ्यासमोर ठेवून शिर्डी तसेच राहाता शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सर्वच प्रभागात उमेदवार उभे करायचे असून कार्यकर्त्यांनी मतदारांच्या संपर्कात राहून निवडणुकीच्या कामाला लागावे अशा सूचना त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. निवडणूक जिकण्यासाठी परिस्थितीनुसार योग्यवेळी मित्रपक्षांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे यावेळी सांगितले.

सदर प्रसंगी गौतम बँकेचे अध्यक्ष बाबासाहेब कोते,विश्वस्त महेंद्र शेळके,राष्ट्रवादी राहाता शहर अध्यक्ष नंदकुमार सदाफळ,जिल्हा उपाध्यक्ष रमेश गोंदकर,शिर्डीचे माजी उपनगराध्य निलेश कोते, राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस सुधाकर शिंदे,अमित शेळके,राकेश कोते,विशाल भडांगे,राष्ट्रवादी राहाता तालुका युवक अध्यक्ष संदीप सोनवणे,महिला तालुकाध्यक्ष अलका कोते,भगवान टिळेकर, ज्ञानेश्वर गाडेकर,जिल्हा सरचिटणीस रणजीत बोठे,जावेद दारूवाला,प्रा.हेमंत अनाप प्रा.भागवत आरणे,ज्ञानेश्वर वर्पे,युवक कार्यकर्ते महिला भगिनी,राष्ट्रवादी कार्यकर्ते उपस्थित होते.या वेळी गणेश गोंदकर निलेश कोते रमेश गोंदकर यांनी आपली मनोगत व्यक्त केली.
या प्रसंगी तुषार भोसले,अर्चना काकडे,शोभा पालंदे,शबाना सय्यद यांनी आ.आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला.त्यांचे आ.आशुतोष काळे यांनी स्वागत केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close