जाहिरात-9423439946
दळणवळण

कोपरगाव तालुका,…या ग्रामीण रस्त्यासाठी ८० लाख निधी-माहिती

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव मतदार संघाच्या ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी जिल्हा नियोजन समितीकडून ८० लाख रुपये निधीला मंजूरी देण्यात आल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

‘सदर मंजूर रस्त्यांत वडगाव येथील दौलत बाबुराव सोनवणे घर ते संजय सोनवणे घर १.०५ किलोमीटर रस्ता डांबरीकरण करणे,करंजी येथील करंजी ग्रा.मा.७५ ते बोकटा जिल्हा हद्द ०१ किलोमीटर रस्ता डांबरीकरण करणे,वेस येथील वेस ग्रा.मा.५२ ते जालिंदर कोल्हे घर ते बहादराबाद हद्द ०१ किलोमीटर रस्ता डांबरीकरण करणे व कोळपेवाडी येथील रा.मा.७ ते कोळपेवाडी (ग्रा.मा.१०१) वरील दीपक ढोणे घराजवळील नाला सि.डी.वर्क करणे आदींचा सामवेश आहे”-आ.आशुतोष काळे,कोपरगाव.

कोपरगाव तालुक्यात समृद्धी महामार्ग आणि अवैध वाळू उत्खनन यामुळे मोठ्या प्रमाणावर रस्त्यांचा अनुशेष वाढला होता.त्यामुळे तालुक्यातील रस्त्यांची वाट लागली होती.सदर रस्ते पुन्हा पूर्ववत करण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले होते.ते आव्हान आ.काळे यांनी स्वीकारून काम सुरु केले होते.त्यानुसार त्यांनी नुकतेच मतदार संघातील ग्रामीण रस्त्यांसाठी जिल्हा नियोजन समितीने करंजी,वडगाव व वेस येथील ३.०५ किलोमीटर रस्त्यासाठी व कोळपेवाडी येथील सी.डी.वर्क कामासाठी पुन्हा ८० लाख रुपये निधी मंजूर करून दिला आहे.

यामध्ये वडगाव येथील दौलत बाबुराव सोनवणे घर ते संजय सोनवणे घर १.०५ किलोमीटर रस्ता डांबरीकरण करणे,करंजी येथील करंजी ग्रा.मा.७५ ते बोकटा जिल्हा हद्द ०१ किलोमीटर रस्ता डांबरीकरण करणे,वेस येथील वेस ग्रा.मा.५२ ते जालिंदर कोल्हे घर ते बहादराबाद हद्द ०१ किलोमीटर रस्ता डांबरीकरण करणे व कोळपेवाडी येथील रा.मा.७ ते कोळपेवाडी (ग्रा.मा.१०१) वरील दीपक ढोणे घराजवळील नाला सि.डी.वर्क करणे या सर्व कामांसाठी एकूण ८० लाख रुपये निधी दिला आहे.

या सर्वच रस्त्याच्या कामांच्या निविदा प्रक्रिया लवकरच प्रसिद्ध होवून या रस्त्यांच्या कामांना सुरुवात होणार आहे त्यामुळे वरील सर्व गावातील नागरिकांची मोठी अडचण दूर होणार आहे त्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close