जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवडणूक

…या बाजार समितीच्या उपसभापतीचा राजीनामा!

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

    कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची कामधेनू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे आ.काळे गटाचे उपसभापती गोवर्धन परजणे यांनी आपले अडीच वर्षाचे आवर्तन पूर्ण केल्याने आज आयोजित मासिक बैठकीत आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.त्यामुळे आता आगामी काळात कोल्हे गटाचा उपसभापती तर काळे गटाचा सभापती होणार असल्याचे समजले जात आहे.

 

दरम्यान लवरकच कोल्हे गटाचे सभापती साहेबराव रोहोम यांचा राजीनामा होणार असल्याची चर्चा तालुक्यात सुरू झाली आहे.त्यानंतर काळे गटाचा सभापती तर कोल्हे गटाचा उपसभापती होणार असल्याची बातमी आहे.

   कायमच शेतकऱ्यांच्या हिताबाबत संशयाच्या भोवऱ्यात राहणाऱ्या मागील महिन्यात वार्षिक सभा वादग्रस्त ठरलेल्या कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक अडीच वर्षांपूर्वी विद्यमान आ.आशुतोष काळे,माजी आ.स्नेहलता कोल्हे,गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,नितीन औताडे आदींनी एकत्र येऊन बिनविरोध केली होती.मात्र पदवाटपात अडीच वर्षाचे आवर्तन ठरले असल्याचे विश्वसनीय माहिती आहे.त्यानुसार काळे गटाचे संवत्सर येथील उपसभापती गोवर्धन परजणे यांनी आज आयोजित बैठकीत आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती काळे गटाच्या प्रसिध्दी कार्यालयाने दिली आहे.

आ.काळे गटाचे उपसभापती गोवर्धन परजणे यांनी आज आयोजित मासिक बैठकीत आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

दरम्यान मावळते सभापती साहेबराव रोहोम यांनी आपल्या काळात अनेक वादग्रस्त निर्णय घेतले होते.त्यात पंचवीस वर्षापासून मागणी असलेला जवळके येथील उपबाजार यापूर्वी दोन सभापतींनी दोनदा मंजूर करूनही त्यांनी ज्या गावाने संगमनेर तालुक्यात जाण्यासाठी ग्रामसभेचा निर्णय घेतला आहे.त्या गावी उपबाजार देण्याचा आत्मघाती निर्णय घेतला असून त्याबाबत अद्याप जिल्हा उपनिबंधक यांचा अंतिम सुनावणीचा निर्णय बाकी असताना हा आतबट्ट्याचा निर्णय घेतला असल्याची तालुक्यात चर्चा आहे.

   माजी आ.कोल्हे गटाचे मावळते सभापती साहेबराव रोहोम यांनी आपल्या काळात अनेक वादग्रस्त निर्णय घेतले होते.त्यात पंचवीस वर्षापासून मागणी असलेला जवळके येथील उपबाजार यापूर्वी दोन सभापतींनी दोनदा मंजूर करूनही त्यांनी ज्या गावाने संगमनेर तालुक्यात जाण्यासाठी ग्रामसभेचा निर्णय घेतला आहे.त्या गावी उपबाजार देण्याचा आत्मघाती निर्णय घेतला असून त्याबाबत अद्याप जिल्हा उपनिबंधक यांचा अंतिम सुनावणीचा निर्णय बाकी असताना हा आतबट्ट्याचा निर्णय घेतला असल्याची बातमी आहे.त्यामुळे ते अडचणीत येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.      

   दरम्यान लवरकच कोल्हे गटाचे सभापती साहेबराव रोहोम यांचा राजीनामा होणार असल्याची चर्चा तालुक्यात सुरू झाली आहे.त्यानंतर काळे गटाचा सभापती तर कोल्हे गटाचा उपसभापती होणार असल्याची तालुक्यातील शेतकऱ्यांत चर्चा सुरू झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close