क्रीडा विभाग
…या विदयालयात ‘जागतिक आॕलिंम्पिक दिन’ उत्साहात संपन्न

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत जागतिक आॕलिपिक दिन उत्साहाने विदयालयात संपन्न झाला असून या
कार्यक्रमाच्या प्रारंभी खेळ साहित्य यांचे पुजन विदयालयांचे उपमुख्याध्यापक रमेश गायकवाड यांचे हस्ते करण्यात आले पर्यवेक्षिका उमा रायते यांनी सर्वाचे स्वागत केले आहे.
जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या वतीने २३ जून रोजी ऑलिम्पिक दौड, क्रीडा प्रात्यक्षिके, छायाचित्र प्रदर्शन आणि ऑलिम्पिकपटूंचा गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.ऑलिम्पिकचे जनक बॅरन कुबर्टिन यांनी २३ जून १८९४ रोजी ऑलिम्पिकची स्थापना केली होती.जगभर हा दिवस ऑलिम्पिक दिन म्हणून साजरा केला जातो.
महाराष्ट्रात ऑलिम्पिक खेळाचा प्रसार व प्रचार करण्याकरीता महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना २३ ते २९ जून दरमान्य राज्यभर विविध उपक्रम राबविते.मुख्य कार्यक्रम पुण्यात २३ जून रोजी होत आहे.
या प्रसंगी तालुका क्रीडा समितीचे सचिव निलेश बडजाते म्हणाले की,”राज्य,राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील होणाऱ्या क्रीडा स्पर्धातुन मुलांचा सर्वांगिण विकास होतो.आज क्रीडा क्षेत्रातील मोठा दिवस असुन जागतिक आॕलिम्पिक दिनाचे माहीती त्यांनी स्पष्ट केली आहे.व पुढे म्हणाले की यातुनच खेळाडुंनी प्रेरणा घेवुन आपल्या आवडत्या खेळात नैपुण्य मिळवावे.
या प्रसंगी क्रीडा क्षेत्रातील विविध विषयावर प्रश्न मंजुषाचे आयोजन करण्यात आले होते त्यांचे संयोजन क्रीडा शिक्षक अनिल काले यांनी केले.यामध्ये इ.९ वी मधील शेख जारा फिरोज हीने प्रथम क्रमांक,लकारे सोमनाथ ईश्वर यांने द्वितीय तर पगारे वैशाली नितीन हीने तृतीय क्रमांक पटकाविला.या विदयार्थीचा मान्यवरांच्या हस्ते मेडल देवुन सत्कार करण्यात आला आहे.
श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांचे स्थानिक स्कुल कमेटीचे चेअरमन चंद्रकांत ठोळे,कोपरगांव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कैलास ठोळे,सचिव दीलीप कुमार अजमेरे व सहसचिव सचिन अजमेरे,मुख्याध्यापक मकरंद को-हाळकर आदीनी,’जागतिक आॕलिम्पिक दिना’ निमित्त सर्वाना शुभेच्छा दिल्या आणि अभिनंदन केले आहे.
या कार्यक्रमांचे सुत्रसंचलन क्रीडा शिक्षक सुरेश गोरे यांनी तर आभार अनिल काले यांनी मानले आहे.या कार्यक्रमाला अनिल अमृतकर,दिलीप कुडके,विजय कार्ले,निलेश बडजाते,अतुल कोताडे,रघुनाथ लकारे,बलभीम उल्हारे,श्वेता मालपुरे,जाधव मॕडम आदी शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.